एक्स्प्लोर

सलग 8 वन डे मालिका जिंकल्या, ऑस्ट्रेलियाच्या विक्रमाशी बरोबरी

यासोबतच भारताने सलग 8 द्विपक्षीय वन डे मालिका जिंकण्याचा विक्रमही केला आहे.

विशाखापट्टणम : टीम इंडियाने विशाखापट्टणममधील निर्णायक सामन्यात श्रीलंकेवर 8 गडी राखून मात करत तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत 2-1 ने विजय मिळवला. यासोबतच भारताने सलग 8 द्विपक्षीय वन डे मालिका जिंकण्याचा विक्रमही केला आहे. भारताने ऑस्ट्रेलियाच्या सलग 8 द्विपक्षीय वन डे मालिका जिंकण्याच्या विक्रमाशी बरोबरी साधली. 2009-10 साली ऑस्ट्रेलियाने हा विक्रम केला होता. सर्वाधिक सलग वन डे मालिका जिंकण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या नावावर आहे. विंडिजने 1980 ते 1988 या काळात सलग 15 द्विपक्षीय मालिका जिंकल्या होत्या. भारताच्या विजयाची ही मालिका 2016 साली झिम्बाम्ब्वेविरुद्धच्या वन डे मालिकेपासून सुरु झाली होती. त्यानंतर भारताने न्यूझीलंड (2016), इंग्लंड, वेस्ट इंडिज, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड (2017) आणि पुन्हा एकदा श्रीलंकेवर मात करत हा विक्रम केला. शिखर धवन आणि श्रेयस अय्यरने रचलेल्या शतकी भागिदारीच्या जोरावर टीम इंडियाने विशाखापट्टणमच्या वन डेत श्रीलंकेचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवला. यामध्ये धवनच्या नाबाद 100 धावांचा समावेश होता. भारताने या विजयासह तीन वन डे सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली. भारतीय संघाने जिंकलेली ही वन डे सामन्यांची आठवी मालिका ठरली. या सामन्यात कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहलने प्रत्येकी तीन फलंदाजांना माघारी धाडून टीम इंडियाच्या विजयाचा पाया रचला. हार्दिक पंड्याने दोन विकेट्स काढून त्यांना साथ दिली. त्यामुळे श्रीलंकेचा 3 बाद 160 धावांवरून 215 धावांत खुर्दा उडाला. त्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतला. पण धवन आणि श्रेयसने 135 धावांची भागीदारी रचून भारताच्या डावाला आकार दिला. श्रेयसने 63 चेंडूंत आठ चौकार आणि एका षटकारासह 65 धावांची खेळी उभारली. श्रीलंकेविरुद्धचा हा विक्रम गेल्या 35 वर्षांपासून कायम
  • 1982-83 साली तीन वन डे सामन्यांची मालिका भारताने 3-0 ने जिंकली
  • 1986-87 साली पाच वन डे सामन्यांची मालिका भारताने 5-0 ने जिंकली
  • 1990-91 साली चार वन डे सामन्यांची मालिका भारताने 4-1 ने जिंकली
  • 1993-94 साली तीन वन डे सामन्यांची मालिका भारताने 2-1 ने जिंकली
  • 1997-98 साली तीन वन डे सामन्यांची मालिका 1-1 ने अनिर्णित
  • 2005-06 साली सात वन डे सामन्यांची मालिका भारताने 6-1 ने जिंकली
  • 2006-07 साली चार वन डे सामन्यांची मालिका भारताने 2-1 ने जिंकली
  • 2009-10 साली पाच वन डे सामन्यांची मालिका भारताने 3-1 ने जिंकली
  • 2014-15 साली पाच वन डे सामन्यांची मालिका भारताने 5-0 ने जिंकली
  • 2017-18 मध्ये तीन वन डे सामन्यांची मालिका भारताने 3-1 ने जिंकली

महत्त्वाच्या बातम्या

IND vs WI 2nd T20 Live Score : वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांची धुलाई, भारताची धावांची बरसात! दुसऱ्या टी-20 मध्ये टीम इंडियाने उभा केला 249 धावांचा डोंगर
वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांची धुलाई, भारताची धावांची बरसात! दुसऱ्या टी-20 मध्ये टीम इंडियाने उभा केला 249 धावांचा डोंगर
Sanju Samson IND vs WI 2nd T20 : दोन जीवदान मिळाले, संजूने संधीचं सोनं केलं! रांचीमध्ये चौकार-षटकारांचा थरार, शतकाने मात्र दिली हुलकावणी, नेमकं काय घडलं?
दोन जीवदान मिळाले, संजूने संधीचं सोनं केलं! रांचीमध्ये चौकार-षटकारांचा थरार, शतकाने मात्र दिली हुलकावणी, नेमकं काय घडलं?
SA vs AUS 1st Test : जिथे सँडपेपर प्रकरणात बदनामी झाली, तिथेच ऐतिहासिक झेप! दक्षिण आफ्रिकेत स्टीव्ह स्मिथने रचला नवा इतिहास, नेमकं काय घडलं?
जिथे सँडपेपर प्रकरणात बदनामी झाली, तिथेच ऐतिहासिक झेप! दक्षिण आफ्रिकेत स्टीव्ह स्मिथने रचला नवा इतिहास, नेमकं काय घडलं?
IND A vs AUS A 2nd ODI : रजत पाटीदार लढला, पण बाकीच्यांनी ऑस्ट्रेलियापुढे टेकले हात, टीम इंडियाचा लाजीरवाणा पराभव; ऋतुराजसह स्टार फलंदाज नापास
रजत पाटीदार लढला, पण बाकीच्यांनी ऑस्ट्रेलियापुढे टेकले हात, टीम इंडियाचा लाजीरवाणा पराभव; ऋतुराजसह स्टार फलंदाज नापास

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Devendra Fadnavis: पदावर नसताना पेपर फुटला, मग MPSC अध्यक्षांचा राजीनामा कसा घेणार? तरीही चौकशीसाठी तयार : देवेंद्र फडणवीस
पदावर नसताना पेपर फुटला, मग MPSC अध्यक्षांचा राजीनामा कसा घेणार? तरीही चौकशीसाठी तयार : देवेंद्र फडणवीस
Embed widget