Shubhman Gill won ICC POTM : नुकत्याच झालेल्या भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील टी-20 मालिकेत अखेरच्या सामन्यातही शतकी खेळी करणारा भारताचा युवा सलामीवीर फलंदाज शुभमन गिलनं (Shubhman Gill) मागील काही सामन्यांत दमदार कामगिरी केली आहे. ज्याचं फळ म्हणून त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात आयसीसीनं प्लेअर ऑफ द मंथ (ICC Player of the month) पुरस्कारानं सन्मानित केलं आहे. याशिवाय महिलांमध्ये नुकत्याच झालेल्या अंडर 19 विश्वचषक स्पर्धेत अफलातून कामगिरी करणाऱ्या इंग्लंडच्या ग्रेस हिला (Grace Scrivens) गौरवण्यात आलं आहे.


जानेवारी महिन्यासाठी प्लेअर ऑफ द मंथ म्हणून शुभमन सोबत पुरुषांमध्ये भारताचाच मोहम्मद सिराज हा देखील नामांकित होता. तर न्यूझीलंडच्या डेवॉन कॉन्वे यालाही नामांकन मिळालं होतं. पण या दोघांना मागे टाकत  शुभमन यानं पुरस्कारावर नाव कोरलं आहे. तर महिलांमध्ये ऑस्ट्रेलियाची फिबी लिचफिल्ड आणि बेथ मूनी या दोघांना मात देत ग्रेस हिने पुरस्कार जिंकला आहे.






शुभमन तुफान फॉर्मात


शुभमन गिलनं आतापर्यंत कसोटीत 4 आणि एकदिवसीय सामन्यात 4 शतकं झळकावली आहेत. आता त्यानं काही दिवसांपूर्वी टी-20 मध्येही शतक झळकावलं. नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत द्विशतक आणि एक शतक त्यानं झळकावलं होतं आणि अखेरच्या म्हणजेच तिसऱ्या टी-20 सामन्यात टी-20 मधील पहिलं शतक झळकावलं. शुभमन गिल टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 126 धावा करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. या बाबतीत त्यानं विराट कोहली आणि रोहित शर्मासह सर्व दिग्गज भारतीयांना मागे टाकलंय. आंतरराष्ट्रीय टी-20मध्ये आतापर्यंत केवळ 7 फलंदाजांना शतक झळकावता आलं होतं. गिल, कोहली, रोहित यांच्याशिवाय सुरेश रैना, सूर्यकुमार यादव, केएल राहुल आणि दीपक हुडा या खेळाडूंचा यादीत समावेश आहे.






 




आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ अवार्ड




आयसीसीनं (ICC) क्रिकेटपटूंमध्ये उत्साह वाढवण्यासाठी हा पुरस्काराची सुरुवात केली होती. प्रत्येक महिन्याला हा पुरस्कार दिला जातो. दरम्यान, पुरूष आणि महिला संघातील जे खेळाडू महिन्याभरात चांगली कामगिरी करून दाखवतात. त्यांची निवड करून त्यापैकी एकाला हा पुरस्कार दिला जातो.  


हे देखील वाचा-