एक्स्प्लोर

श्रीलंकेविरुद्धच्या एकमेव टी-20साठी टीम इंडिया सज्ज

कसोटी आणि वन डे मालिकेतल्या धडाकेबाज कामगिरीनंतर आता विराटसेना सज्ज झाली आहे ती श्रीलंकेविरूद्धच्या एकमेव टी-20 सामन्यासाठी.

कोलंबो : टीम इंडियाच्या विजयाचा वारु असा काही उधळला आहे की श्रीलंकेला त्याला रोखणं अशक्य झालं आहे. कसोटी आणि वन डे मालिकेतल्या धडाकेबाज कामगिरीनंतर आता विराटसेना सज्ज झाली आहे ती श्रीलंकेविरूद्धच्या एकमेव टी-20 सामन्यासाठी. आयसीसीच्या टी-20 क्रमवारीत टीम इंडिया पाचव्या स्थानावर तर श्रीलंका आठव्या स्थानावर आहे. त्यामुळं इथंही भारताचंच पारडं जड असल्याचं दिसून येतं. भारत आणि श्रीलंकादरम्यानच्या मागील दहा टी-20 सामन्यांमध्ये भारतानं सहा तर श्रीलंकेनं चार सामने जिंकले आहेत. कोलंबोतल्या टी-20 सामन्यात तेच वर्चस्व कायम राखून श्रीलंका दौऱ्यात अपराजित राहण्याचं भारतीय संघाचं लक्ष्य असेल. नुकत्याच झालेल्या वन डे मालिकेत विराट आणि त्याच्या शिलेदारांनी फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही  विभागात सरस कामगिरी बजावली होती. शिखर धवन,  रोहित शर्मा, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी यांनी या मालिकेत धावांचा रतीब घातला. टीम इंडियाच्या विजयात गोलंदाजांनीही  तेवढीच मोलाची भूमिका बजावली. जसप्रीत बुमरानं सर्वाधिक 15 विकेट्स घेत मालिकावीराचा बहुमान पटकावला. त्याचबरोबर भुवनेश्वर कुमार, केदार  जाधव, यजुवेंद्र चहल, अक्षर पटेल आणि कुलदीप यादवनंही आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी केली. टीम इंडियाच्या याच कामगिरीच्या पुनरावृत्तीची अपेक्षा आता सामन्यातही केली जात आहे. शिखर धवन मायदेशी परतल्यानं रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, लोकेश राहुल आणि महेंद्रसिंग धोनी या शिलेदारांवरच प्रामुख्यानं भारताच्या फलंदाजीची भिस्त राहील. त्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा सध्या भन्नाट फॉर्ममध्ये आहेत. टीम इंडियाचे हे कर्णधार आणि उपकर्णधार भारतीय डावाची सुरुवात करण्याची शक्यता आहे. वन डे मालिकेत कोहलीनं 5 सामन्यांत दोन शतकांसह सर्वाधिक 330 धावा कुटल्या आहेत, तर रोहितनंही दोन शतकांसह 5 सामन्यांत 302 धावा फटकावल्या होत्या. भारतीय फलंदाजांनी हाच फॉर्म कायम राखल्यास, एकमेव टी-20 सामन्यातही विजय मिळवणं टीम इंडियाला कठीण जाणार नाही. अर्थात श्रीलंका संघही दोन्ही मालिकांमधल्या निराशाजनक कामगिरीनंतर हा सामना जिंकण्याच्या प्रयत्नात असेल. परंतु विराट आणि त्याच्या शिलेदारांची ताजी कामगिरी पाहता टीम इंडियाला हरवणं श्रीलंकेसाठी तेवढं सोपं नाही. भारतात होणाऱ्या आगामी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सामन्यांच्या मालिकांच्या दृष्टीनं भारत-श्रीलंका सामना महत्वाचा ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर विराटची टीम इंडिया कोलंबोच्या टी-20 सामन्यात कशी कामगिरी करते हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs WI 2nd T20 : अय्यर-गंभीरचे सर्व डावपेच फ्लॉप! रेकॉर्डब्रेक धावा करूनही भारत हरला, शाई होपने काढला सगळा हिशोब; वेस्ट इंडिजकडून धावांचा ऐतिहासिक पाठलाग
अय्यर-गंभीरचे सर्व डावपेच फ्लॉप! रेकॉर्डब्रेक धावा करूनही भारत हरला, शाई होपने काढला सगळा हिशोब; वेस्ट इंडिजकडून धावांचा ऐतिहासिक पाठलाग
IND vs WI 2nd T20 Score : शाई होपचं शतक! वेस्ट इंडिजकडून टीम इंडियाचा 6 गडी राखून पराभव
शाई होपचं शतक! वेस्ट इंडिजकडून टीम इंडियाचा 6 गडी राखून पराभव
Sanju Samson IND vs WI 2nd T20 : दोन जीवदान मिळाले, संजूने संधीचं सोनं केलं! रांचीमध्ये चौकार-षटकारांचा थरार, शतकाने मात्र दिली हुलकावणी, नेमकं काय घडलं?
दोन जीवदान मिळाले, संजूने संधीचं सोनं केलं! रांचीमध्ये चौकार-षटकारांचा थरार, शतकाने मात्र दिली हुलकावणी, नेमकं काय घडलं?
SA vs AUS 1st Test : जिथे सँडपेपर प्रकरणात बदनामी झाली, तिथेच ऐतिहासिक झेप! दक्षिण आफ्रिकेत स्टीव्ह स्मिथने रचला नवा इतिहास, नेमकं काय घडलं?
जिथे सँडपेपर प्रकरणात बदनामी झाली, तिथेच ऐतिहासिक झेप! दक्षिण आफ्रिकेत स्टीव्ह स्मिथने रचला नवा इतिहास, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Embed widget