एक्स्प्लोर

INDvsAUS : ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, दुखापतीमुळं वॉर्नरची पहिल्या कसोटीतून माघार

INDvsAUS 1st Test Match : ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर अजूनही दुखापतीतून सावरलेला नाही. त्यामुळं वॉर्नरला भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातून माघार घ्यावी लागली आहे.

अॅडलेड : ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर अजूनही दुखापतीतून सावरलेला नाही. त्यामुळं वॉर्नरला भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातून माघार घ्यावी लागली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधली पहिली कसोटी 17 डिसेंबरपासून अॅडलेड येथे दिवसरात्र खेळवण्यात येणार आहे. डेव्हिड वॉर्नरला कसोटी क्रिकेटसाठी आवश्यक फिटनेसची उंची गाठण्यासाठी आणखी 10 दिवस मेहनत करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळं आता पहिल्याऐवजी दुसऱ्या कसोटी सामन्यात पुनरागमन करण्याचं वॉर्नरचं लक्ष्य राहिल. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधली दुसरी कसोटी मेलबर्नमध्ये 26 ते 30 डिसेंबर या कालावधीत खेळवण्यात येईल.

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांत 29 नोव्हेंबर रोजी सिडनीत झालेल्या दुसऱ्या वन डेदरम्यान वॉर्नरला क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली होती. त्यामुळं त्याला तिसऱ्या वन डेसह तीन ट्वेन्टी२० सामन्यांच्या मालिकेतूनही माघार घ्यावी लागली होती. पण आता वॉर्नर आवश्यक फिटनेसअभावी पहिल्या कसोटी सामन्यातही खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळं तो ऑस्ट्रेलिया संघासह अॅडलेडला रवाला होणार नाही. त्याऐवजी वॉर्नर सिडनीमध्येच राहून फिटनेसवरची मेहनत आणि वैद्यकीय उपचार सुरु ठेवेल.

डेव्हिड वॉर्नरच्या अनुपस्थितीत विल पुकोवस्कीला अॅडलेडच्या पहिल्या कसोटीत पदार्पणाची संधी आहे. पण भारतीय संघाविरुद्धच्या तीनदिवसीय सामन्यात झालेल्या दुखापतीमुळं पुकोवस्कीला घेरी आली होती. त्यातून तो सावरला असेल तरच तो अॅडलेडच्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळू शकेल.

महत्त्वाच्या बातम्या

Team India : फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
Sanju Samson : वैभव सूर्यवंशीची एंट्री होताच संजू सॅमसनला घरचा रस्ता, झिम्बाब्वेविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, श्रेयस अय्यरचा लाडका विकेटकीपर संघात दाखल
संजू सॅमसनला घरचा रस्ता, झिम्बाब्वेविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, श्रेयस अय्यरचा लाडका विकेटकीपर संघात दाखल
Sanju Samson : संजू सॅमसनला संघातून वगळणं सर्वात मोठी चूक, अभिषेक- वैभव सलामीची जोडी होऊ शकत नाही, मोहम्मद कैफ संतापला 
संजू सॅमसनला संघातून वगळणं सर्वात मोठी चूक, टीम इंडियाच्या प्लॅनिंगवर मोहम्मद कैफ संतापला
AUS W vs ENG W: ऑस्ट्रेलियाच्या महिला संघानं विक्रम रचला, सातव्यांदा टी-20 वर्ल्ड कपवर नाव कोरलं, इंग्लंडचं स्वप्न भंगलं
ऑस्ट्रेलियाच्या महिला संघानं विक्रम रचला, सातव्यांदा टी-20 वर्ल्ड कपवर नाव कोरलं, इंग्लंडचं स्वप्न भंगलं

व्हिडीओ

Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले
Maval Visapur Patan Landslide : आनंद देणाऱ्या निसर्गाचा प्रकोप; मावळच्या 'पाटण'वर काळाची झडप
Anandache Paan : तीस लेखिका तीस संघर्ष, अनवट पुस्तकावर गप्पा, पाहा आनंदाचे पान
Jawhar Waterfall | 'मिनी महाबळेश्वर'चं मनमोहक रूप; धबधबे, धुकं अन् काचेचा व्ह्यूइंग ब्रिज - ABP Majha
Uddhav Thackeray | राम मंदिर देणगी प्रकरणावर ठाकरे आक्रमक; फडणवीसांचा जोरदार पलटवार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
Sanju Samson : वैभव सूर्यवंशीची एंट्री होताच संजू सॅमसनला घरचा रस्ता, झिम्बाब्वेविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, श्रेयस अय्यरचा लाडका विकेटकीपर संघात दाखल
संजू सॅमसनला घरचा रस्ता, झिम्बाब्वेविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, श्रेयस अय्यरचा लाडका विकेटकीपर संघात दाखल
ह्रदयद्रावक... भिवंडीत पावसाच्या पाण्यामुळे नाल्यात वाहून गेला चिमुकला; अहिल्यानगरमध्ये करंट लागून चिमुकली ठार
ह्रदयद्रावक... भिवंडीत पावसाच्या पाण्यामुळे नाल्यात वाहून गेला चिमुकला; अहिल्यानगरमध्ये करंट लागून चिमुकली ठार
Embed widget