एक्स्प्लोर

INDvsNZ : भारताचा दणदणीत विजय, मालिकेत विजयी आघाडी

विराट कोहलीची टीम इंडिया पहिल्या दोन्ही वन डेत निर्विवाद वर्चस्व गाजवल्यानंतर मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यासाठी सज्ज झाली आहे.

माऊंट मॉन्गॅनुई (न्यूझीलंड) : रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं रचलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर टीम इंडियाने तिसऱ्या वन डेत न्यूझीलंडवर सात विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला. टीम इंडियाने या विजयासह पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली. या सामन्यात न्यूझीलंडने टीम इंडियाला विजयासाठी 244 धावांचं आव्हान दिलं होतं. रोहित आणि विराटने तिसऱ्या विकेटसाठी 113 धावांची भागीदारी रचून भारतीय डावाला आकार दिला. रोहितने 77 चेंडूत तीन चौकार आणि दोन षटकारांसह 62 धावांची, तर विराटने सहा चौकार आणि एका षटकारासह 60 धावांची खेळी उभारली. मग अंबाती रायुडू आणि दिनेश कार्तिकने चौथ्या विकेटसाठी अभेद्य भागीदारी रचून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. INDvsNZ : भारताचा दणदणीत विजय, मालिकेत विजयी आघाडी रॉस टेलर आणि टॉम लॅथमच्या दमदार फलंदाजीनंतरही न्यूझीलंडला तिसऱ्या वन डेत सर्वबाद 243 धावांची मजल मारली आली. त्यामुळे टीम इंडियासमोर विजयासाठी 244 धावांचं आव्हान आहे. टीम इंडियाच्या प्रभावी माऱ्यासमोर न्यूझीलंडची सुरुवातीला तीन बाद 59 अशी अवस्था झाली होती. पण त्यानंतर टेलर आणि लॅथमने 119 धावांची भागीदारी रचून न्यूझीलंडचा डाव सावरला. टेलरचं शतक अवघ्या सात धावांनी हुकलं. त्याने 106 चेंडूत नऊ चौकारांसह 93 धावांची खेळी उभारली. तर लॅथमने 64 चेंडूत 51 धावांचं योगदान दिलं. भारताकडून मोहम्मद शमीने तीन तर यजुवेंद्र चहल, हार्दिक पंड्या आणि भुवनेश्वर कुमारनं प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. INDvsNZ : भारताचा दणदणीत विजय, मालिकेत विजयी आघाडी त्याआधी भारत आणि न्यूझीलंड संघातील तिसऱ्या वनडे सामन्यात यजमान न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हा सामना आज माऊंट मॉन्गॅनुई येथे खेळवण्यात येत आहे. विराट कोहलीची टीम इंडिया पहिल्या दोन्ही वन डेत निर्विवाद वर्चस्व गाजवल्यानंतर मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यासाठी सज्ज झाली आहे. आजच्या सामन्यात भारतीय संघात दोन बदल करण्यात आले आहेत. यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीला विश्रांती देण्यात आली आहे. तर विजय शंकरला संघातून वगळण्यात आलं आहे. त्यांच्याजागी संघात दिनेश कार्तिक आणि हार्दिक पंड्याचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय संघ : रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार), अंबाती रायुडू, केदार जाधव, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, यजुवेंद्र चहल न्यूझीलंड संघ : मार्टिन गप्टिल, कॉलिन मन्रो, केन विल्यमसन (कर्णधार), रॉस टेलर, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), हेन्री निकोलस, मिचेल सँटनर, डो ब्रेसवेल, इश सोढी, लॉकी फर्गुसन, ट्रेन्ट बोल्ट INDvsNZ : भारताचा दणदणीत विजय, मालिकेत विजयी आघाडी टीम इंडियाने पाच सामन्यांच्या मालिकेत नेपियर आणि माऊंट मॉन्गानुईचे वन डे सामने जिंकून 2-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे तिसरी वन डे जिंकून मालिकाही खिशात घालण्याचा विराट आणि त्याच्या शिलेदारांचा प्रयत्न राहिल. या वन डेत टीम इंडियाची मदार ही प्रामुख्याने कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहलच्या फिरकी माऱ्यावर राहिल. दरम्यान, आजच्या सामन्यात अष्टपैलू हार्दिक पंड्याचा संघात समावेश करण्यात आला आहे. 'कॉफी विथ करण'मध्ये महिलांविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी बीसीसीआयने त्याच्यावर बंदी घातली होती. तिसऱ्या सामन्यानंतर कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियात कसोटी आणि एकदिवसीय मालिकेतील ऐतिहासिक विजयानंतर, आपल्या मोहिमेचा शेवट न्यूझीलंडविरुद्धची मालिका जिंकण्याचा विराट कोहलीचा प्रयत्न असेल.

महत्त्वाच्या बातम्या

Saurabh Choughule Ajinkya Rahane: अजिंक्य राहाणेचा क्रिकेटला अखेरचा रामराम, अन् मराठी अभिनेत्याला आलं भरून, लहानपणीचा फोटो केला शेअर, म्हणाला...
अजिंक्य राहाणेचा क्रिकेटला अखेरचा रामराम, अन् मराठी अभिनेत्याला आलं भरून, लहानपणीचा फोटो केला शेअर, म्हणाला...
Bhuvneshwar Kumar : खतरनाक क्लास असलेल्या गोलंदाजाची वर्ल्डकपमध्ये एन्ट्रीची चर्चा; भुवनेश्वर कुमारने पहिल्यांदाच बोलला, नेमकं काय म्हणाला? सगळेच झाले भावूक
खतरनाक क्लास असलेल्या गोलंदाजाची वर्ल्डकपमध्ये एन्ट्रीची चर्चा; भुवनेश्वर कुमारने पहिल्यांदाच बोलला, नेमकं काय म्हणाला? सगळेच झाले भावूक
CWG 2026: 'ईशान्य भारत अन् काश्मीर गायब'; ग्लासगोतील रेस्टॉरंटच्या नॅपकिनवर भारताचा अपूर्ण नकाशा, स्टार बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन आणि BFI चा तीव्र आक्षेप
'ईशान्य भारत अन् काश्मीर गायब'; ग्लासगोतील रेस्टॉरंटच्या नॅपकिनवर भारताचा अपूर्ण नकाशा, स्टार बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन आणि BFI चा तीव्र आक्षेप
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Khadakwasla Dam : पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
Embed widget