विशाखापट्टणम : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली 400 आंतराष्ट्रीय सामने खेळणारा भारताचा आठवा आणि जगातील 33वा क्रिकेटर बनला आहे. कोहली एसीए-वीडीसीए क्रिकेट स्टेडियमध्ये बुधवारी दुसरा वनडे सामना खेळण्यास मैदानावर उतरला आणि त्याने आपल्या नावे हा विक्रम केला आहे.


श्रीलंकेविरूद्ध 2008मध्ये वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या कोहलीने आतापर्यंत 241 वनडे, 84 कसोटी सामने आणि 75 टी20 आंतराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कोहली आधी सचिन तेंडुलकरने 664, महेंद्रसिंह धोनीने 538, राहुल द्रविडने 509, मोहम्मद अजहरुद्दीनने 433, सौरभ गांगुलीने 424, अनिल कुंबळेने 403 आणि युवराज सिंहने 402 आंतराष्ट्रीय सामने खेळले आहेत.


रोहित शर्मानं ठोकलं दीडशतक

विशाखापट्टणममध्ये रोहित शर्मानं वन डे कारकीर्दीतलं 28वं शतक साजरं केलं. त्यानं केलेली 159 धावांची खेळी ही यंदाच्या वर्षात वन डेतली सातवी शतकी खेळी ठरली. या कामगिरीसह त्यानं टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरच्या विक्रमाशी बरोबरी साधली. त्या दोघांनी अनुक्रमे 2000 आणि 2016 साली एकाच वर्षात सात शतकं ठोकली होती. एकाच कॅलेंडर वर्षात सर्वात जास्त नऊ शतकं ठोकण्याचा मान मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. 1998 साली सचिननं ही कामगिरी केली होती.

दरम्यान, विशाखापट्टणममध्ये टीम इंडियाच्या दोन्ही सलामीवीरांच्या खणखणीत शतकांच्या जोरावर टीम इंडियाने 387 धावांचा डोंगर रचला आहे. रोहित शर्मानं वन डे कारकीर्दीतलं 28वं शतक साजरं केलं. तर लोकेश राहुलनं तिसरं शतक ठोकलं. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 227 धावांची भागीदारी रचली. या दोघांची शतकं आणि शेवटी श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत यांच्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियाने मोठी धावसंख्या उभारली. कर्णधार विराट कोहली सलग दुसऱ्या सामन्यात अपयशी ठरला. तो शून्यावर बाद झाला.

पहिला सामना जिंकलेल्या विंडीज संघासमोर आता मोठे आव्हान आहे. शिमरॉन हेटमायर आणि होपच्या फटकेबाजीच्या जोरावर वेस्ट इंडिजने पहिला सामना जिंकला होता. भारताला मालिकेतील आपलं आव्हान टिकवून ठेवायचं असेल तर आजचा सामना जिंकणे आवश्यक आहे. पहिल्या सामन्यात पराभवसाठी भारताची सुमार गोलंदाजी कारणीभूत ठरली होती. त्यामुळे आजच्या सामन्यात भारताच्या गोलंदाजांवर मोठी जबाबदारी असणार आहे.

संबंधित बातम्या : 

INDvsWI 2nd ODI | टीम इंडियाचं विंडीजला 388 धावांचं आव्हान, रोहित, राहुलची शानदार शतकं

#ICCAwards : मराठमोळ्या स्मृती मानधनाचा आयसीसीच्या वन डे, ट्वेंटी-20 संघात समावेश