एक्स्प्लोर
Advertisement
IND vs SA 1st T20 : पावसामुळे भारत-दक्षिण आफ्रिकेदरम्यानचा पहिला ट्वेन्टी ट्वेन्टी सामना रद्द
दुपारी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यानंतर पावसाचा जोर काहीसा ओसरला. मात्र सामना सुरू होण्यापूर्वी पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली. परिणामी पंचानी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
धर्मशाला : भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांमधला धर्मशालामधील पहिला ट्वेन्टी ट्वेन्टी सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. नियोजित वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता सामना सुरु होणं अपेक्षित होतं. पण त्यानंतरही पावसाची संततधार सुरुच राहिल्यानं पंचांनी अखेर खेळ रद्द करण्याचा निर्णय घेतला. उभय संघातल्या तीन ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या मालिकेतला पुढचा सामना बुधवारी मोहालीत खेळवण्यात येणार आहे.
दुपारी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यानंतर पावसाचा जोर काहीसा ओसरला. मात्र सामना सुरू होण्यापूर्वी पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली. परिणामी पंचानी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. धर्मशाला येथे गेल्या दोन दिवसांपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. रविवारी दिवसभर पावसाने हजेरी लावल्यामुळे मैदानावर पाणी साचले होते. परिणामी पंचानी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. बीसीसीआयने ट्वीट करत ही माहिती दिली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या तीन टी-20 सामन्याची मालिका होणार आहे. धर्मशाला येथे होणारा पहिला सामना पावसाने पाण्यात गेला आहे. दुसरा सामना चंदीगड येथे खेळवला जाणार आहे. आगामी ट्वेन्टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या दृष्टीने कर्णधार विराट कोहली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेन्टी-20 सामन्यांच्या मालिकेकडे पाहात आहे. भारताने वेस्ट इंडिजमधील ट्वेन्टी-20 मालिकेत 3-0 असे यश मिळवले होते. त्यामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास वाढलेला आहे.The rains continue and the match has officially been called off. See you in Chandigarh for the 2nd T20I #INDvSA pic.twitter.com/BjZ9Y7QAf2
— BCCI (@BCCI) September 15, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
राजकारण
क्राईम
भारत
Advertisement