औरंगाबाद: भगवान गडावरील दसरा मेळाव्यावरुन पंकजा मुंडे आणि महंत नामदेवशास्त्री यांच्यामध्ये चांगली जुंपली आहे. कारण भगवान गडावरील दसरा मेळावा पंकजा मुंडेंच्या उपस्थितीमध्येच झाला पाहिजे नाही तर तीव्र आंदोलन करु असा इसारा वंजारी सेवा संघाच्या वतीनं देण्यात आला आहे.
भगवान गडावर राजकीय भाषण होणार नाही अशी भूमिका भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री सानप यांनी घेतली आहे. त्याविरोधात वंजारी सेवा संघानं आक्रमक भूमिका घेतली आहे. गेल्या वर्षी भगवानगडावरील दसरा मेळावा पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत झाला होता. मात्र, गेल्या काही दिवसात नामदेवशास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये वाद सुरु झाले. त्यामुळे दसरा मेळाव्यावरुन राजकारण तापण्याची शक्यता आहे.
भगवान गडावरील दसरा मेळावा आणि गोपीनाथ मुंडे हे समीकरण होतं. मात्र मुंडेंच्या निधनानंतर आता भगवानगडावरील दसरा मेळाव्यावरुन वादंग होण्याची शक्यता आहे.