रिओ डी जेनेरियो : भारतीय हॉकी संघाने शनिवारी रिओ ऑलिम्पिकमध्ये विजयी सलामी दिली. संघाने आपल्या पहिल्याच पूल मॅचमध्ये आयरलँण्ड संघाचा 3-2 ने पराभव केला. ऑलिम्पिक हॉकी स्टेडिअमध्ये पूल बीच्या सामन्याता आठवेळा चॅम्पियन राहिलेल्या संघाविरोधात भारताच्या रुपिंदर पाल सिंहने दोन आणि व्हीआर रघुनाथने एक गोल करून विजय संपादन केला. यामुळे भारतीय संघाला तब्बल 12 वर्षांनी विजय मिळाला आहे. यापूर्वी 2004 मध्ये भारताने ऑलिम्पिकमध्ये दक्षिण अफ्रिकेचा 4-2 ने पराभव केला होता.


 

रघुनाथने भारतीय संघासाठी पहिला गोल पहिल्याच क्वार्टरच्या शेवटी केला. हा गोल 15 व्या मिनिटांनी झाला. यानंतर रुपिंदरने 27 व्या आणि 49 व्या मिनिटांनी गोल करून संघाला विजय मिळवून दिला.

 

भारताने हे तिन्ही गोल पेनाल्टी कॉर्नरवर केले. आयरलँण्डनेही आपला एक गोल पेनाल्टी कॉर्नरवर केला. हा गोल जान जर्मेनने 45 व्या मिनिटांनी केला.

 

भारतीय संघ 3-1 ने विजय मिळवेल असे वाटत होते, मात्र कोनॉर हार्टने 56 व्या मिनिटांवर पेनाल्टी कॉर्नरवर गोल करत 2-3 स्कोर केला.

 

भारताचा आता दुसरा पुर्व सामना 8 ऑगस्ट रोजी जर्मनीसोबत होणार आहे.

 

शनिवारीच झालेल्या दुसऱ्या सामन्यात अर्जेंटिनाने नेदरलँण्डला 3-3 ने बरोबरीत सोडवला.