एक्स्प्लोर

द. आफ्रिकेचा 179 धावात खुर्दा, भारताची मालिकेत 3-0 ने आघाडी

या विजयासह भारताने मालिकेत 3-0 अशी आघाडी घेतली.

केपटाऊन : टीम इंडियाने केपटाऊनच्या वन डेत दक्षिण आफ्रिकेचा 124 धावांनी धुव्वा उडवून, 6 सामन्यांच्या मालिकेत सलग तिसरा विजय साजरा केला. या विजयासह भारताने मालिकेत 3-0 अशी आघाडी घेतली. या वन डेत टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 304 धावांचं आव्हान दिलं होतं. त्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा डाव 179 धावांत आटोपला. भारताकडून यजुवेंद्र चहलने चार, तर कुलदीप यादवने चार फलंदाजांना माघारी धाडलं. तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने दोन विकेट्स घेतल्या. विराटचं वन डेतलं 34 वं शतक साजरं टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने अगदी सवयीनुसार केपटाऊन वन डेतही शतक झळकावलं. त्याचं हे वन डे कारकीर्दीतलं 34 वं शतक ठरलं. भारताच्या डावात विराटने शिखर धवनच्या साथीने रचलेली 140 धावांची भागीदारी मोलाची ठरली. भारतीय कर्णधाराने 159 चेंडूत 160 धावांची खेळी केली. या खेळीला 12 चौकार आणि 2 षटकारांचा साज होता. तर शिखर धवनने 63 चेंडूंत 76 धावांची खेळी बारा चौकारांनी सजवली. रोहित शर्मा शून्यावर बाद झाल्यानंतर शिखर धवन आणि विराट कोहलीच्या शतकी भागीदारीने भारताला मजबूत स्थितीत आणलं. शिखर धवन मोठा फटकार मारण्याच्या नादात बाद झाला. त्याच्यानंतर आलेला अजिंक्य रहाणे 11, तर हार्दिक पंड्या 14 धावांवर बाद झाला. केदार जाधवलाही काही खास कामगिरी करता आली नाही. तो एक धाव करुन माघारी परतला. महेंद्रसिंह धोनीने 10, तर भुवनेश्वर कुमारने नाबाद 16 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून जेपी ड्युमिनीने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या. तर इम्रान ताहीर, आंदिले फेहुलकवायो, ख्रिस मॉरिस, कागिसो रबाडा यांनी प्रत्येकी एका फलंदाजाला माघारी धाडलं.

महत्त्वाच्या बातम्या

Team India : आयसीसीचा टीम इंडियाला दणका, कॅप्टन श्रेयस अय्यरकडून शिक्षा मान्य, पहिल्या कसोटीपूर्वी भारतावर कारवाई कशामुळं?
आयसीसीचा टीम इंडियाला दणका, पहिल्या कसोटीपूर्वी भारतावर कारवाई कशामुळं?
Sachin Tendulkar on MS Dhoni: धोनीच्या 'त्या' टॅलेंटविषयी विषयी सौरव गांगुलीसोबत बोललेलो, सचिन तेंडुलकरची माहीच्या IPL मधील निवृत्तीवर खास पोस्ट
महेंद्रसिंह धोनीची IPL मधून निवृत्ती, सचिन तेंडुलकरची खास पोस्ट, बांगलादेशातील आठवण शेअर
Madhuri Dixit Lookalike Actress: हुबेहूब माधुरी दीक्षितसारखा चेहरा; विवाहित क्रिकेटपटूसोबत प्रेम अन् लग्न, करिअरला केला होता रामराम
हुबेहूब माधुरी दीक्षितसारखा चेहरा; विवाहित क्रिकेटपटूसोबत प्रेम अन् लग्न, करिअरला केला होता रामराम
IND vs NZ 1st Test Day-1 Time : पहाटे अलार्म लावा... भारत-न्यूझीलंड सामन्याची वेळ बदलली! पहिली कसोटी किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या सर्वकाही
पहाटे अलार्म लावा... भारत-न्यूझीलंड सामन्याची वेळ बदलली! पहिली कसोटी किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या सर्वकाही

व्हिडीओ

Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report
Sanjay Raut Delhi : अश्विनी भिडेंच्या पत्राची दखल घेत ३०० प्रकल्पांना तात्काळ स्थगिती द्यावी
Shiv Sena PC : सोनिया गांधींच्या पुस्तकाचा निषेध,शिवसेनेने पुस्तकाचा 'तो' मजकूर फाडला
Shaina NC Balasaheb Thackeray Photo: ओहहह नोनोनो....; शिंदेंच्या शायना एनसींनी चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडला, पेडणेकर संतापल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : सोने चांदी खरेदी करणाऱ्यांची दिवाळी, सलग सातव्या दिवशी सोनं स्वस्त, चांदी 5000 रुपयांनी स्वस्त
सोने चांदी खरेदी करणाऱ्यांची दिवाळी, सलग सातव्या दिवशी सोनं स्वस्त, चांदी 5000 रुपयांनी स्वस्त
दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार
दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या हालचाली गतीमान; विधिमंडळ अधिवेशनात पूर्तता, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या हालचाली गतीमान; विधिमंडळ अधिवेशनात पूर्तता, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
Sudhir Mungantiwar: सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
Satara DCC Bank : दोन पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज, वचपा काढल्याचा दावा करणं चुकीचं, मकरंद पाटील म्हणाले महायुती म्हणून तिन्ही पक्ष एकत्र आल्यानं जिल्ह्यात चांगला संदेश गेला...
दोन पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज, निवडणूक बिनविरोध,वचपा काढल्याचा दावा करणं चुकीचं: मकरंद पाटील
शायना एनसी असू, नाहीतर कोणीही...; शिवसेना प्रवक्त्यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडला, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
शायना एनसी असू, नाहीतर कोणीही...; शिवसेना प्रवक्त्यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडला, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
Belonging: A Journey of Love : सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
Embed widget