एक्स्प्लोर

भारत वि. श्रीलंका : इतिहास घडवण्याची टीम इंडियाला नामी संधी

टीम इंडियाला कॅण्डीची तिसरी कसोटी जिंकून श्रीलंका दौऱ्यात नवा इतिहास घडवण्याची संधी आहे.

कॅण्डी  (श्रीलंका) : विराट कोहलीच्या टीम इंडियाला कॅण्डीची तिसरी कसोटी जिंकून श्रीलंका दौऱ्यात नवा इतिहास घडवण्याची संधी आहे. भारतानं श्रीलंका दौऱ्यातली तीन कसोटी सामन्यांची मालिका 3-0 अशी जिंकली, तर कसोटी क्रिकेटच्या इतिहासात टीम इंडियाचा हा परदेश दौऱ्यातला पहिला क्लीन स्विप ठरेल. गॉल कसोटीत भारताचा 304 धावांनी दणदणीत विजय, कोलंबो कसोटीत भारताची एक डाव आणि 53 धावांनी सरशी. इजा झाला, बिजा झाला आणि आता विराट कोहलीची टीम इंडिया सज्ज झाली आहे तिजासाठी. म्हणजे विजयी हॅटट्रिकसाठी! भारत आणि श्रीलंका संघांमधला तिसरा आणि अखेरचा कसोटी सामना कँडीच्या पल्लिकल स्टेडियमवर खेळवण्यात येत असून ही कसोटी जिंकून तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 3-0 असा निर्विवाद विजय मिळवण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न आहे. भारतानं कसोटी क्रिकेटच्या 85 वर्षांच्या इतिहासात आजवर कधीही परदेशात निर्विवादरित्या मालिका जिंकलेली नाही. त्यामुळं टीम इंडियाचा श्रीलंकेतला 3-0 असा विजय विराट कोहलीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारा ठरेल. आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत अनुक्रमे पहिल्या आणि सातव्या स्थानावर असलेल्या भारत आणि श्रीलंका संघांच्या ताकदीत किती मोठा फरक आहे याची कल्पना आधी गॉल आणि मग कोलंबोच्या मैदानात आली. या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियानं पहिल्या डावात सहाशेहून अधिक धावांचा डोंगर उभारला, तिथंच या कसोटी सामन्यांची सूत्रं भारताच्या हाती आली होती. आता कँडीच्या तिसऱ्या कसोटीतही धावांचा डोंगर उभारण्यासाठी भारतीय फलंदाजांचे हात शिवशिवत असतील. भारतीय फलंदाजांनी लागोपाठ दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवलं असलं तरी, श्रीलंकेच्या कुशल मेंडिस आणि दिमुथ करुणारत्नेनं झुंजार शतकं झळकावून कोलंबो कसोटीत पराभव टाळण्यासाठी केलेली शिकस्त विसरता येणार नाही. मेंडिस आणि करुणारत्नेच्या त्या शतकांनी श्रीलंकेच्या फलंदाजांना नक्कीच नवा आत्मविश्वास दिला असेल. त्यात रवींद्र जाडेजाला शिस्तभंगाच्या कारवाईमुळं तिसऱ्या कसोटीतून घ्यावी लागलेली माघार श्रीलंकन फलंदाजांच्या पथ्यावर पडावी. रवींद्र जाडेजा हा पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधला भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. जाडेजानं 374 धावांच्या मोबदल्यात श्रीलंकेच्या 13 फलंदाजांना माघारी धाडलं आहे. कोलंबो कसोटीत तर तो भारताच्या विजयाचा प्रमुख शिल्पकार ठरला. त्यानं नाबाद 70 धावांची खेळी आणि 236 धावांत सात विकेट्स अशी अष्टपैलू कामगिरी बजावली. पण याच कसोटीत जाडेजानं स्वत:च्या गोलंदाजीवर अडवलेला चेंडू फलंदाज करुणारत्नेच्या दिशेनं अतिशय धोकादायक पद्धतीनं थ्रो केला होता. त्यामुळं आयसीसीच्या नियमावलीनुसार त्याच्यावर एका कसोटीतून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. परिणामी तो कँडीच्या तिसऱ्या कसोटीत तो खेळू शकणार नाही. रवींद्र जाडेजाऐवजी कँडी कसोटीसाठी डावखुरा स्पिनर अक्षर पटेलचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. पण या कसोटीसाठी चायनामन गोलंदाज कुलदीप यादवलाच अंतिम अकरा जणांत संधी मिळण्याची चिन्हं आहेत. तसं झालं तर कुलदीप यादवची ही दुसरी कसोटी ठरेल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या धर्मशाला कसोटीतल्या पदार्पणातच त्यानं भारताच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली होती. त्या कसोटीच्या पहिल्या डावात कुलदीप यादवनं 68 धावांत 4 विकेट्स काढल्या होत्या. कुलदीप यादवनं धर्मशाला कसोटीत ऑस्ट्रेलियासमोर प्रभावी कामगिरी बजावली, त्या वेळी त्याच्या साथीला रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजा ही अनुभवी जोडीही होती. त्यामुळं दुसऱ्या डावात कुलदीप अयशस्वी ठरला, त्या वेळी त्या दोघांनी भारतीय आक्रमणाची जबाबदारी यशस्वीरित्या पेलली होती. आता रवींद्र जाडेजाच्या अनुपस्थितीत टीम इंडियाला जिंकून देण्याची मोठी जबाबदारी कुलदीप यादवच्या शिरावर आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Smriti Mandhana: स्मृती मंधानाचा डबल धमाका! आंतरराष्ट्रीय धावांचा विक्रम मोडित काढला, शतकांमध्येही विश्वविक्रम
स्मृती मंधानाचा डबल धमाका! आंतरराष्ट्रीय धावांचा विक्रम मोडित काढला, शतकांमध्येही विश्वविक्रम
Rohit Sharma : रोहित शर्माच्या रिटायरमेंटच्या दिवसभर चर्चा, अखेर बीसीसीआयचे सचिव मैदानात, हिटमॅनच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज
रोहित शर्माच्या रिटायरमेंटवरुन तर्क वितर्क, अखेर BCCI चे सचिव समोर आले अन् सगळं स्पष्ट केलं
BCCI : अखेर युवा खेळाडूचा फसवाफसवीचा खेळ संपला, बीसीसीआयनं थेट दोन वर्षाची बंदी घातली  
युवा खेळाडूचा फसवाफसवीचा खेळ संपला, बीसीसीआयनं थेट दोन वर्षाची बंदी घातली
MS Dhoni And Rishabh Pant Video: जरा हुक्का पिऊन येतो...; एमएस धोनी आणि ऋषभ पंतच्या व्हिडीओने खळबळ, नेमकं काय काय म्हणाले?
जरा हुक्का पिऊन येतो...; एमएस धोनी आणि ऋषभ पंतच्या व्हिडीओने खळबळ, नेमकं काय काय म्हणाले?

व्हिडीओ

Majha Infra Vision Siddhesh Kadam Manisha Khatri : 'डीजे' ते कुंभमेळा, शाश्वत विकासाचा रोड मॅप
Devendra Fadnavis Majha Infra Vision : CM फडणवीसांनी माझा इन्फ्रा व्हिजनमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप
Majha Infra Vision Eknath Shinde : समृद्धी, कोस्टल, जरांगे ते DJ; एकनाथ शिंदेंचं माझा इन्फ्रा व्हिजन
Majha Infra Vision Mahendra Kalyankar: धारावीमधील झोपडपट्टी धारकांना 350 चौरस फूट घरे मोफत; महेंद्र कल्याणकर काय म्हणाले?
Majha Infra Vision Nitesh Rane: जिहादमुक्त किनारपट्टी, वाढवण बंदर, दिशा सालियान; नितेश राणे UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Wrestler Ashwini Paul Death Dharashiv News: कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची 3 मुलांना घेऊन नळदुर्ग किल्ल्यावरुन उडी; आता जीवन संपवण्यामागचं धक्कादायक कारण आलं समोर
कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची 3 मुलांना घेऊन नळदुर्ग किल्ल्यावरुन उडी; आता जीवन संपवण्यामागचं धक्कादायक कारण समोर
Vidyanand Bapat: मारहाणीच्या घटनेनंतर आता एक पाऊल मागे घेणार का? विद्यानंद बापट म्हणाले छे...छे..अजिबात नाही, कारण...
मारहाणीच्या घटनेनंतर आता एक पाऊल मागे घेणार का? विद्यानंद बापट म्हणाले छे...छे..अजिबात नाही, कारण...
Wrestler Ashwini Mohite Paul Dharashiv News: महाराष्ट्राच्या वाघिणी'चा दुर्दैवी अंत; महिला कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची 3 मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरुन उडी, धाराशिवमधील थरकाप उडवणारी घटना
महाराष्ट्राच्या वाघिणी'चा दुर्दैवी अंत; महिला कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची 3 मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरुन उडी, धाराशिवमधील थरकाप उडवणारी घटना
India Belgium Defence Deal: ड्रोन, रणगाडे, रॉकेट अन् प्रचंड दारुगोळा; भारतीय लष्कराची ताकद वाढणार! भारत- बेल्जियममध्ये 10 मोठे करार
ड्रोन, रणगाडे, रॉकेट अन् प्रचंड दारुगोळा; भारतीय लष्कराची ताकद वाढणार! भारत- बेल्जियममध्ये 10 मोठे करार
Manoj Jarange Patil Protest: मनोज जरांगेंकडून 11 सप्टेंबरची डेडलाईन, अंतरवालीत हायहोल्टेज ड्रामा; विखे-पाटील, सामंत, लाड यांच्यासमोर रात्री काय काय घडलं?
मनोज जरांगेंकडून 11 सप्टेंबरची डेडलाईन, अंतरवालीत हायहोल्टेज ड्रामा; विखे-पाटील, सामंत, लाड यांच्यासमोर रात्री काय काय घडलं?
 Chhatrapati Sambhajinagar Fire News : मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरच्या एशियन हॉस्पिटलमध्ये भीषण आग; 9 चिमुकल्यांसह 58 रुग्ण थोडक्यात बचावले
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरच्या एशियन हॉस्पिटलमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या जवानांचे शर्थीचे प्रयत्न, 9 चिमुकल्यांसह 58 रुग्ण थोडक्यात बचावले
Vidyanand Bapat : विद्यानंद बरा आहेस ना, तुझी तब्येत कशी आहे, जास्त लागलं नाही ना? रत्नागिरीतून आई वडिलांचा विद्यानंद बापट यांना भावनिक फोन
विद्यानंद बरा आहेस ना, तुझी तब्येत कशी आहे, जास्त लागलं नाही ना? आई वडिलांचा भावनिक फोन
Goa : गोव्यात लाभार्थ्यांना एका वर्षात तीन एलपीजी सिलेंडर मोफत मिळणार, बँक खात्यात दरवर्षी 3000 रुपये जमा होणार, भाजप सरकारची मोठी घोषणा 
गोव्यात लाभार्थ्यांना एका वर्षात तीन एलपीजी सिलेंडर मोफत मिळणार, बँक खात्यात दरवर्षी 3000 रुपये जमा होणार
Embed widget