एक्स्प्लोर

मार्श-हॅण्ड्सकोम्बने भारताचा विजय हिरावला

रांची:  रांची: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधली रांचीची तिसरी कसोटी अखेर अनिर्णीत राहिली. ऑस्ट्रेलियाच्या शॉन मार्श आणि पीटर हॅण्ड्सकोम्बनं पाचव्या विकेटसाठी 124 धावांची झुंजार भागीदारी रचून, टीम इंडियाच्या विजयाच्या आशांना सुरुंग लावला. पंचांनी पाचव्या दिवसाचा खेळ थांबवला त्या वेळी ऑस्ट्रेलियानं सहा बाद 204 धावांची मजल मारली होती. पीटर हॅण्ड्सकोम्बने नाबाद 72 धावा केल्या. त्याने तब्बल 200 चेंडू खेळून काढले. तर मार्शने 197 चेंडूत 53 धावा केल्या. या कसोटीत आदल्या दिवशीच्या दोन बाद 23 धावांवरून ऑस्ट्रेलियाची पहिल्या सत्रात चार बाद 63 अशी अधिकच बिकट अवस्था झाली. त्यामुळं भारताच्या विजयाच्या आशा उंचावल्या होत्या. त्या कठीण परिस्थितीत शॉन मार्श आणि पीटर हॅण्ड्सकोम्बनं नेटानं ऑस्ट्रेलियाचा किल्ला लढवला. रवींद्र जाडेजानं शॉन मार्शला माघारी धाडून ही जोडी फोडली.   मग रवीचंद्रन अश्विननं ग्लेन मॅक्सवेलचा काटा काढला. पण तोवर खूप उशीर झाला होता. ऑस्ट्रेलियानं ही कसोटी वाचवण्यासाठी आवश्यक वेळ खेळून काढला होता. उपहारापूर्वी इशांत शर्मा आणि रवींद्र जाडेजाने ऑस्ट्रेलियाला दोन दणके दिले. उपहारापर्यंत ऑस्ट्रेलियाची अवस्था 4 बाद 83 अशी झाली होती. आधी इशांत शर्माने सलामीवीर मॅट रेनशॉला पायचीत केलं. मग कर्णधार स्मिथच्या त्रिफळा उडवून जाडेजाने मोठा अडथळा दूर केला. रेनशॉने 44  तर स्मिथने 21 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने आज काच्या 2 बाद 23 धावांवरुन खेळाला सुरुवात केली. रेनशॉ आणि स्मिथने संयमी फलंदाजी करत धावसंख्या हलती ठेवली. भारताची आघाडी कमी करण्याच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरु होती. मात्र इशांतने भेदक गोलंदाजी करत रेनशॉला तंबूत धाडलं. मग पुढच्याच षटकात जाडेजाने कर्णधार स्मिथचा काटा काढला. त्यापूर्वी कालच्या चौथ्या दिवशी जाडेजाने डेव्हिड वॉर्नर आणि नाईट वॉचमन नॅथन लायनला तंबूत धाडलं होतं. चौथ्या दिवसाचा खेळ भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधली रांचीची तिसरी कसोटी चौथ्या दिवसअखेर मोठ्या नाट्यमय वळणावर उभी ठाकली. या कसोटीत टीम इंडियानं आपला पहिला डाव नऊ बाद 603 या धावसंख्येवर घोषित करून, 152 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर रवींद्र जाडेजानं डेव्हिड वॉर्नर आणि नॅथन लायनचा काटा काढून चौथ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाची दोन बाद 23 अशी बिकट अवस्था केली. या कसोटीत टीम इंडियाला सनसनाटी विजय मिळवण्याची संधी आहे. भारतीय संघाला रांची कसोटीवर वर्चस्व मिळवून दिलं ते पुजारा आणि साहा यांनी सातव्या विकेटसाठी रचलेल्या 199 धावांच्या भागिदारीनं. पुजारानं 21 चौकारांसह 202 धावांची खेळी उभारली. रिद्धिमान साहानं आठ चौकार आणि एका षटकारासह 117 धावांची खेळी केली. त्यानंतर रवींद्र जाडेजानं पाच चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद 55 धावा ठोकून भारतीय डावाला गती दिली. संबंधित बातम्या
11 तास फलंदाजी, 500 चेंडू खेळणारा पुजारा एकमेव भारतीय!
रांची कसोटीत भारताला विजयाची संधी, कांगारुंवर 129 धावांची आघाडी
पुजाराला बाद घोषित करण्यासाठी अम्पायरनं बोट वर केलं पण...
DRS मुळं रिद्धिमान साहाला जीवदान, ऑस्ट्रेलियन संघ नाराज  

महत्त्वाच्या बातम्या

Argentina Beats Switzerland Highlights : 90 मिनिटांत निर्णय नाही... मग एक्स्ट्रा टाइममध्ये अर्जेंटिनाने स्वित्झर्लंडचा केला गेम! मेस्सीच्या संघाची विजयी डरकाळी अन् थेट सेमीफायनल गाठली
90 मिनिटांत निर्णय नाही... मग एक्स्ट्रा टाइममध्ये अर्जेंटिनाने स्वित्झर्लंडचा केला गेम! मेस्सीच्या संघाची विजयी डरकाळी अन् थेट सेमीफायनल गाठली
India lose No 1 T20I spot : इंग्लंडमध्ये पहिल्यांदाच असं घडलं, टीम इंडियाचा 4 वर्षांचा घमंड उतरला, ICC रँकिंगमध्येही उलटफेर, भारताला मोठा फटका
इंग्लंडमध्ये पहिल्यांदाच असं घडलं, टीम इंडियाचा 4 वर्षांचा घमंड उतरला, ICC रँकिंगमध्येही उलटफेर, भारताला मोठा फटका
Vaibhav Sooryavanshi Crying : टीम इंडियाचा पराभव होताच वैभव सूर्यवंशी भर मैदानात एकटा बसून रडू लागला; इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यानंतर काय घडलं?, VIDEO
टीम इंडियाचा पराभव होताच वैभव सूर्यवंशी भर मैदानात एकटा बसून रडू लागला; इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यानंतर काय घडलं?, VIDEO
Shreyas Iyer Ind vs Eng 5th T20 : आमच्याकडून मोठ्या चुका झाल्या...; क्लीन स्वीप अन् 6 पराभवानंतर कॅप्टन श्रेयस अय्यरचा संयम सुटला; व्हिलनचा केला पर्दाफाश, नेमकं काय म्हणाला?
आमच्याकडून मोठ्या चुका झाल्या...; क्लीन स्वीप अन् 6 पराभवानंतर कॅप्टन श्रेयस अय्यरचा संयम सुटला; व्हिलनचा केला पर्दाफाश, नेमकं काय म्हणाला?

व्हिडीओ

Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News: 74 मिनिटे ट्रेन थांबली संधी साधत दरोडेखोर घुसले; महिलेची 5 तोळ्यांची चैन ओढली, दगडफेकीत प्रवासी जखमी, यशवंतपूर-बिकानेर एक्स्प्रेसमध्ये पहाटेच्या सुमारास थरार
74 मिनिटे ट्रेन थांबली संधी साधत दरोडेखोर घुसले; महिलेची 5 तोळ्यांची चैन ओढली, दगडफेकीत प्रवासी जखमी, यशवंतपूर-बिकानेर एक्स्प्रेसमध्ये पहाटेच्या सुमारास थरार
Pune Moshi Building Collapse: घरात बिर्याणीचा बेत, मित्रासोबत जेवण्याचा 'तो' एक निर्णय अन् हसता-खेळता संसार एका क्षणात उद्ध्वस्त; मोशी दुर्घटनेतील मन हेलावून टाकणारी कहाणी
घरात बिर्याणीचा बेत, मित्रासोबत जेवण्याचा 'तो' एक निर्णय अन् हसता-खेळता संसार एका क्षणात उद्ध्वस्त; मोशी दुर्घटनेतील मन हेलावून टाकणारी कहाणी
Vinayak Raut Daughter-in-law Girija Raut Marathi News: पती म्हणायचा, भारतात नको...इंटरनॅशनल लोकेशन्सलाच जाऊन शारीरिक संबंध ठेवू शकतो; विनायक राऊतांच्या सूनेने पोलिसांना सगळं सांगितलं!
पती म्हणायचा, भारतात नको...इंटरनॅशनल लोकेशन्सलाच जाऊन शारीरिक संबंध ठेवू शकतो; विनायक राऊतांच्या सूनेने पोलिसांना सगळं सांगितलं!
Harshit Rana Ruled Out of ODI Series : इंग्लंड वनडे मालिकेआधी टीम इंडियात खळबळ! गौतम गंभीरच्या सर्वांत फेव्हरेट खेळाडूची संघातून अचानक एक्झिट, नेमकं काय घडलं?
इंग्लंड वनडे मालिकेआधी टीम इंडियात खळबळ! गौतम गंभीरच्या सर्वांत फेव्हरेट खेळाडूची संघातून अचानक एक्झिट, नेमकं काय घडलं?
'सैराट' फेम अभिनेत्याच्या वडिलांच्या प्रकृतीविषयी समजताच आधी एकनाथ शिंदेच्या सूचना, आता उदय सामंतही मदतीला धावले, तातडीने दिला चेक
'सैराट' फेम अभिनेत्याच्या वडिलांच्या प्रकृतीविषयी समजताच आधी एकनाथ शिंदेच्या सूचना, आता उदय सामंतही मदतीला धावले, तातडीने दिला चेक
Maharashtra Farmers: आधीच पावसाची पाठ, त्यात बोगस बियाणांचा सुळसुळाट; राज्यातील बळीराजा अस्मानी अन् सुलतानी संकाटात, विदर्भ मराठवाड्यातील शेतकरी रडकुंडीला 
आधीच पावसाची पाठ, त्यात बोगस बियाणांचा सुळसुळाट; राज्यातील बळीराजा अस्मानी अन् सुलतानी संकाटात, विदर्भ मराठवाड्यातील शेतकरी रडकुंडीला 
Pune Crime News: नवऱ्याची महिलेशी मैत्री; पत्नीने जाब विचारताच वाद अन् संताप, नवऱ्याने घर पेटवलं, बायको वाचली पण घरातील तीन निष्पाप मांजरींचा होरपळून मृत्यू, पुण्यातील घटना
नवऱ्याची महिलेशी मैत्री; पत्नीने जाब विचारताच वाद अन् संताप, नवऱ्याने घर पेटवलं, बायको वाचली पण घरातील तीन निष्पाप मांजरींचा होरपळून मृत्यू, पुण्यातील घटना
Girish Mahajan on Eknath Khadse: एकनाथ खडसेंच्या भाजप घरवापसीच्या चर्चा पुन्हा रंगल्या; गिरीश महाजनांचा नाथाभाऊंना खोचक टोला, म्हणाले, 'त्यांची थेट दिल्लीला...'
एकनाथ खडसेंच्या भाजप घरवापसीच्या चर्चा पुन्हा रंगल्या; गिरीश महाजनांचा नाथाभाऊंना खोचक टोला, म्हणाले, 'त्यांची थेट दिल्लीला...'
Embed widget