मुंबई : आयसीसीनं यंदाच्या कॅलेंडर वर्षातल्या कामगिरीच्या निकषावर वन डे आणि ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या वर्ल्ड इलेव्हनची निवड केली आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीनं अभिमानाची बाब म्हणजे सांगलीच्या स्मृती मानधनानं आयसीसीच्या दोन्ही संघांत स्थान मिळवलं आहे. हा मान मिळवणारी ती एकमेव भारतीय महिला क्रिकेटर ठरली.


स्मृती मानधनाच्या साथीनं झुलान गोस्वामी, शिखा पांडे आणि पूनम यादवचा आयसीसीच्या वन डे संघात समावेश करण्यात आला आहे. तसेच स्मृती मानधनासह दीप्ती शर्मा आणि राधा यादव यांची आयसीसीच्या ट्वेन्टी ट्वेन्टी संघात निवड करण्यात आली आहे.


भारतीय महिला क्रिकेट संघाची ओपनर बॅट्समन स्मृति मंधानाने यंदाचं वर्ष गाजवलं. 23 वर्षांच्या स्मृतिने 51 वनडे, 66 टी20 आणि काही कसोटी सामने खेळले आहेत. तिने टी20 आणि वनडे सामन्यांमध्ये एकूण 3476 धावा केल्या आहेत. गेल्या वर्षीही सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू हा बहुमान स्मृती मंधानाला मिळाला होता.


ऑस्ट्रेलियाच्या एलिस पेरी हिला सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू घोषित करण्यात आलं. एलिस पेरी हिला सर्वोत्तम एकदिवसीय महिला क्रिकेटपटूही घोषत करण्यात आले.


ऑस्ट्रेलियाची खेळाडू मेग लेनिंगला आयसीसी महिला वनडे आणि टी20 संघाचं कर्णधारपद दिलं आहे. तसेच तिचा वर्षभराच्या महिला वनडे टीममध्ये सामवेशही करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त थायलंडच्या चनिंदा सुथीरुआंगला आयसीसी इमर्जिग प्लेयर ऑफ द ईयर म्हणून निवडण्यात आलं आहे.

आयसीसी महिला वनडे टीम : एलिसा हॅली (विकेटकीपर), स्मृति मंधाना, तमसीन ब्यूमाँट, मेग लॅनिंग (कर्णधार), स्टेफनी टेलर, एलिस पॅरी, जेस जोनासेन, शिखा पांड, झूलन गोस्वामी, मेगन शट्ट, पूनम यादव.

आयसीसी महिला टी20 टीम : एलिसा हॅली (विकेटकीपर), डेनिएल व्याट, मेग लेनिंग (कर्णधार), स्मृति मंधाना, लिजेल ली, एलिस पॅरी, दीप्ति शर्मा, निदा दार, मेगन शट्ट, शबनम इस्माइल, राधा यादव.

संबंधित बातम्या : 

INDvsWI 2nd ODI | मालिकेत कमबॅक करण्यासाठी टीम इंडिया सज्ज

रणजीचा रणसंग्राम : दुसऱ्या साखळी लढतीत विदर्भ, महाराष्ट्राची दमदार सुरुवात