एक्स्प्लोर

India vs Sri Lanka : आज पहिली वनडे, नव्या दमाच्या टीम इंडियासमोर श्रीलंकेचं तगडं आव्हान, असे असतील दोन्ही संघ

India vs Sri Lanka 1st ODI:  भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या वन डे मालिकेचा पहिला सामना आज रविवार, 18 जुलै रोजी खेळला जाणार आहे.

India vs Sri Lanka 1st ODI:  भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या वन डे मालिकेचा पहिला सामना आज रविवार, 18 जुलै रोजी खेळला जाणार आहे. हा सामना कोलंबोमध्ये भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरू होईल. नव्या दमाच्या टीम इंडियासमोर श्रीलंकेचं तगडं आव्हान असणार आहे. पहिल्यांदाच नॅशनल कोचची भूमिका पार पाडणाऱ्या राहुल द्रविड आणि नेतृत्व करणाऱ्या शिखर धवनची ही कसोटी असणार आहे.

या सामन्यात विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसन भारताकडून डेब्यू करू शकतो. वास्तविक, सॅमसनने भारताकडून टी -20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. मात्र, अद्याप त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले नाही. या सामन्यात उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेला कर्णधार शिखर धवन आणि पृथ्वी शॉ सलामीला येऊ शकतात. देवदत्त पडिकल, ऋतुराज गायकवाड आणि नितीश राणा यांच्या रूपात टीम इंडियाकडे इतर पर्याय असले तरी प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार धवन पृथ्वी शॉला सलामीची पहिली संधी देऊ शकतात.

यानंतर तिसर्‍या क्रमांकावर सूर्यकुमार यादवचं खेळणं निश्चित मानलं जात आहे. त्याचबरोबर विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसन चौथ्या क्रमांकावर खेळू शकतो. केरळच्या या फलंदाजाकडे बराच अनुभव आहे. त्यामुळे किमान एकदिवसीय सामन्यात त्याला इशान किशनपेक्षा प्राधान्य दिलं जाईल. संजूनंतर मनीष पांडेला पाचव्या क्रमांकावर संधी दिली जाऊ शकते.

हार्दिक पांड्या आणि क्रुणाल पांड्या 6 व 7 व्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतात. हे दोन्ही भाऊ फिनिशरची भूमिका साकारणार आहेत. श्रीलंकेच्या खेळपट्ट्यांवर क्रुणाल पांड्या खूप प्रभावी ठरू शकतो. शेवटच्या षटकांत तो स्फोटक फलंदाजी देखील करू शकतो. इंग्लंडविरुद्ध होम ग्राऊंडवर एकदिवसीय मालिकेतही त्याने हे दाखवून दिले. दुसरीकडे, हार्दिक आपल्या प्रदर्शनाने समीक्षकांचे तोंड बंद करण्याची शक्यता आहे.

श्रीलंकेच्या खेळपट्टीवर नजर टाकल्यास कर्णधार धवन कुल्चा अर्थात युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांच्या जोडीला पहिल्या एकदिवसीय सामन्यात संधी देऊ शकतो. जेव्हा जेव्हा ही जोडी वन-डे क्रिकेटमध्ये एकत्र खेळली आहे, तेव्हा भारताच्या विजयात यांनी मोलाचे योगदान दिल आहे. यानंतर वेगवान गोलंदाजीची जबाबदारी उपकर्णधार भुवनेश्वर कुमार आणि वेगवान स्टार नवदीप सैनी यांच्यावर असेल. मात्र, दीपक चहर आणि चेतन सकारिया हेदेखील संघात चांगले पर्याय आहेत, पण सैनीला भुवीसह संधी दिली जाऊ शकते.


भारत संभाव्य प्लेईंग  इलेव्हन - शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), मनीष पांडे, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार आणि नवदीप सैनी

 श्रीलंका संभाव्य  प्लेईंग  इलेव्हन - पथुम निसंका, चरिथ असालंका, दासुन शनाका (कर्णधार), वानिंदु हसरंगा, रमेश मेंडिस, धनंजय डी सिल्वा, चमिका करुणारत्ने, दुष्मंथा चमीरा, प्रवीण जयविक्रमा.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs NZ 2nd Test : तो रडतोय...; सिराजला दुसऱ्या कसोटीतून वगळल्यानंतरचे 'ते' दृश्य पाहून माजी क्रिकेटपटूही सुन्न; काळजाला भिडणारी प्रतिक्रिया
तो रडतोय...; सिराजला दुसऱ्या कसोटीतून वगळल्यानंतरचे 'ते' दृश्य पाहून माजी क्रिकेटपटूही सुन्न; काळजाला भिडणारी प्रतिक्रिया
Mumbai Indians Captain News : मुंबईचा नवा कर्णधार कोण? रोहित, बुमराह की सूर्यकुमार; आज 27 नोव्हेंबरला संध्याकाळी होणार मोठा फैसला, हार्दिक पांड्याशी खास संबंध
मुंबईचा नवा कर्णधार कोण? रोहित, बुमराह की सूर्यकुमार; आज 27 नोव्हेंबरला संध्याकाळी होणार मोठा फैसला, हार्दिक पांड्याशी खास संबंध
IND vs NZ 2nd Test Day 1 Stump : कधी भारताचा वरचष्मा, तर कधी न्यूझीलंडचा पलटवार! पहिल्या दिवसाचा खेळ संपला, कोण पडले भारी?
कधी भारताचा वरचष्मा, तर कधी न्यूझीलंडचा पलटवार! पहिल्या दिवसाचा खेळ संपला, कोण पडले भारी?
अंपायरने श्रीलंकेच्या खेळाडूला NOT OUT देताच राडा; तिलक वर्मा संतापला, वैभव सूर्यवंशीही धावत आला, शाहबाजने डोक्याला हात लावला, काय घडलं?, VIDEO
अंपायरने श्रीलंकेच्या खेळाडूला NOT OUT देताच राडा; तिलक वर्मा संतापला, वैभव सूर्यवंशीही धावत आला, शाहबाजने डोक्याला हात लावला, काय घडलं?, VIDEO

व्हिडीओ

Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report
Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delimitation Bill : डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाचा संबंध काय? महाराष्ट्रावर परिणाम काय?  
डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाचा संबंध काय? महाराष्ट्रावर परिणाम काय?  
चंद्रपूरमध्ये नगरसेवकांचे मानधन दुप्पटीने वाढले; पैशासाठी सर्वपक्षीय एकटवले, महापालिकेत गुण्यागोविंदाने मंजुरी
चंद्रपूरमध्ये नगरसेवकांचे मानधन दुप्पटीने वाढले; पैशासाठी सर्वपक्षीय एकटवले, महापालिकेत गुण्यागोविंदाने मंजुरी
RJD Delimitation Bill Support : मोठी बातमी! इंडिया आघाडीत मोठी फूट, तेजस्वी यादवांच्या RJD चा मतदारसंघ पुनर्रचनेला पाठिंबा, भाजपची ताकद वाढली?
मोठी बातमी! इंडिया आघाडीत मोठी फूट, तेजस्वी यादवांच्या RJD चा मतदारसंघ पुनर्रचनेला पाठिंबा, भाजपची ताकद वाढली?
आला रे, आला... रोहित शर्मा पुन्हा कर्णधारपदी, मुंबई इंडियन्सची मोठी घोषणा, म्हणाला, माझ्यासाठी अभिमानास्पद
आला रे, आला... रोहित शर्मा पुन्हा कर्णधारपदी, मुंबई इंडियन्सची मोठी घोषणा, म्हणाला, माझ्यासाठी अभिमानास्पद
Rohit Pawar Delimitaion: शरद पवारांची भेट घेतल्यानंतर रोहित पवारांची डिलिमिटेशन विधेयकावर प्रतिक्रिया; राष्ट्रवादी (एसपी) पाठिंबा देणार की नाही?
शरद पवारांची भेट घेतल्यानंतर रोहित पवारांची डिलिमिटेशन विधेयकावर प्रतिक्रिया; राष्ट्रवादी (एसपी) पाठिंबा देणार की नाही?
Delimitation Bill Update : मोठी बातमी : लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार, मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
मोठी बातमी : लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार, मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
Delimitation: डिलिमिटेशन म्हणजे काय? केंद्रातील एनडीए सरकारकडे किती संख्याबळ, विधेयक मंजुरीसाठी किती आवश्यक?
डिलिमिटेशन म्हणजे काय? केंद्रातील एनडीए सरकारकडे किती संख्याबळ, विधेयक मंजुरीसाठी किती आवश्यक?
Sunetra Pawar: कोणतीही गुन्हेगारी प्रवृत्ती खपवून घेणार नाही; पुण्यातील हल्ल्याच्या घटनेनंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये, अधिकाऱ्यांना दिल्या कडक कारवाईच्या सूचना
कोणतीही गुन्हेगारी प्रवृत्ती खपवून घेणार नाही; पुण्यातील हल्ल्याच्या घटनेनंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये, अधिकाऱ्यांना दिल्या कडक कारवाईच्या सूचना
Embed widget