List Of ICC Trophies Won By India : टी20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारताचा मुकाबला आज दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. दक्षिण आफ्रिकेनं आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच विश्वचषकाची फायनल गाठलीय. भारतानं टी20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक मारण्याची ही तिसरी वेळ आहे. 2007 साली भारतानं पाकिस्तानला हरवून टी20 विश्वचषकावर आपलं नाव कोरलं होतं. त्यानंतर 2014 सालच्या टी20 विश्वचषकात भारताला फायनलमध्ये श्रीलंकेकडून हार स्वीकारावी लागली होती. आता 2024 टी20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकाविरोधात भिडणार आहे. टी20 विश्वचषक असो किंवा वन डे सामन्यांचा विश्वचषक असो... आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी असो किंवा जागतिक कसोटी विजेतेपद असो... भारतीय संघाला गेल्या 11 वर्षांत सर्वोच्च यशाची चव चाखता आलेली नाही. भारताने 41 वर्षांपूर्वी प्रथमच आयसीसी ट्रॉफी जिंकली होती. तेव्हा कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने 1983 च्या विश्वचषक स्पर्धेवर नाव कोरले होते. 1983 पासून आतापर्यंत भारतीय संघाने कोण कोणती आयसीसी स्पर्धा जिंकली, याबाबत जाणून घेऊयात..


भारताने कधी कधी आयसीसी स्पर्धा जिंकली ?


1983 चा विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघाला आयसीसी चषक जिंकण्यासाठी खूप वाट पाहावी लागणार आहे. तब्बल दोन दशकानंतर भारतीय संघाला आयसीसीचं जेतेपद मिळाले होते. 2002 मध्ये श्रीलंकेसोबत भारताने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले. पावसामुळे चॅम्पियन चषकाच्या फायनलमध्ये पावसाने हजेरी लावली होत. मुसळधार पावसामुळे हा सामना अनिर्णित सोडण्यात आला. त्यामुळे दोन्ही संघाला संयुक्त जेतेपद देण्यात आले. त्यानंतर 5 वर्षांनंतर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली  भारताने 2007 टी-20 विश्वचषक जिंकून इतिहास रचला. अशा प्रकारे टीम इंडियाने तिसऱ्यांदा आयसीसी ट्रॉफी जिंकली.


भारताला चौथ्या आयसीसी स्पर्धेवर नाव कोरण्यास जास्त वेळ लागला नाही. चार वर्षानंतर झालेल्या वनडे विश्वचषकावर नाव कोरले. 2011 मध्ये भारतात झालेल्या वनडे विश्वचषकात एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील भारताने संघाने श्रीलंकेचा पराभव करत चषकावर नाव कोरले. त्यानंतर अवघ्या दोन वर्षानंतर झालेल्या चॅम्पियन ट्रॉफीवर भारताने नाव कोरले. त्यावेळीही संघाची धुरा एमएस धोनी याच्या खांद्यावर होती. धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने वनडे वर्ल्डकप, टी20 वर्ल्डकप आणि चॅम्पियन ट्रॉफीवर नाव कोरलेय. भारताकडे दोन वनडे वर्ल्डकप, एक टी20 वर्ल्डकप आणि दोनवेळा चॅम्पियन ट्रॉफीवर नाव कोरले आहे. 2013 नंतर भारतीय संघाला आयसीसी चषकावर नाव कोरता आलेले नाही.