एक्स्प्लोर

भारताचा पुन्हा लाजिरवाणा पराभव, मालिकाही गमावली

केपटाऊन कसोटीपाठोपाठ सेन्च्युरियन दक्षिण आफ्रिकेनं भारताचा धुव्वा उडवला.

सेंच्युरियन : विराट कोहलीच्या टीम इंडियाला केपटाऊन कसोटीपाठोपाठ सेन्च्युरियन कसोटीतही लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. या कसोटीत दक्षिण आफ्रिकेनं भारताचा 135 धावांनी धुव्वा उडवला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघाला विजयासाठी 287 धावांचं आव्हान दिलं होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाची चौथ्या दिवसअखेर तीन बाद 35 अशी केविलवाणी अवस्था झाली होती. भारतीय संघाचा अख्खा डाव आज 151 धावांत आटोपला. चौथ्या दिवशी सलामीच्या मुरली विजय आणि लोकेश राहुल यांच्यापाठोपाठ विराट कोहलीही माघारी परतला. कोहली बाद झाल्यावर कैफ म्हणाला, इट्स ऑल ओव्हर, वीरुला लगानची आठवण परंतु पाचव्या दिवसाच्या सुरुवातीलाच चेतेश्वर पुजारा 19 धावांवर धावचीत झाला. त्यावेळी भारताच्या 50 धावाही पूर्ण झाल्या नव्हत्या. त्यानंतर रबाडाने पार्थिव पटेलला बाद केलं. पटेललाही 19 धावाच करता आल्या. मग त्यानंतर हार्दिक पंड्या 6 आणि अश्विन 3 धावा करुन माघारी परतले. त्यानंतर रोहित शर्माने मोहम्मद शमीच्या साथीने फटकेबाजी केली. मात्र रबाडाने त्याला 46 धावांवर तर एनगिडीनं शमीला 28 धावांवर बाद केलं. दक्षिण आफ्रिकेतर्फे एनगिडीनं 39 धावांत सहा, तर रबादानं 47 धावांत तीन फलंदाजांना माघारी धाडलं. त्यामुळे केपटाऊनपाठोपाठ सेन्च्युरियन कसोटीतही भारतीय संघावर पराभवाची नामुष्की ओढावली. दुसऱ्या डावात टीम इंडियाची घसरगुंडी, विजयासाठी २८७ धावांचं आव्हान आफ्रिकेचं 287 धावांचं आव्हान दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 335 धावा केल्या होत्या. त्यानंतर कर्णधार विराट कोहलीच्या दीडशतकाच्या जोरावर भारताचा पहिला डाव 307 धावांवर आटोपला. त्यामुळे आफ्रिकेकडे 28 धावांची आघाडी होती. मग दुसऱ्या डावात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा डाव 258 धावांमध्ये गुंडाळला. त्यामुळे आफ्रिकेच्या पहिल्या डावातील 28 धावांची आघाडी आणि दुसऱ्या डावातील 258 धावा मिळून, भारतासमोर 287 धावांचं आव्हान होतं. पंचांशी हुज्जत महागात, विराटवर दंडाची कारवाई विराटचं शतक त्याआधी, विराट कोहलीने झळकावलेल्या मॅरेथॉन शतकाने टीम इंडियाला सर्व बाद 307 धावांची मजल मारुन दिली. विराटचं कसोटी कारकीर्दीतलं हे एकविसावं शतक ठरलं. त्याने 217 चेंडूंमधली 152 धावांची खेळी 15 चौकारांनी सजवली. विराटने हार्दिक पंड्याच्या साथीने सहाव्या विकेटसाठी 45 धावांची आणि रवीचंद्रन अश्विनच्या साथीने सातव्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी रचली. कसोटी संक्षिप्त धावफलक  दक्षिण आफ्रिका पहिला डाव - सर्वबाद 335 भारत पहिला डाव - सर्वबाद  307 दक्षिण आफ्रिका दुसरा डाव - सर्वबाद  258 भारत दुसरा डाव - सर्वबाद 151

महत्त्वाच्या बातम्या

IND vs ZIM : लढाई एकतर्फी होणार नाही, सलग दोन देशांविरुद्ध पराभवाचं तोंड पाहणाऱ्या टीम इंडियाला झिम्बाब्वेच्या कर्णधाराचं आव्हान, सिकंदर रझा म्हणाला...
लढाई एकतर्फी होणार नाही, टीम इंडियाला झिम्बाब्वेच्या कर्णधाराचं आव्हान, सिकंदर रझा नेमंक काय म्हणाला?
Team India : भारताची पराभवाची मालिका थांबेना, इंग्लंडमध्ये टी 20  नंतर वनडे मालिका गमावली,  तीन खेळाडूंसाठी टीमची दारं बंद?
भारताची पराभवाची मालिका थांबेना, इंग्लंडमध्ये वनडे मालिकेत पराभव, तीन खेळाडूंसाठी भारताची दारं बंद
Rohit Sharma Ind Vs Eng ODI: मुंबईचा राजा रोहित शर्माने सिलेक्टर्सच्या नाकावर टिच्चून शतक ठोकलं, वय झालं म्हणणाऱ्यांना तोंडघशी पाडलं
मुंबईचा राजा रोहित शर्माने सिलेक्टर्सच्या नाकावर टिच्चून शतक ठोकलं, वय झालं म्हणणाऱ्यांना तोंडघशी पाडलं
Ferran Torres Story: वयाच्या सहाव्या वर्षी आजोबांच्या तालमीत प्रशिक्षण; घरच्या कुत्र्याला गोलकीपर बनवत सराव; विश्वचषकात स्पेनला विश्वचषक मिळवून देणारा फेरान टोरेस कोण?
वयाच्या सहाव्या वर्षी आजोबांच्या तालमीत प्रशिक्षण; घरच्या कुत्र्याला गोलकीपर बनवत सराव; विश्वचषकात स्पेनला विश्वचषक मिळवून देणारा फेरान टोरेस कोण?

व्हिडीओ

Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक
Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
अमरावतीतून वारी, काठी टेकत आली 80 वर्षांची आजी; कलेक्टरांनी दिलं विठ्ठलाचं VIP दर्शन, पुंडलिकाची आठवण
अमरावतीतून वारी, काठी टेकत आली 80 वर्षांची आजी; कलेक्टरांनी दिलं विठ्ठलाचं VIP दर्शन, पुंडलिकाची आठवण
दिल्लीत नरेंद्र मोदींच्या घरासमोर राडा, पोलिसांनी राहुल गांधींना उचललं; प्रियंका गांधींसह माजी मुख्यमंत्रीही ताब्यात
दिल्लीत नरेंद्र मोदींच्या घरासमोर राडा, पोलिसांनी राहुल गांधींना उचललं; प्रियंका गांधींसह माजी मुख्यमंत्रीही ताब्यात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
पुणेकरांसाठी गुडन्यूज ! म्हाडाकडून 634 सदनिकांच्या विक्रीसाठी दुसरी जाहिरात प्रसिद्ध; MIG गटासाठी उत्पन्नाची अट शिथिल
पुणेकरांसाठी गुडन्यूज ! म्हाडाकडून 634 सदनिकांच्या विक्रीसाठी दुसरी जाहिरात प्रसिद्ध; MIG गटासाठी उत्पन्नाची अट शिथिल
Rahul Gandhi : राहुल गांधींचा पोलिसांना चकवा, खासदारांसह थेट मोदींच्या घराला घेरावा, मोदींनी चर्चेसाठी विश्वासू मंत्री धाडला; नेमकं काय घडलं? 
राहुल गांधींचा पोलिसांना चकवा, खासदारांसह थेट मोदींच्या घराला घेरावा, मोदींनी चर्चेसाठी विश्वासू मंत्री धाडला; नेमकं काय घडलं? 
Rain Update: पुढील 4 ते 5 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, तर कोकण, विदर्भाला ऑरेंज अलर्ट, मराठवाड्यात 'पाणीबाणी', पुणे वेधशाळेचा अंदाज
पुढील 4 ते 5 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, तर कोकण, विदर्भाला ऑरेंज अलर्ट, मराठवाड्यात 'पाणीबाणी', पुणे वेधशाळेचा अंदाज
ओटीटीवर क्राइम सिरीज पाहून काटा काढला, पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं; पोलिसांनी गुढ उलगडलं
ओटीटीवर क्राइम सिरीज पाहून काटा काढला, पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं; पोलिसांनी गुढ उलगडलं
Embed widget