Sania Mirza Retirement : ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या (Australian Open 2023) मिश्र दुहेरीच्या फायनलमध्ये सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि रोहन बोपण्णा जोडीचा 6-7 (2), 2-6 असा पराभव झाला. सानिया मिर्झाच्या व्यावसायिक कारकिर्दीतील हा शेवटचा सामना होता. अलीकडेच तिने एका भावूक सोशल मीडिया पोस्टमधून निवृत्ती जाहीर केली होती. ज्यामुळे ऑस्ट्रेलियन ओपन तिची अखेरची ग्रँडस्लॅम स्पर्धा होती. ज्यात तिने फायनलपर्यंत धडक घेतली, पण अखेरच्या सामन्यात पराभव झाल्यानं अखेरच्या स्पर्धेत ग्रँडस्लॅम जिंकण्याचं तिचं स्वप्न अधुरं राहिलं आहे. दरम्यान 36 वर्षीय सानियाने वयाच्या 18 व्या वर्षी पहिला ग्रँडस्लॅम सामना खेळला होता. 2001 मध्ये तिने भारताच्या ITF टूर्नामेंटने आपल्या करिअरची सुरुवात केली. यानंतर पुढची 22 वर्षे तिने टेनिस जगतात बरचं यश मिळवलं. तिच्या याच प्रवासाबद्दल थोडक्यात जाणून घेऊ...
भारतातील सर्वात यशस्वी महिला टेनिसपटू
सानिया मिर्झाने तिचे पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा 2005 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनच्या माध्यमातून खेळली होती. पदार्पणाच्या सामन्यात तिने विजय मिळवला. या ग्रँडस्लॅममध्ये तिने महिला एकेरीची तिसरी फेरी गाठली. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली. यानंतर, यूएस ओपन 2005 मध्ये तिने महिला एकेरीची चौथी फेरी गाठली. 2005 मध्येच सानियाने पहिले एकेरी WTA टूर विजेतेपद पटकावले. तसेच ही कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. त्याच वर्षी तिला टॉप-50 क्रमवारीत स्थान मिळवण्यात यश आले. तिची WTA न्यूकमर ऑफ द इयर देखील निवड झाली. याआधी टेनिस विश्वात कोणत्याही भारतीय खेळाडूला हे स्थान मिळाले नव्हते. येथून सानिया मिर्झाने कधीच मागे वळून पाहिले नाही. तिने एकेरी आणि दुहेरीचे सामने जिंकत राहिले. तिने बॅक टू बॅक WTA दुहेरी विजेतेपदं जिंकली आणि ग्रँड स्लॅममध्येही आपला ठसा कायम ठेवला. 2007 मध्ये, ती WTA एकेरी क्रमवारीत 27 व्या स्थानावर होती. सानियाने तिच्या कारकिर्दीत एक एकेरी WTA आणि 43 दुहेरी WTA विजेतेपद पटकावली.
6 दुहेरी ग्रँडस्लॅम खिशात
2009 मध्ये सानियाने कारकिर्दीतील पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले. ती ऑस्ट्रेलियन ओपन 2009 मध्ये महेश भूपतीसह मिश्र दुहेरीची चॅम्पियन बनली. यानंतर त्याने फ्रेंच ओपन 2012 आणि यूएस ओपन 2014 मध्ये मिश्र दुहेरीतही विजेतेपद पटकावले. यानंतर तिचे अधिक लक्ष महिला दुहेरीवर गेले. 2015 मध्ये, सानियाने विम्बल्डन आणि यूएस ओपनमध्ये महिला दुहेरीचे विजेतेपद जिंकले. 2016 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावण्यात ती यशस्वी ठरली होती. अशाप्रकारे त्याने आपल्या कारकिर्दीत एकूण 6 दुहेरी ग्रँडस्लॅम जेतेपदे जिंकली. सानिया मिर्झाने प्रथमच महिला दुहेरीत प्रथम क्रमांक पटकावला. 13 एप्रिल 2005 रोजीच तिनी हे स्थान मिळवले. ती तब्बल 91 आठवडे टॉपवर राहिली होती.
हे देखील वाचा-