एक्स्प्लोर

श्रीलंकेचा 87 धावांत खुर्दा, भारताचा दणदणीत विजय

लोकेश राहुलचं दमदार अर्धशतक आणि धोनीच्या झटपट 39 धावांच्या जोरावर श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियानं 20 षटकात 3 बाद 180 धावांपर्यंत मजल मारली.

कटक : यजुवेंद्र चहल आणि कुलदीप यादवच्या प्रभावी फिरकीच्या जोरावर टीम इंडियानं श्रीलंकेवर पहिल्या ट्वेंटी ट्वेंटी सामन्यात 93 धावांनी मात केली. या विजयासह टीम इंडियानं तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. टीम इंडियानं श्रीलंकेसमोर विजयासाठी 181 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र श्रीलंकेचा डाव अवघ्या 87 धावात आटोपला. यजुवेंद्र चहलनं आपल्या भेदक लेगस्पिन गोलंदाजीनं चार षटकात 23 धावा देत श्रीलंकेच्या चार फलंदाजांना माघारी धाडलं. चायनामन कुलदीप यादव आणि हार्दीक पंड्यानं प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या तर जयदेव उनादकटनं एक विकेट घेतली. धोनीची करामत  या सामन्यात खऱ्या अर्थानं हिरो ठरला तो महेंद्रसिंह धोनी. श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. यावेळी धोनीला चौथ्या क्रमांकावर पाठवण्यात आलं. धोनीनंही मोक्याच्या क्षणी 39 धावा करुन टीम इंडियाला 180 धावांपर्यंत मजल मारुन दिली. 181 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संपूर्ण संघ अवघ्या 87 धावांवर बाद झाला. यामध्ये धोनीचाही महत्त्वाचा वाटा होता. कारण या सामन्यात धोनीनं दोन स्टम्पिंग, दोन कॅच अशी कामगिरी करत भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. स्टम्पमागे कायमच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या धोनीनं या सामन्यात तशीच कामगिरी केली. त्यानं यावेळी थिसारा परेरा आणि गुणरत्ने या दोघांनी स्टम्पिंग करत तंबूत धाडलं. सुरुवातीपासूनच फटकेबाजी करणाऱ्या थरंगाचा अप्रतिम झेल पकडून धोनीनं सामना भारताच्या बाजूनं झुकवला. त्यानंतर परेराचाही धोनीनं एक सोपा झेल घेतला. दरम्यान सुरुवातीला लोकेश राहुलचं दमदार अर्धशतक आणि धोनीच्या झटपट 39 धावांच्या जोरावर श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियानं 20 षटकात 3 बाद 180 धावांपर्यंत मजल मारली. भारताचं श्रीलंकेसमोर 181 धावांचं आव्हान नाणेफेक जिंकून श्रीलंकेनं भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. प्रथम फलंदाजी करताना भारतानं श्रीलंकेसमोर 181 धावांचं आव्हान दिलं होतं. लोकेश राहुलनं सलामीला येऊन दमदार फलंदाजी करताना 48 चेंडूत 7 चौकार आणि एका षटकारासह 61 धावांची खेळी उभारली. त्यानं रोहित शर्मा, श्रेयस अय्यरच्या साथीनं पहिल्या आणि दुसऱ्या विकेटसाठी  अनुक्रमे 38 आणि 63 धावांची भागीदारी रचली. कटकमध्ये मैदानात बरंच दव असल्यानं चेंडू बॅटवर म्हणावा तसा येत नव्हता. अशावेळी चौथ्या क्रमांकावर आलेल्या धोनीनं आपल्या अनुभवाच्या जोरावर ऐन मोक्याच्या क्षणी धावा करत भारताला 180 धावांपर्यंत मजल मारुन दिली. त्याला मनिष पांडेची देखील चांगली साथ मिळाली. रोहित शर्मानं 17 तर श्रेयस अय्यरनं 24 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर आलेल्या महेंद्रसिंग धोनी आणि मनिष पांडेनंही जलद अर्धशतकी भागीदारी साकारली. धोनीनं चार चौकार आणि एका षटकारासह नाबाद 39 धावा फटकावल्या तर पांडेनं नाबाद 32 धावांची खेळी साकारली.

महत्त्वाच्या बातम्या

Team India Schedule : श्रीलंका दौरा संपला, आता टीम इंडियाचा पुढचा सामना कधी?, सप्टेंबरमध्ये रोहित, विराट, वैभव सगळेच मैदानात दिसणार; कुठे-कधी होणार सामने? जाणून घ्या Schedule
श्रीलंका दौरा संपला, आता टीम इंडियाचा पुढचा सामना कधी?, सप्टेंबरमध्ये रोहित, विराट, वैभव सगळेच मैदानात दिसणार; कुठे-कधी होणार सामने? जाणून घ्या Schedule
IND vs SL Test Series : कुणाच्या पाठीवर नंबरचा टॅटू, तर कोणाच्या खांद्यावर काळे-निळे डाग; कोलंबोतील सामन्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंचे फोटो पाहून सगळे हादरले
कुणाच्या पाठीवर नंबरचा टॅटू, तर कोणाच्या खांद्यावर काळे-निळे डाग; कोलंबोतील सामन्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंचे फोटो पाहून सगळे हादरले
Devdutt Padikkal : देवदत्त पडिक्कल ट्रॉफी मिळाली; पण श्रीलंकेची दाणादाण उडवणारा 'हा' खेळाडू राहिला रिकाम्या हाती
देवदत्त पडिक्कल ट्रॉफी मिळाली; पण श्रीलंकेची दाणादाण उडवणारा 'हा' खेळाडू राहिला रिकाम्या हाती
Suryakumar Yadav : विश्वचषक जिंकवला, तरी संघाबाहेर! सूर्याने एका वाक्यात विषय संपवला आणि कमबॅकवरही बोलला, नेमकं काय म्हणाला, पाहा VIDEO
विश्वचषक जिंकवला, तरी संघाबाहेर! सूर्याने एका वाक्यात विषय संपवला आणि कमबॅकवरही बोलला, नेमकं काय म्हणाला, पाहा VIDEO

व्हिडीओ

Supriya Sule X Post : पण तू सोबत नाहीस, सुप्रिया सुळेंची अजित पवारांसाठी X पोस्ट
Pravin Darekar On Manoj Jarange Patil : जरांगेंप्रती आम्हाला आस्था, पण सरकार चर्चेला तयार असताना...
Amit Thackeray on Ameet Satam : अमित साटमांना भुंकायला ठेवलंय,अमित ठाकरेंची जहरी टीका
Narhari Zirwal On Adivasi Students Protest: खाऊन पिऊन आंदोलन करा, मी जे आंदोलन करायचो ते चोरून खायचं
Rohit Pawar & Rahul Gandhi Meet : रोहित आणि राहुल कशाची चाहूल? | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baba Ramdev : आधी वादविवाद आता नरमाईची भूमिका; बाबा रामदेव म्हणाले,
आधी वादविवाद आता नरमाईची भूमिका; बाबा रामदेव म्हणाले, " कंगना रणौत या बहिणीला फोन करू अन्..."
Nidhi Singh Death Case Gujarat: पतीचे अनैतिक संबंध; 24 वर्षीय महिलेने जीवन संपवलं, अंतर्वस्त्रांमध्ये आढळली शेवटची चिठ्ठी, पोलिसही चक्रावले, नेमकं काय लिहिलेलं?
पतीचे अनैतिक संबंध; 24 वर्षीय महिलेने जीवन संपवलं, अंतर्वस्त्रांमध्ये आढळली शेवटची चिठ्ठी, पोलिसही चक्रावले, नेमकं काय लिहिलेलं?
Nepal Flash Flood: नेपाळमध्ये चिखलात गुदमरलेल्या जीवांचा शोध सुरु असतानाच पुन्हा धडकी भरवणारा अलर्ट जारी, तिबेटमध्ये पुन्हा पाण्याचा बांध फुटल्याची माहिती, सरकारकडून पोलीस, बचाव टीमला सतर्क राहण्याचे आदेश
नेपाळमध्ये चिखलात गुदमरलेल्या जीवांचा शोध सुरु असतानाच पुन्हा धडकी भरवणारा अलर्ट जारी, तिबेटमध्ये पुन्हा पाण्याचा बांध फुटल्याची माहिती, सरकारकडून पोलीस, बचाव टीमला सतर्क राहण्याचे आदेश
Video: लग्नाची वरात घेऊन जाणारी खासगी बस थेट डांबाला धडकून पलटी, 35 जखमी; पण दैव बलवत्तर म्हणून दुसरा वाचलेला स्कुटीवाला मात्र जागेवरच 'ठंडा ठंडा कूल कूल..'
Video: लग्नाची वरात घेऊन जाणारी खासगी बस थेट डांबाला धडकून पलटी, 35 जखमी; पण दैव बलवत्तर म्हणून दुसरा वाचलेला स्कुटीवाला मात्र जागेवरच 'ठंडा ठंडा कूल कूल..'
Sugar Price Hike : 3 किलोपेक्षा अधिक साखर मिळणार नाही! बिगबास्केट, झेप्टो अन् ब्लिंकिटसह ऑनलाइन डिलिव्हरी कंपन्यांकडून साखर खरेदीवर मर्यादा, नेमकं कारण काय?
3 किलोपेक्षा अधिक साखर मिळणार नाही! बिगबास्केट, झेप्टो अन् ब्लिंकिटसह ऑनलाइन डिलिव्हरी कंपन्यांकडून साखर खरेदीवर मर्यादा, नेमकं कारण काय?
Nepal Video Viral: माणुसकीला काळीमा फासणारी घटना; नेपाळमध्ये पुराच्या पाण्यातील महिलेच्या मृतदेहावरील सोनं दोघांनी चोरलं, व्हिडीओ व्हायरल, पोलिसांकडून तातडीने कारवाई
माणुसकीला काळीमा फासणारी घटना; नेपाळमध्ये पुराच्या पाण्यातील महिलेच्या मृतदेहावरील सोनं दोघांनी चोरलं, व्हिडीओ व्हायरल, पोलिसांकडून तातडीने कारवाई
'आई यांनी माझ्यावर अशाच पद्धतीने उपचार केला, तर हे लोक मला मारून टाकतील...' 25 वर्षीय गर्भवती कल्पना जीवाच्या आकांताने मदतीसाठी वाॅर्डमध्ये ओरडत बाहेर आली अन् काही क्षणात आई आणि बाळाने जीव सोडला
'आई यांनी माझ्यावर अशाच पद्धतीने उपचार केला, तर हे लोक मला मारून टाकतील...' 25 वर्षीय गर्भवती कल्पना जीवाच्या आकांताने मदतीसाठी वाॅर्डमध्ये ओरडत बाहेर आली अन् काही क्षणात आई आणि बाळाने जीव सोडला
Delhi Model Case: अवघ्या 21 वर्षीय मॉडेलला घरात घुसून संपवणाऱ्या जिम ट्रेनरच्या एन्काऊंटरनंतर मुसक्या आवळल्या; दिल्ली पोलिसांच्या स्पेशल स्टाफ टीमसोबत चकमक
अवघ्या 21 वर्षीय मॉडेलला घरात घुसून संपवणाऱ्या जिम ट्रेनरच्या एन्काऊंटरनंतर मुसक्या आवळल्या; दिल्ली पोलिसांच्या स्पेशल स्टाफ टीमसोबत चकमक
Embed widget