नवी दिल्ली: गुजरातच्या उनामधील दलित मारहाणीला 25 दिवस झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच मौन सोडलं आहे.


 

गोरक्षणाच्या नावाखाली दुकानदारी सुरु आहे. एवढंच नाही तर 80 टक्के गोरक्षक ढोंगी आणि बनावट आहेत. असं म्हणत गोरक्षकांना मोदींनी सुनावलं आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते पीएमओ मोबाईल अॅप लाँच करण्यात आले. त्यावेळी मोदी बोलत होते.

 

11 जुलै रोजी गुजरातमधील उनामध्ये गाईचं मांस बाळगल्याच्या संशयावरुन दलित तरुणांना बेदम मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर पहिल्यांदाच मोदींनी त्यावर भाष्य केलं आहे. याविषयी पंतप्रधान मोदींनी अद्यापही भाष्य केलेलं नाही. अशी टीका विरोधकांकडून सुरु होती.

 

संबंधित बातम्या:


गुजरातमधील दलित मारहाण प्रकरणाचे संसदेत पडसाद