एक्स्प्लोर
Advertisement
INDvsAUS : विराटच्या शतकी खेळीनंतरही टीम इंडियाची अवस्था बिकट
दुसऱ्या बाजूनं योग्य साथ न मिळाल्यानं टीम इंडियाचा डाव कालच्या तीन बाद 172 वरुन सात बाद 257 असा गडगडला. तिसऱ्या दिवशी उपाहाराला खेळ थांबला तेव्हा रिषभ पंत 14 धावांवर खेळत होता.
पर्थ : विराट कोहलीच्या शतकी खेळीनंतरही पर्थ कसोटीत टीम इंडियाची पहिल्या डावात सात बाद 252 अशी अवस्था झाली आहे. टीम इंडिया पहिल्या डावाच्या आघाडीपासून अजूनही 74 धावा दूर आहे. विराट कोहलीचं खणखणीत शतक हे आजच्या दिवसाच्या पहिल्या सत्राचं वैशिष्ट्य ठरलं. विराटनं कसोटी कारकीर्दीतलं आपलं 25 वं शतक साजरं केलं. त्यानं 257 चेंडूत 13 चौकार आणि एका षटकारासह 123 धावांची खेळी उभारली.
पण दुसऱ्या बाजूनं योग्य साथ न मिळाल्यानं टीम इंडियाचा डाव कालच्या तीन बाद 172 वरुन सात बाद 257 असा गडगडला. तिसऱ्या दिवशी उपाहाराला खेळ थांबला तेव्हा रिषभ पंत 14 धावांवर खेळत होता.
कोहली-रहाणेच्या भागीदारीने भारताला सावरलं!
कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांच्या जबाबदार फलंदाजीने पर्थ कसोटीत टीम इंडियाला दुसऱ्या दिवसअखेर तीन बाद 172 धावांची मजल मारुन दिली होती. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला, त्यावेळी विराट 82 धावांवर तर रहाणे 51 धावांवर खेळत होता. त्या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 90 धावांची अभेद्य भागीदारी रचली होती.
ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूडने टीम इंडियाची दोन बाद आठ अशी दाणादाण उडवली होती. पण विराटने चेतेश्वर पुजाराच्या साथीने भारताच्या डावाला स्थैर्य दिलं. त्याने पुजाराच्या साथीने 74 धावांची भागीदारी रचली. पुजाराने 103 चेंडूंत 24 धावांची खेळी उभारली होती.
त्याआधी, भारतीय वेगवान गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 326 धावांमध्ये आटोपला. भारताच्या ईशांत शर्मा, जसप्रीत बुमरा आणि उमेश यादवने आजच्या पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियन फलंदाजांवर वर्चस्व गाजवलं. त्यामुळे कांगारुंना कालच्या धावसंख्येत केवळ 49 धावांचीच भर घालता आली. ईशांतने सर्वाधिक चार फलंदाजांना माघारी धाडलं. तर बुमरा, उमेश यादव आणि हनुमा विहारीने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement