एक्स्प्लोर

INDvsAUS : भारताची ऑस्ट्रेलियावर सहा विकेट्सनी मात

कोहलीने त्याच्या कारकीर्दीतलं 39वं शतक झळकावून भारताला विजयपथावर नेलं. भारताने विजयासाठीचं 299 धावांचं लक्ष्य चार चेंडू राखत पूर्ण केलं.

अॅडलेड : टीम इंडियानं अॅडलेडच्या दुसऱ्या वन डेत ऑस्ट्रेलियाचा सहा विकेट्सनी धुव्वा उडवून भारतीय चाहत्यांना विजयाच्या गोडव्याची भेट दिली आहे. भारताच्या या विजयाचा प्रमुख शिल्पकार ठरला तो कर्णधार विराट कोहली. कोहलीने त्याच्या कारकीर्दीतलं 39वं शतक झळकावून भारताला विजयपथावर नेलं. भारताने विजयासाठीचं 299 धावांचं लक्ष्य चार चेंडू राखत पूर्ण केलं. विराट कोहलीनं अॅडलेडच्या वन डेत झळकावलेलं हेच शतक टीम इंडियाच्या विजयात निर्णायक ठरलं. भारतीय कर्णधाराचं वन डे कारकीर्दीतलं हे 39वं शतक ठरलं. त्यानं हे शतक 108 चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारांनी सजवलं. यापूर्वी ऑस्ट्रेलियाने शॉन मार्शच्या दमदार शतकाच्या जोरावर अॅडलेड वन डेत भारतासमोर 299 धावांचं आव्हान ठेवलं आहे. मर्यादित 50 षटकांच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा डाव 9 बाद 298 धावांवर आटोपला. डावखुऱ्या मार्शने आपल्या वन डे कारकीर्दीतलं सातवं शतक साजरं केलं. त्याने 123 चेंडूत 131 धावांची दमदार खेळी उभारली. मार्शच्या या खेळीला 11 चौकार आणि 3 षटकारांचा साज होता. त्याने उस्मान ख्वाजासह 55 आणि ग्लेन मॅक्सवेलसह 94 धावांची भागीदारी रचून ऑस्ट्रेलियाच्या डावाला आकार दिला. मॅक्सवेलने ३७ चेंडूत पाच चौकार आणि एका षटकारासह 48 धावांची खेळी केली. भारताकडून भुवनेश्वर कुमारने चार, मोहम्मद शमीने तीन तर रवींद्र जाडेजाने एक विकेट घेतली. INDvsAUS : भारताची ऑस्ट्रेलियावर सहा विकेट्सनी मात टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातला दुसरा वन डे सामना आज अॅडलेडमध्ये खेळवण्यात येत आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंचने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात एक बदल करण्यात आला आहे. या सामन्यात खालीद अहमदच्या जागी त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाने पहिली वन डे जिंकून, तीन वन डे सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे मालिकेतील आव्हान कायम राखायचं, असेल तर टीम इंडियाला आजचा सामना जिंकणं अनिवार्य आहे. रोहित शर्माने शतक झळकावलं, पण विराट कोहलीच्या टीम इंडियाला सिडनी वन डेत 34 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. सिडनीतल्या त्या पराभवाचे उट्टे काढण्याच्या इराद्याने आता विराट कोहलीची टीम इंडिया सज्ज झाली आहे अॅडलेडच्या दुसऱ्या वन डेसाठी.. INDvsAUS : भारताची ऑस्ट्रेलियावर सहा विकेट्सनी मात टीम इंडियाच्या दृष्टीने अॅडलेडच्या वन डेच चिंतेची बाब म्हणे अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीची कामगिरी. सिडनीत पाचव्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून भारतीय डावाला वेग देण्यात धोनीला सपशेल अपयश आलं. सिडनीत त्याला 96 चेंडूंत केवळ 51 धावांची खेळी उभारता आली. एकेरी-दुहेरी धावा वेचून स्ट्राईक बदलता ठेवण्यात त्याला आलेलं अपयश भारताला चांगलंच भोवलं. धोनीने रोहित शर्मासोबत रचलेल्या 137 धावांच्या भागीदारीने भारतीय डाव सावरल्याचं चित्र दिसत असलं तरी ही भागीदारी टीम इंडियाला जिंकून देऊ शकलेली नाही. कारण या भागीदारीसाठी रोहित शर्मा आणि धोनी यांनी तब्बल 171 चेंडू खर्ची घातले सिडनीच्या वन डेत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीला वेसण घालण्यात भारतीय आक्रमणही अपयशी ठरलं. हार्दिक पंड्यावर झालेल्या निलंबनाच्या कारवाईने टीम इंडियातला समतोल बिघडला आहे. त्यात हुकमी यॉर्कर टाकणाऱ्या जसप्रीत बुमराचीही उणीव टीम इंडियाला चांगलीच जाणवली. बुमराच्या अनुपस्थितीत भारतीय संघव्यवस्थापनाने यॉर्करधारी आक्रमणाची जबाबदारी भुवनेश्वर कुमारच्या खांद्यावर सोपवली आहे. त्या जबाबदारीचं गांभीर्य ओळखून, दुसऱ्या वन डेआधी तो यॉर्करवर हुकूमत मिळवण्यासाठी कसून सराव करताना दिसला. टीम इंडियाला 2007 सालानंतर ऑस्ट्रेलियातल्या वन डे सामन्यांच्या मालिकेत मोठं यश मिळालेलं नाही. त्यामुळे अॅडलेडच्या मैदानातून मालिकेत कमबॅक करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न राहिल.

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Eng 2nd T20 : वैभवचा ऐतिहासिक डेब्यू फिका! कर्णधार म्हणून श्रेयस अय्यर पुन्हा नापास, आयर्लंडनंतर इंग्लंडने भारताला गुडघ्यावर आणलं
वैभवचा ऐतिहासिक डेब्यू फिका! कर्णधार म्हणून श्रेयस अय्यर पुन्हा नापास, आयर्लंडनंतर इंग्लंडने भारताला गुडघ्यावर आणलं
Ind vs Eng 2nd T20 Live Update : जॅकब बॅथेलचा कहर! टीम इंडियाला एकहाती लोळवत इंग्लंडचा करिष्माई विजय
जॅकब बॅथेलचा कहर! टीम इंडियाला एकहाती लोळवत इंग्लंडचा करिष्माई विजय
Ind vs Eng 2nd T20 : संजू सॅमसन संघातून डच्चू, कोपऱ्यात तोंड पाडून उभा होता, तितक्यात मागून गौतम गंभीर आला अन्... कॅमेऱ्यासमोर नेमकं काय घडलं? पाहा Video
संजू सॅमसन संघातून डच्चू, कोपऱ्यात तोंड पाडून उभा होता, तितक्यात मागून गौतम गंभीर आला अन्... कॅमेऱ्यासमोर नेमकं काय घडलं? पाहा Video
Vaibhav Sooryavanshi 1st International Six : वैभव सूर्यवंशी नावाच्या वादळाची एन्ट्री! जोफ्रा आर्चरच्या पहिल्याच चेंडूवर विकेटकीपरच्या डोक्यावरून 'क्लासिक' षटकार, पाहा Video
वैभव सूर्यवंशी नावाच्या वादळाची एन्ट्री! जोफ्रा आर्चरच्या पहिल्याच चेंडूवर विकेटकीपरच्या डोक्यावरून 'क्लासिक' षटकार, पाहा Video

व्हिडीओ

Coffee With Kaushik Sachin Ahir : ठाकरेंना का सोडलं? सचिन अहिरांचे मोठे खुलासे!
CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढला, कुटुंब आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानं एक दिवस आराम करणार असल्याची माहिती  
एकनाथ शिंदे यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढला, कुटुंब आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानं एक दिवस आराम करणार असल्याची माहिती
Sachin Ahir : वरळी कोणाचा सातबारा नाही, 2029 ला महायुतीची जागा निवडून आणणार, सचिन अहिर नेमकं काय म्हणाले?
2029 ला वरळीतून विधानसभा निवडणूक लढवणार का? विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर काय म्हणाले?
Vaibhav Sooryavanshi : सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, 2 षटकार मारले, वैभव सूर्यवंशीनं पहिल्या डावात किती धावा केल्या?
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, 2 षटकार मारले, वैभव सूर्यवंशीनं पहिल्या डावात किती धावा केल्या?
Telegram : टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली, कारवाईसाठी 15 दिवसांची मुदत, नेमकं काय घडलं?
टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली,15 दिवसांचा वेळ दिला, नेमकं काय घडलं?
EPFO: कोट्यवधी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज,पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज जमा करा, ईपीएफओकडून आदेश जारी
कोट्यवधी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज,पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज जमा करा, ईपीएफओकडून आदेश जारी
Devendra Fadnavis on Missing Link Potholes: नव्याकोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे कसे पडले, देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितलं इंजिनिअरिंग टेक्निक, म्हणाले, 'पहिल्या पावसानंतर दुसरी लेयर येते'
नव्याकोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे कसे पडले, देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितलं इंजिनिअरिंग टेक्निक, म्हणाले, 'पहिल्या पावसानंतर दुसरी लेयर येते'
Ketan Agrawal Case : केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
Devendra Fadanvis: CM देवेंद्र फडणवीस पाहतात Netflix वरील ही वेबसीरिज; रिॲलिटी शोचेही विशेष चाहते
CM देवेंद्र फडणवीस पाहतात Netflix वरील ही वेबसीरिज; रिॲलिटी शोचेही विशेष चाहते
Embed widget