INDvsSA : सध्या टी-20 विश्वचषकाच्या अंतिम भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात लढत होत आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून आधी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारताची अपेक्षेप्रमाणे सुरुवात झाली. कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत या आघाडीच्या फलंदाजांना कमाल करता आली नाही. मात्र टीम इंडियाची धुरा विराट कोहली आणि अक्षर पटेल या जोडगळीने सांभाळली. 


भारताचे तीन फलंदाज धारातीर्थी


मैदानात उतरताच भारताचा सलामीवीर रोहित शर्मा धडाकेबाज खेळी करेल असा अंदाज लावला जात होता. त्याने याआधीच्या सामन्यांत केलेली कामगिरी पाहता तो याही सामन्यात कमीत कमी अर्धशतकी खेळी करेल, अशी आशा व्यक्त केली जात होती. पण तो पाच चेंडू खेळून अवघ्या 9 धावा करू शकला. त्यानंतर ऋषभ पंत मैदानात आला. पण त्यानेही निराशा केली. तो फक्त दोन चेंडू खेळू शकला. त्याला एकही धाव करता आली नाही. सूर्यकुमार यादव हा आघाडीचा फलंदाज आहे. दोन गडी बाद झाले तेव्हा भारताच्या अवघ्या 23 धावा होत्या. त्यामुळे सूर्यकुमार यादव भारताचा डाव सांभाळेल अशी आशा होती. पण तोही फक्त तीनच धावा करू शकला. त्यानंतर मात्र विराट आणि अक्षर पटेल यांच्या जोडीने नेत्रदीपक कामगिरी करत भारताला सावरले.


विराट कोहलीने शेवटच्या सामन्यात दाखवला जलवा


विराट कोहली याआधीच्या सामन्यांत फारशी चांगली कामगिरी करू शकला नसला तरी या सामन्यात मात्र तो आपली चुणूक दाखवतोय. सध्या तो आपला दमदार खेळ दावखतोय. भारत कठीण काळात असताना विराट तसेच अक्षर पटेल यांनी जबरदस्त खेळी करत टीम इंडियाचा धावफलक पळता ठेवला. दोघांनाही जमेल तशी फटकेबाजी करत भारताला सावरले. सध्या विराट कोहलीच्या 48 धावा झाल्या आहेत. 


अक्षर पटेलने आपलं काम केलं


भारताचे तीन गडी बाद झाले तेव्हा भारताच्या अवघ्या 34 धावा झाल्या होत्या. त्यामुळे आता टीम इंडियाचे काय होणार? असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. पण अक्षर पटेलने मैदानात येत आपला खेळ दाखवला. त्याने योग्य संधी सोडून जमेल तसे चौकार, षटकार लगावले. परिणाम विराटच्या मदतीने त्याने 31 चेंडूत 47 धावा केल्या. भारताच्या  106 धावा झालेल्या असताना 14 व्या षटकात तो धावचित झाला. तो अर्धशतक करून शकला नाही. पण टीम इंडियाच्या दृष्टीने त्याने आपले काम केले होते.   


फायनलसाठी दोन्ही संघाची प्लेईंग 11 -


टीम इंडिया : 


रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह. 


दक्षिण आफ्रिका : 


क्विंटन डिकॉक (विकेटकीपर), रीजा हेंड्रिक्स, एडेन मार्कराम (कर्णधार), ट्रस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन  डेविड मिलर, मार्को यानसेन, केशव महाराज, कगिसो रबाडा, एनरिक नॉर्टजे आणि तबरेज़ शम्सी.


हेही वाचा :


IND vs SA T20 World Cup Final : केशव महाराजची घातक ओव्हर, रोहित शर्मा अन् रिषभ पंतची विकेट काढली, भारताला मोठे धक्के


India ICC Trophies : 1983 ते 2024... भारताने कधी अन् केव्हा आयसीसी स्पर्धा जिंकली?


नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने, रोहितसेना प्रथम फलंदाजी करणार