Chessable Masters : भारताचा वंडर बॉय असणारा बुद्धीबळ चॅम्पियन रमेशबाबू प्रज्ञानानंद (Rameshbabu Praggnanandhaa) याने चेसेबल मास्टर्स (Chessable Masters) स्पर्धेतील कमाल कामगिरी कायम ठेवत अंतिम सामन्यात एन्ट्री मिळवली आहे. त्याने डच ग्रँडमास्टर (Dutch Grandmaster) अनिश गिरी (Anish Giri) याला मात देत अंतिम सामन्यात झेप घेली आहे.
अवघ्या 16 वर्षीय प्रज्ञानानंदने आतापर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकत भारताचं नाव मोठं केलं आहे. आता त्याने डचच्या नंबर 1 बुद्धीबळपटूला मात देत चेसेबल मास्टर्स स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एन्ट्री मिळवली आहे. अत्यंत अटीतटीच्या सामन्यात सुरुवातीला प्रज्ञानानंदचं पारडं जड होत, पण नंतर गिरी यानेही सामन्यात पुनरागमन करत तगडी टक्कर दिली. पण अखेर काहीशा फरकाने प्रज्ञानानंदने सामना नावे करत फायनलमध्ये स्थान मिळवलं आहे. आता त्याची लढत चीनचा बुद्धीबळपटू आणि वर्ल्ड नंबर 2 डिंग लिरेन यांच्याशी असेल, डिंग याने दुसऱ्या सेमीफायनलमध्ये मॅग्नस कार्लसन याला मात दिली होती.
12 वर्षाच्या वयात मिळवला ग्रँडमास्टरचा खिताब
भारताचा बुद्धीबळ चॅम्पियन रमेशबाबू प्रज्ञानानंद याने 12 वर्षे 10 महिने आणि 13 दिवसांचा असताना ग्रँडमास्टर होण्याचा खिताब पटकावला होता. या कामगिरीमुळे त्याने भारताचा सर्वात युवा ग्रँडमास्टर होण्याचा खिताब पटकावला होता. याशिवाय 2018 मध्ये तो जगातील दुसरा सर्वात युवा ग्रँडमास्टर देखील होता. त्याच्या आधी युक्रेनचा सिर्जी कर्जाकिन 1990 साली अवघ्या 12 वर्षांचा असताना ग्रँडमास्टर झाला होता. ज्यामुळे तो जगातील सर्वात युवा ग्रँडमास्टर आहे.
हे देखील वाचा-
- IAS ऑफिसरच्या श्वानाला फिरवण्यासाठी खेळाडूंना केलं जातं मैदानाबाहेर, दिल्लीच्या स्टेडियममध्ये हे काय चाललंय?
- IPL 2022 : पाटीदारचं शतक, हेजलवूडचा भेदक माऱ्याच्या जोरावर आरसीबीचा विजय, लखनौचं आव्हान संपले
- 'गुजरातविरुद्ध संजू सॅमसन 47 धावा करणार' त्या व्यक्तीची भविष्यवाणी ठरली खरी, आता विराटबाबत म्हणतोय...