IND Vs SA T-20 World Cup Final : सध्या टी-20 विश्वचषकाच्या अंतिम लढतीचा थरार रंगला आहे. भारताने दरमदार कमबॅक केले आहे. भारताचा डाव सांभाळण्यात किंग कोहलीने (Virat Kohli) मोठी भूमिका निभावली. भारतीय संघाच्या एकूण 176 धावा झाल्या असून दक्षिण अफ्रिकेला विजयासाठी 177 धावा कराव्या लागणार आहेत. दरम्यान, भारताच्या एकूण धावफलकातील तब्बल 76 धावा या एकट्या विराट कोहलीच्या आहेत. त्याने 59 चेंडूंमध्ये या धावा केल्या आहेत. 


रोहित शर्मा, ऋषभ पंत यांची निराशाजनक कामगिरी (India Vs South Africa Final)


विराट कोहलीने सलामीला येऊन भारताला सावरलं. मैदानात उतरताच भारताचा सलामीवीर रोहित शर्मा धडाकेबाज खेळी करेल असा अंदाज लावला जात होता. त्याने याआधीच्या सामन्यांत केलेली कामगिरी पाहता तो याही सामन्यात कमीत कमी अर्धशतकी खेळी करेल, अशी आशा व्यक्त केली जात होती. पण तो पाच चेंडू खेळून अवघ्या 9 धावा करू शकला. त्यानंतर ऋषभ पंत मैदानात आला. पण त्यानेही निराशा केली. तो फक्त दोन चेंडू खेळू शकला. त्याला एकही धाव करता आली नाही.


सूर्यकुमार यादवनेही केली निराशा


सूर्यकुमार यादव हा आघाडीचा फलंदाज आहे. दोन गडी बाद झाले तेव्हा भारताच्या अवघ्या 23 धावा होत्या. त्यामुळे सूर्यकुमार यादव भारताचा डाव सांभाळेल अशी आशा होती. पण तोही फक्त तीनच धावा करू शकला. त्यानंतर मात्र विराट कोहलीने संपूर्ण मैदानाचा ताबा घेत सौफेर फटकेबाजी केली. 


विराटने केली कमाल, धावांचा पाऊस


विराट कोहलीने 59 चेंडूंमध्ये 76 धावांची खेळी केली. आपल्या या खेळीत त्याने 6 चौकार आणि 2 षटकार लगावले. भारताचा संघ 150 धावातरी करू शकणार का? अशी शंका व्यक्त केली जात असताना कोहलीने ही धावांची किमया साधली. विशेष म्हणजे कोहलीला भारताचा अक्षर पटेल यानेदेखील तेवढीच साथ दिली.  सधी मिळेल तेव्हा त्याने फटकेबाजी केली. त्याने 31 चेंडूंमध्ये एक चौकार आणि चार षटकार यांच्या मदतीने 47 धावा केल्या. या दोघांच्या खेळीमुळे भारताला 176 धावसंख्या उभारता आली.  


हेही वाचा :


IND vs SA, Axar Patel : रोहित शर्मानं विश्वास टाकला, अक्षर पटेल भारताची ढाल बनला, विराटच्या साथीनं किल्ला लढवला


IND Vs SA : शिलेदार धारातीर्थी, पण बापूने डाव सांभाळला, अक्षर-विराटच्या जोडीने टीम इंडियाला सावरलं!


India ICC Trophies : 1983 ते 2024... भारताने कधी अन् केव्हा आयसीसी स्पर्धा जिंकली?