एक्स्प्लोर

चौथ्या वन डेसाठी डिव्हिलियर्सचं कमबॅक, टीम इंडियासाठी धोक्याची घंटा?

दक्षिण आफ्रिकेच्या दृष्टीने जमेची बाजू म्हणजे दुखापतीतून सावरलेला एबी डिव्हिलियर्स या सामन्यात पुनरागमन करणार आहे.

जोहान्सबर्ग : विराट कोहलीची टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यात एक नवा इतिहास घडवण्यासाठी सज्ज झाली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांमधली चौथी वन डे उद्या जोहान्सबर्गच्या मैदानात खेळवण्यात येत आहे. ही वन डे जिंकून सहा वन डे सामन्यांच्या मालिकेत 4-0 अशी विजयी आघाडी घेण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न राहिल. भारताने 1992-93 सालच्या पहिल्या दौऱ्यानंतर दक्षिण आफ्रिकेत वन डे सामन्यांची मालिका कधीही जिंकलेली नाही. पण विराट कोहलीच्या टीम इंडियाला आता 25 वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेत वन डे सामन्यांची मालिका जिंकण्याची संधी आहे. विशेष म्हणजे सलग चौथी वन डे जिंकली, तर आयसीसीच्या क्रमवारीत भारतीय संघाला नंबर वनवर विराजमान होता येईल. दक्षिण आफ्रिकेच्या दृष्टीने जमेची बाजू म्हणजे दुखापतीतून सावरलेला एबी डिव्हिलियर्स या सामन्यात पुनरागमन करणार आहे. डिव्हिलियर्सला कसं रोखणार? दक्षिण आफ्रिकेचा संघ मैदानात गुलाबी जर्सीत उतरणार आहे. याच जर्सीत तीन वर्षांपूर्वी डिव्हिलियर्सने वन डेतील सर्वात वेगवान शतक ठोकलं होतं. गुलाबी जर्सीत दक्षिण आफ्रिकेने आतापर्यंत खेळलेल्या सर्व सामन्यात विजय मिळवला आहे. 2011 साली पहिल्यांदाच ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेससाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ गुलाबी जर्सीत मैदानात उतरला होता. भारताविरुद्ध नेहमीच चांगली कामगिरी करणाऱ्या डिव्हिलियर्सला रोखण्याचं आव्हान यावेळी भारतासमोर असेल. भारताविरुद्धच्या 29 वन डे सामन्यांमध्ये त्याने आतापर्यंत एकूण 1295 धावा केल्या आहेत. यामध्ये 6 शतकं आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे. भारताविरुद्धच्या गेल्या तीन वन डे सामन्यांमध्ये त्याचे दोन शतकं आहेत. डिव्हिलियर्सला रोखण्याची जबाबदारी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमरा यांच्यावर असेल. कारण, डिव्हिलियर्स फिरकीपटूंविरुद्ध नेहमीच चांगला खेळतो. रिव्हर्स स्वीप ही त्याची ताकद आहे. कसोटी मालिकेत बुमराने डिव्हिलियर्सला तीन वेळा बाद केलं आहे. तर भुवनेश्वर कुमारने गेल्या तीन वन डे सामन्यात डिव्हिलियर्सला दोन वेळा माघारी धाडलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SL 1st Test DAY-2 Live : भारत 288/2… पडिक्कल नाबाद! पंत मैदानात उतरणार, श्रीलंकेच्या गोलंदाजांची आज खरी कसोटी; दुसऱ्या दिवशी काय घडणार? जाणून घ्या LIVE अपडेट्स
भारत 288/2… पडिक्कल नाबाद! पंत मैदानात उतरणार, श्रीलंकेच्या गोलंदाजांची आज खरी कसोटी; दुसऱ्या दिवशी काय घडणार? जाणून घ्या LIVE अपडेट्स
Ind vs Sl 1st Test Day-2 : गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
IND vs SL 1st Test DAY-1 : KL राहुल रिटायर्ड हर्ट झाला, गिल लवकर गेला… पण पडिक्कल नडला! शतकाचा तडाखा देत श्रीलंकेची झोप उडवली, गॉलमध्ये पहिल्या दिवशी नेमकं काय घडलं?
KL राहुल रिटायर्ड हर्ट झाला, गिल लवकर गेला… पण पडिक्कल नडला! शतकाचा तडाखा देत श्रीलंकेची झोप उडवली, गॉलमध्ये पहिल्या दिवशी नेमकं काय घडलं?
Devdutt Padikkal Century : संधी मिळाली... देवदत्त पडिक्कल तुटून पडला! तिसऱ्याच सामन्यात ठोकलं पहिलं शतक, 695 दिवसांनी कोहलीच्या जागी टीम इंडियाला मिळाला शतकवीर
संधी मिळाली... देवदत्त पडिक्कल तुटून पडला! तिसऱ्याच सामन्यात ठोकलं पहिलं शतक, 695 दिवसांनी कोहलीच्या जागी टीम इंडियाला मिळाला शतकवीर

व्हिडीओ

Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Ind vs Sl 1st Test Day-2 : गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
Toxic Fame Yash: एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
Akola Abhay Patil and Shinde Camp: एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
Embed widget