एक्स्प्लोर

भारताचा थरारक 'विजय', ऑस्ट्रेलियाचा 8 धावांनी पराभव करत मालिकेत 2-0 ने आघाडी

विराट कोहलीच्या टीम इंडियानं नागपूरच्या दुसऱ्या वन डेत ऑस्ट्रेलियाचा 8 धावांनी पराभव केला. भारतानं या विजयासह पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 251 धावांचं आव्हान दिलं होतं.

नागपूर : विराट कोहलीच्या टीम इंडियानं नागपूरच्या दुसऱ्या वन डेत ऑस्ट्रेलियाचा 8 धावांनी पराभव केला. भारतानं या विजयासह पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 251 धावांचं आव्हान दिलं होतं. अॅरॉन फिन्च, उस्मान ख्वाजा, पीटर हॅण्ड्सकोम्ब आणि मार्कस स्टॉईनिसच्या झुंजार फलंदाजीनंतरही ऑस्ट्रेलियाला 242 धावांचीच मजल मारता आली. भारताकडून कर्णधार विराट कोहलीची शतकीय खेळी महत्वपू्र्ण ठरली. विराट कोहलीनं या सामन्यात त्याच्या कारकीर्दीतलं 40 वं शतक झळकावलं. जलद गोलंदाज कुलदीप यादवने सर्वाधिक 3 गडी बाद केले. तर विजय शंकरने शेवटच्या निर्णायक ओव्हरमध्ये दोन गडी बाद केले. ऑस्ट्रेलियाला शेवटच्या ओव्हरमध्ये 11 धावांची गरज होती. मात्र विजय शंकरने या ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाचे शेवटचे दोन्ही गडी बाद करत भारताला विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारताची सुरुवात फारसी चांगली झाली नाही. विराट फलंदाजीला उतरला, त्यावेळी भारताच्या डावातलं दुसरं षटक सुरू झालं होतं आणि भारतीय धावफलकावर एक बाद शून्य अशी बिकट स्थिती होती. त्यानंतर विराटनं लौकिकास साजेसा खेळ करत भारताला 250 धावांपर्यंत मजल मारुन दिली. विराटनं 120 चेंडूंत 116 धावांची खेळी केली, यात 10 चौकारांचा समावेश होता. त्यानं विजय शंकरच्या साथीनं रचलेल्या 81 धावांच्या भागिदारीनं भारतीय डावाला आकार दिला. मग विराट आणि रवींद्र जाडेजानं सातव्या विकेटसाठी भारतीय डावात 67 धावांची भर घातली. याच दोन भागिदाऱ्यांनी टीम इंडियाला 250 धावांचा पल्ला गाठून दिला. विजय शंकरनं 46, तर रवींद्र जाडेजानं 21 धावांची खेळी उभारली. विराट कोहलीनं नागपूरच्या एकदिवसीय सामन्यात झळकावलेल्या शतकानं सर्वाधिक शतकांची शर्यत आणखी चुरशीची बनवली. विराट कोहलीचं एकदिवसीय क्रिकेट कारकीर्दीतलं हे 40 वं शतक होतं. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या सर्वाधिक 49 शतकांच्या विक्रमापासून तो आता केवळ नऊ शतकं दूर आहे. तसेच तिसऱ्या क्रमाकांवरच्या रिकी पॉन्टिंगपेक्षा विराटच्या खजिन्यात आता 10 शतकं अधिक आहेत.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mohammad Amir Ind vs WI T20 WC 2026: वेस्ट इंडिज हरवणार, टीम इंडिया सेमीफायनलमध्ये जाणारच नाही बोलणारा मोहम्मद आमिर आता म्हणातो...
वेस्ट इंडिज हरवणार, टीम इंडिया सेमीफायनलमध्ये जाणारच नाही बोलणारा मोहम्मद आमिर आता म्हणातो...
Pakistan T20 World Cup 2026 : पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप, विश्वचषकातून बाहेर होताच प्रत्येक खेळाडूंकडून लाखोंची वसुली, धक्कादायक निर्णयानंतर सगळेच चक्रावले
पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप, विश्वचषकातून बाहेर होताच प्रत्येक खेळाडूंकडून लाखोंची वसुली, धक्कादायक निर्णयानंतर सगळेच चक्रावले
Suryakumar Yadav IND vs WI : तो जेव्हा संघाबाहेर होता, तेव्हा...; सूर्यकुमार यादवने सांगितली संजू सॅमसनची पडद्यामागील स्टोरी, नेमकं काय म्हणाला?
तो जेव्हा संघाबाहेर होता, तेव्हा...; सूर्यकुमार यादवने सांगितली संजू सॅमसनची पडद्यामागील स्टोरी, नेमकं काय म्हणाला?
Gautam Gambhir On Sanju Samson: 5 सामन्यात फ्लॉप, न्यूझीलंड मालिकेतून बाहेर....; गौतम गंभीरला संजू सॅमसनचे दुःख समजले, ठरला वर्ल्डकपचा टर्निंग पॉइंट
5 सामन्यात फ्लॉप, न्यूझीलंड मालिकेतून बाहेर....; गौतम गंभीरला संजू सॅमसनचे दुःख समजले, ठरला वर्ल्डकपचा टर्निंग पॉइंट

व्हिडीओ

Indian People stuck in Dubai : युद्ध पेटले, शेकडो भारतीय प्रवासी आखाती देशात अडकले Special Report
Tejas Express Delay : तेजस एक्सप्रेस ७ तास उशिराने, शिमग्यासाठी कोकणात जाणाऱ्या कोकणवासीयांचे हाल
Iran red flag : खामेनींच्या मृत्यूचा बदला, इराणच्या कोम शहरातील मशिदीवर लाल झेंडा
Ayatollah Ali Khamenei Death : इराण इस्लामिक क्रांतीचे नेते अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याचा दावा
Gadchiroli Old Lady Death Special Report बँकेच्या ढिसाळ कारभारानं महिलेचा जीव गेला,कुटुंबीयांचा आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इस्रायलने जे गाझा पट्टीमध्ये केलं तेच आता इराणमध्ये करण्यास सुरुवात केलीच; तेहरानमधील गांधी हॉस्पिटलवर हल्ला, सर्वत्र ढिगारा अन् व्हीलचेअरही विखुरल्या, रुग्ण होरपळले
इस्रायलने जे गाझा पट्टीमध्ये केलं तेच आता इराणमध्ये करण्यास सुरुवात केलीच; तेहरानमधील गांधी हॉस्पिटलवर हल्ला, सर्वत्र ढिगारा अन् व्हीलचेअरही विखुरल्या, रुग्ण होरपळले
Share Market: इस्रायल-अमेरिका-इराण संघर्षाचा भडका; शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्स 80 हजारांच्या खाली, निफ्टीतही घसरण
इस्रायल-अमेरिका-इराण संघर्षाचा भडका; शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्स 80 हजारांच्या खाली, निफ्टीतही घसरण
Chandrapur Crime News: रेती उत्खनन अन् सीमांकनाचा वाद विकोपाला; चंद्रपुरात दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी
रेती उत्खनन अन् सीमांकनाचा वाद विकोपाला; चंद्रपुरात दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी
Gautam Gambhir On Sanju Samson: 5 सामन्यात फ्लॉप, न्यूझीलंड मालिकेतून बाहेर....; गौतम गंभीरला संजू सॅमसनचे दुःख समजले, ठरला वर्ल्डकपचा टर्निंग पॉइंट
5 सामन्यात फ्लॉप, न्यूझीलंड मालिकेतून बाहेर....; गौतम गंभीरला संजू सॅमसनचे दुःख समजले, ठरला वर्ल्डकपचा टर्निंग पॉइंट
Mamta Kulkarni Comeback After 25 Years: ऐन प्रसिद्धीच्या शिखरावरच इंडस्ट्री सोडून घेतला संन्यास; 25 वर्षांनंतर मराठमोळी अभिनेत्री करतेय कमबॅक, म्हणाली...
ऐन प्रसिद्धीच्या शिखरावरच इंडस्ट्री सोडून घेतला संन्यास; 25 वर्षांनंतर मराठमोळी अभिनेत्री करतेय कमबॅक, म्हणाली...
T20 World Cup 2026 Semi Final Schedule : 4 संघ, 3 सामने, 3 मैदान...; सेमीफायनलमध्ये कोण कोणाविरुद्ध आणि कुठे भिडणार?, A टू Z माहिती
4 संघ, 3 सामने, 3 मैदान...; सेमीफायनलमध्ये कोण कोणाविरुद्ध आणि कुठे भिडणार?, A टू Z माहिती
Jackie Shroff On Romantic Scene: 'मला माधुरीशी रोमान्स करताना...'; जॅक श्रॉफ यांचा खुलासा, सर्वांच्या भुवया उंचावल्या, माधुरीचे लाजेनं झाले गुलाबी गाल!
'मला माधुरीशी रोमान्स करताना...'; जॅक श्रॉफ यांचा खुलासा, सर्वांच्या भुवया उंचावल्या, माधुरीचे लाजेनं झाले गुलाबी गाल!
Israel Vs Iran War: अमेरिकेच्या B-2 बॉम्बर्सने एन्ट्री, लेबॅनॉनची इराणच्या बाजूनं उडी; मध्य पूर्वेमधील युद्धात दुसऱ्या दिवशी काय काय घडलं?, A टू Z माहिती
अमेरिकेच्या B-2 बॉम्बर्सने एन्ट्री, लेबॅनॉनची इराणच्या बाजूनं उडी; मध्य पूर्वेमधील युद्धात दुसऱ्या दिवशी काय काय घडलं?, A टू Z माहिती
Embed widget