T20 World Cup Final 2024, Ind vs SA  बारबाडोस : भारतानं रोहित शर्मा, (Rohit Sharma) सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि रिषभ पंत (Rishabh Pant) हे लवकर बाद झाल्यानंतर अक्षर पटेलनं (Axar Patel) विराट कोहलीच्या (Virat Kohli) साथीनं भारताचा डाव सावरला. रोहित शर्मानं पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, केशव महाराज आणि रबाडाच्या दमदार गोलंदाजीमुळं भारताला मोठे धक्के बसले. केशव महाराजनं रोहित शर्मा आणि रिषभ पंतला दुसऱ्या ओव्हरमध्ये बाद केलं.  यांनतर सूर्यकुमार यादव देखील लवकर बाद झाला. यानंतर रोहित शर्मा आणि राहुल द्रविडनं अक्षर पटेलला वरच्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्याचा निर्णय घेतला. अक्षर पटेलनं हा कॅप्टन आणि कोचनं टाकलेला विश्वास सार्थ ठरवला. 


बापूंची बॅटिंगमध्ये धमाल, दक्षिण आफ्रिका बेहाल


अक्षर पटेलला बापू या नावानं ओळखलं जातं. 34 धावांवर तीन विकेट गेल्यानंतर अक्षर पटेलला रोहित शर्मानं प्रमोट केलं होतं. पाकिस्तान विरुद्ध ज्या प्रकारे अक्षर पटेलला वरच्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवलं होतं त्याप्रमाणं आज देखील फलंदाजीला पाठवलं. इंग्लंडच्या फलंदाजांना बॉलिंगच्या जोरावर नाचवणाऱ्या अक्षर पटेलनं आज आफ्रिकेच्या गोलंदाजांना आपल्या फलंदाजीच्या जोरावर नाचवलं. अक्षर पटेलनं  चार षटकार आणि एक चौकार मारत 31 बॉलमध्ये 47 धावा केल्या. अक्षर पटेल धावबाद झाल्यानं त्याला परत जावं लागलं.


विराट कोहलीसोबत 72 धावांची भागिदारी


भारताला ज्यावेळी गरज होती त्यावेळी अक्षर पटेलनं विराट कोहलीच्या साथीनं धावा करत टीमला संकटातून बाहेर काढलं. अक्षर पटेलनं चार षटकार मारत आफ्रिकेच्या गोलंदाजांवर दबाव आणला. विराट कोहली एका बाजूनं डाव सावरत असताना अक्षर पटेलनं आक्रमक भूमिका घेत फटकेबाजी केली. अक्षर पटेलनं विराट कोहलीसोबत 72 धावांची भागिदारी केली. यामध्ये अक्षर पटेलच्या 47 धावा होत्या. अक्षर पटेलनं रोहित शर्मा आणि राहुल द्रविडनं टाकलेला विश्वास सार्थ ठरवला.


फायनलसाठी दोन्ही संघाची प्लेईंग 11 -


टीम इंडिया : 


रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह. 


दक्षिण आफ्रिका : 


क्विंटन डिकॉक (विकेटकीपर), रीजा हेंड्रिक्स, एडेन मार्कराम (कर्णधार), ट्रस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन  डेविड मिलर, मार्को यानसेन, केशव महाराज, कगिसो रबाडा, एनरिक नॉर्टजे आणि तबरेज़ शम्सी.


संबंधित बातम्या :


नशिबानं टीम इंडियाला कौल दिला, आता काम रोहितसेनेचं, पाहा नाणेफेकीचा भन्नाट योगायोग!


India ICC Trophies : 1983 ते 2024... भारताने कधी अन् केव्हा आयसीसी स्पर्धा जिंकली?