मिताली राज आणि झुलन गोस्वामी या दिग्गजांच्या गैरहजेरीतही भारतीय महिला संघानं आशिया चषक ट्वेन्टी20 स्पर्धेत नेपाळवर 99 धावांनी दणदणीत विजय साजरा केला.

या सामन्यात भारतानं नेपाळला 20 षटकांत 121 धावांचं आव्हान दिलं होतं. पण नेपाळचा संघ 21 धावांमध्येच गारद झाला. महिलांच्या ट्वेन्टी20 क्रिकेटमध्ये सांघिक धावसंख्येचा हा नीचांक ठरला आहे.

भारताकडून पूनम यादवनं तीन विकेट्स काढल्या तर अनुजा पाटील आणि सब्बिनेनी मेघनानं प्रत्येकी दोन विकेट्स काढल्या. शिखा पांडे, मानसी जोशी आणि एकता बिश्तनही प्रत्येकी एक विकेट काढून भारताच्या विजयाला हातभार लावला, त्याआधी शिखा पांडेच्या 39 धावांच्या खेळीच्या जोरावर भारतानं 20 षटकांत पाच बाद 120 धावांची मजल मारली होती.

भारतांचा हा साखळी फेरीतला सलग पाचवा विजय ठरला असून, भारतीय महिलांनी याआधीच आशिया चषक ट्वेन्टी20 स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे.