एक्स्प्लोर
Advertisement
वॅफ विजेतेपद फुटबॉल स्पर्धा : भारताच्या अंडर-16 संघाकडून इराकचा पराभव
फुटबॉलच्या इतिहासात भारताच्या कोणत्याही वयोगटाच्या संघानं इराकवर मिळवलेला हा पहिला विजय ठरला.
जॉर्डन : भारताच्या अंडर सिक्सटिन संघानं आशियाई विजेत्या इराकचा १-० असा पराभव करून, वेस्ट एशियन फुटबॉल फेडरेशनच्या स्पर्धेत सनसनाटी निर्माण केली. जॉर्डनमधल्या अमान शहरात वॅफ विजेतेपद फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.
या स्पर्धेत इराकविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघानं वर्चस्व गाजवलं. अखेर भुवनेशनं सामन्यातला एकमेव गोल लगावून, भारताच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली.
फुटबॉलच्या इतिहासात भारताच्या कोणत्याही वयोगटाच्या संघानं इराकवर मिळवलेला हा पहिला विजय ठरला. भारताच्या अंडर सिक्सटिन संघाचे मुख्य प्रशिक्षक बिबियानो फर्नांडेस यांनी या विजयाचं श्रेय भारतीय खेळाडूंना घडवणाऱ्या प्रशिक्षकांना दिलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
नागपूर
भंडारा
महाराष्ट्र
Advertisement