लाहोर : पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू शाहीद आफ्रिदीने आपल्या देशात आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं पुनरागमन झाल्याचं स्वागत केलं आहे. पुढील महिन्यात पाकिस्तान आणि वर्ल्ड इलेव्हन यांच्यात लाहोरमध्ये तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे.
वर्ल्ड इलेव्हनचं नेतृत्त दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू फाफ डूप्लेसी करणार आहे. शाहीद आफ्रीदीने या गोष्टीचं स्वागत केलं असलं तरी वर्ल्ड इलेव्हन संघात एकही भारतीय खेळाडू नसल्याबद्दल आफ्रिदीने खंत व्यक्त केली आहे.
पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा आणण्यासाठी पीसीबी आणि आयसीसी एकत्र आल्याचा आनंद आहे. मात्र यामध्ये भारतीय खेळाडू असता तर आणखी चांगलं झालं असतं, अशी खंत आफ्रिदीने बोलून दाखवली.
वर्ल्ड इलेव्हन आणि पाकिस्तान यांच्यात 12, 13 आणि 15 सप्टेंबर रोजी टी-20 सामने खेळवण्यात येणार आहेत.
संघ :
पाकिस्तान : सर्फराज अहमद (कर्णधार), फखर जमान, अहमद शहजाद, बाबर आजम, शोएब मलिक, उमर अमिन, इमाद वसीम, शदाब खान, मोहम्मद नवाज, फहीम अशरफ, हसन अली, अमीर यमीन, मोहम्मद आमिर, रुमन रईस, उस्मान खान, सोहेल खान
वर्ल्ड इलेव्हन : फाफ डूप्लेसी (कर्णधार), हाशिम अमला, जार्ज बेली, पॉल कॉलिंगवूड, बेन कटिंग, ग्रँट इलियट, तमीम इकबाल, डेव्हिड मिलर, टिम पेन, थिसारा परेरा, डॅरेन सॅमी, सॅम्युअल बद्री, मॉर्ने मॉर्केल आणि इम्रान ताहीर
वर्ल्ड इलेव्हन टीममध्ये भारतीय खेळाडू नसल्याची आफ्रिदीला खंत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 Aug 2017 06:25 PM (IST)
पुढील महिन्यात पाकिस्तान आणि वर्ल्ड इलेव्हन यांच्यात लाहोरमध्ये तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. मात्र वर्ल्ड इलेव्हनमध्ये एकाही भारतीय खेळाडूचा सहभाग नाही.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -