एक्स्प्लोर
Advertisement
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 आणि कसोटी सामन्यांसाठी टीम इंडिया सज्ज
नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिज दौऱ्यात टीम इंडियाने विंडीजच्या संघाला त्यांच्या घरच्या मैदानावर धुळ चारली. त्यानंतर टीम इंडिया आता मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 आणि कसोटी मालिकेसाठी सज्ज झाली आहे.
मुंबई : नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिज दौऱ्यात टीम इंडियाने विंडीजच्या संघाला त्यांच्या घरच्या मैदानावर धुळ चारली. त्यानंतर टीम इंडिया आता मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 आणि कसोटी मालिकेसाठी सज्ज झाली आहे. दोन्ही मालिकांसाठी दोन्ही देशांचे संघ जाहीर करण्यात आले आहेत.
दरम्यान भारताच्या 15 सदस्यीय संघात माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा समावेश करण्यात आलेला नाही. विश्वचषकानंतर धोनीने लागोपाठ दुसऱ्या मालिकेतून माघार घेतली आहे. विराटच्या नेतृत्वाखालील या संघात रिषभ पंतकडेच यष्टिरक्षणाची धुरा कायम ठेवण्यात आली आहे.
दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्याची सुरुवात टी-20 मालिकेपासून करणार आहे. ही मालिका तीन टी-20 सामन्यांची असून पहिला सामना धर्मशालाच्या एचपीसीए स्टेडियमवर 15 सप्टेंबर रोजी खेळवण्यात येईल. टी-20 मालिकेनंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात 2 ऑक्टोबरपासून तीन कसोटी सामन्यांच्या मालिकला सुरुवात होईल.
भारत-दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेचं वेळापत्रक
पहिला टी-20 सामना - 15 सप्टेंबर - धर्मशाला
दुसरा टी-20 सामना - 18 सप्टेंबर - मोहाली
तिसरा टी-20 सामना - 22 सप्टेंबर - बंगळुरु
टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कृणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, खलील अहमद, दीपक चहर आणि नवदीप सैनी
टी-20 मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ : क्विंटन डि कॉक (कर्णधार, यष्टीरक्षक), रॉसी व्हॅन डेर डुसेन, तेंबा बावुमा, ज्युनिअर डाला, ब्योर्न फोर्चुन, बुरान हेंड्रीक्स, रीजा हेंड्रीक्स, डेव्हिड मिलर, एनरिच नोर्जे, अँडिले फेहलुकवायो, ड्वेन प्रिटोरीयस, कागिसो रबाडा, तरबेझ शम्सी.
भारत-दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेचं वेळापत्रक
पहिला कसोटी सामना - 2 ते 6 ऑक्टोबर - विशाखापट्टणम
दुसरा कसोटी सामना - 10 ते 14 ऑक्टोबर - पुणे
तिसरा कसोटी सामना - 19 ते 23 ऑक्टोबर - रांची
कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ : फॅफ ड्यू प्लेसिस ( कर्णधार), टेंबा बवुमा, थेयूनिस डी ब्रुयन, क्विंटन डी कॉक, डीन एल्गर, झुबायर हम्झा, केशव महाराज, एडन मार्क्राम, सेनुरन मुथूसामी, लुंगी एनगिडी, अॅनरीच नोर्टजे, व्हेर्नोन फिलेंडर, डॅन पिएड्त, कागिसो रबाडा, रुडी सेकंड.
India’s squad for 3 T20Is against South Africa: Virat(Capt), Rohit (vc), KL Rahul, Shikhar Dhawan, Shreyas, Manish Pandey, Rishabh Pant (WK), Hardik Pandya, Ravindra Jadeja, Krunal Pandya, Washington Sundar, Rahul Chahar, Khaleel Ahmed, Deepak Chahar, Navdeep Saini#INDvSA
— BCCI (@BCCI) August 29, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement