एक्स्प्लोर

यापेक्षा चांगला वन डे स्पेल पाहिला नाही, कोहली कुलदीपवर 'फिदा'

इंग्लंडच्या मैदानावर पहिल्यांदाच पाच पेक्षा जास्त (25 धावा देऊन सहा विकेट) विकेट घेण्याचा विक्रम कुलदीपच्या नावावर झाला. ज्यामुळे यजमान संघाची सुरुवात चांगली होऊनही 268 धावांवरच डाव आटोपला.

नॉटिंगहॅम : इंग्लंडच्या सहा फलंदाजांना माघारी धाडणाऱ्या कुलदीप यादवचं कर्णधार विराट कोहलीने भरभरुन कौतुक केलं. इंग्लंडच्या मैदानावर पहिल्यांदाच पाच पेक्षा जास्त (25 धावा देऊन सहा विकेट) विकेट घेण्याचा विक्रम कुलदीपच्या नावावर झाला. ज्यामुळे यजमान संघाची सुरुवात चांगली होऊनही 268 धावांवरच डाव आटोपला. रोहित शर्माचा शतकी धमाका इंग्लंडने दिलेल्या 269 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने 114 चेंडूत चार षटकार आणि 15 चौकारांच्या मदतीने नाबाद 137 धावांची खेळी केली. याशिवाय कर्णधार विराट कोहलीनेही 82 चेंडूत सात चौकारांच्या मदतीने 75 धावा केल्या, ज्यामुळे भारताला सहज विजय मिळवता आला. यापेक्षा चांगला स्पेल पाहिला नाही : विराट कर्णधार विराट कोहलीने सामन्यानंतर कुलदीप यादवचं कौतुक केलं. ''आम्ही चांगली कामगिरी केली. कुलदीप सर्वोत्कृष्ट होता. मला नाही वाटत की गेल्या काही दिवसात मी यापेक्षा चांगला वन डे स्पेल पाहिला असेल. आत्मविश्वासाने गोलंदाजी करण्याचं आम्ही ठरवलं होतं, कारण, त्यामुळेच जिंकता येऊ शकतं. 50 षटकांच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला विकेट मिळवता नाही आल्या तर अडचणी वाढतात,'' असं विराट म्हणाला. कसोटी संघात आश्चर्यकारक नावं असतील : विराट कसोटी संघात कुलदीपला जागा मिळण्याबाबतही विराटला विचारण्यात आलं. ''तिथे काही नावं आश्चर्यकारक असू शकतात. कसोटी संघाची निवड करण्यासाठी अजून वेळ आहे. इंग्लंडच्या फलंदाजांचा संघर्ष पाहता आम्ही असं करण्याचं धाडस करु शकतो. वातावरण चांगलं आहे. आतापर्यंत तरी चांगलं राहिलं आहे. आम्ही घरापासून दूर आहोत असं वाटतच नाही,'' असंही विराट म्हणाला. इंग्लंडच्या कर्णधाराकडूनही भारतीय गोलंदाजीचं कौतुक भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांना उत्कृष्ट पद्धतीने आपल्या जाळ्यात अडकवलं हे इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गननेही मान्य केलं. ''निश्चितच हा आमच्यासाठी चांगला दिवस नव्हता. याचं संपूर्ण श्रेय भारताला जातं. त्यांनी पूर्णपणे आम्हाला पछाडलं,'' अशी कबुली मॉर्गनने सामन्यानंतर बोलताना दिली. इंग्लंडच्या फलंदाजांना कुलदीपच्या गोलंदाजीवर खेळताना मोठ्या अडचणी आल्या, जे मॉर्गननेही स्वीकारलं. ''स्पिनविरुद्ध खेळणं हे आव्हान असतं आणि आमची यात सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे. आम्हाला त्यांना (कुलदीप आणि यजुवेंद्र चहल) बसून खेळण्याचा चांगला मार्ग शोधावा लागेल. लॉर्ड्समध्ये परिस्थिती कदाचित वेगळी असेल,'' असं म्हणत मॉर्गनने सूचक इशाराही दिला. ''त्याने (कुलदीपने) इतर स्पिनर्सच्या तुलनेत चांगला टर्न मिळवला. स्पिनविरुद्ध खेळण्याच्या क्षमतेत आम्हाला सुधारणा करावी लागेल. प्रामाणिकपणे सांगायचं तर आगामी विश्वचषकापर्यंत आम्हाला आमची कामगिरी सुधारावी लागेल आणि हेच आमचं मोठं आव्हान आहे,'' असं मॉर्गनने सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

Sher E Punjab T20 League : भारतात आणखी एका टी-20 लीगची एन्ट्री! शुभमन, अभिषेकसह टीम इंडियाचे अनेक स्टार्स पुन्हा मैदानात उतरणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
भारतात आणखी एका टी-20 लीगची एन्ट्री! शुभमन, अभिषेकसह टीम इंडियाचे अनेक स्टार्स पुन्हा मैदानात उतरणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh: लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
Ind vs Aus U19 Series Update : भारतविरुद्धच्या मालिकेसाठी अंडर-19 ऑस्ट्रेलियाचा चक्रावून टाकणारा संघ जाहीर; टीम इंडियाकडून वैभव सूर्यवंशीकडे सगळ्यांचं लक्ष
भारतविरुद्धच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा चक्रावून टाकणारा संघ जाहीर; टीम इंडियाकडून वैभव सूर्यवंशीकडे सगळ्यांचं लक्ष
Brij Bhushan Sharan Singh: महिला कुस्तीपटूंकडे शरीरसुखाची मागणी, छातीवर अयोग्य स्पर्श करण्याचा आरोप, आज कोर्टाकडून निर्दोष मुक्तता; बृजभूषण सिंह यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
महिला कुस्तीपटूंकडे शरीरसुखाची मागणी, छातीवर अयोग्य स्पर्श करण्याचा आरोप, आज कोर्टाकडून निर्दोष मुक्तता; बृजभूषण सिंह यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
Embed widget