एक्स्प्लोर

INDvsAUS 1st20 Preview : परदेशात विराट ब्रिगेडसमोर कांगारुंचं आव्हान

टीम इंडियानं नुकत्याच मायदेशात झालेल्या ट्वेन्टी ट्वेन्टी मालिकेत वेस्ट इंडिजवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं होतं. पण भारतीय खेळपट्टया आणि ऑस्ट्रेलियन खळपट्ट्यांमध्ये खूप फरक आहे.

ब्रिस्बेन : टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या तीन ट्वेन्टी 20 सामन्यांच्या मालिकेला आजपासून ब्रिस्बेनमधून सुरुवात होत आहे. भारतीय वेळेनुसार पहिल्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्याला दुपारी 1.30 वाजता सुरुवात होईल. येत्या दोन महिन्यांच्या कालावधीत भारतीय संघ ऑस्ट्रेलियात तीन ट्वेन्टी 20, चार कसोटी आणि तीन वन डे सामन्यांच्या मालिका खेळणार आहे. विराट कोहलीची टीम इंडिया आणि अॅरॉन फिंचची ऑस्ट्रेलियन फौज मालिकेतल्या पहिल्या ट्वेन्टी सामन्याच्या निमित्तानं एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. आयसीसीच्या ट्वेन्टी ट्वेन्टी क्रमवारीत टीम इंडिया पहिल्या दुसऱ्या स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलियन संघ तिसऱ्या स्थानी. त्यामुळे ट्वेन्टी ट्वेन्टीच्या या लढाईत क्रिकेटरसिकांना तुल्यबळ लढतीची अपेक्षा राहिल. टीम इंडियानं नुकत्याच मायदेशात झालेल्या ट्वेन्टी ट्वेन्टी मालिकेत वेस्ट इंडिजवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं होतं. पण भारतीय खेळपट्टया आणि ऑस्ट्रेलियन खळपट्ट्यांमध्ये खूप फरक आहे. त्यामुळे या मालिकेत कांगारुंविरुद्ध ठोस रणनीती आखणं विराट कोहली आणि भारतीय संघव्यवस्थापनासमोरचं मोठं आव्हान ठरणार आहे. ट्वेन्टी 20 : ऑस्ट्रेलियन भूमीवरील टीम इंडियाची कामगिरी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमध्ये ऑस्ट्रेलियन भूमीवर आजवर सहा लढती खेळवण्यात आल्या आहेत. त्यात चार वेळा टीम इंडियानं बाजी मारली आहे. तर केवळ दोनच ट्वेन्टी 20 ऑस्ट्रेलियाला जिंकता आल्या आहेत. त्यामुळे ट्वेन्टी 20 सामन्यातली कांगारुंविरुद्धची हीच कामगिरी टीम इंडियाचा आत्मविश्वास वाढवणारी ठरेल. टीम इंडियाची जमेची बाजू ट्वेन्टी ट्वेन्टी मालिकेसाठी अनुभवी आणि युवा खेळाडूंचा भरणा ही भारतीय संघाच्या दृष्टिने जमेची बाजी ठरु शकते. भारताच्या फलंदाजीची धुरा प्रामुख्यानं रोहित शर्मा, कर्णधार कोहली, शिखर धवन आणि लोकेश राहुल यांच्यावर असेल. रिषभ पंत आणि दिनेश कार्तिकमुळे भारताची मधली फळीही मजबूत मानली जात आहे. याशिवाय भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा, उमेश यादवच्या वेगवान माऱ्यासह कुलदीप आणि यजुवेंद्रची फिरकी महत्वाची भूमिका बजावणारी ठरेल. ऑस्ट्रेलियन खेळपट्टया आगामी कसोटी मालिकेच्या दृष्टिनं ही ट्वेन्टी 20 मालिका महत्वाची ठरणार आहे. भारतीय शिलेदारांना ऑस्ट्रेलियन खेळपट्टया आणि तिथल्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी ही मालिका फायद्याची ठरणार आहे. ऑस्ट्रेलियातल्या वेगवान आणि उसळत्या खेळपट्ट्यांवर खेळणं नेहमीचं आव्हानात्मक असतं. त्यात तिथल्या खेळपट्ट्यांवर उंचपुऱ्या ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा वेग हा कमालीचा असतो. या सर्व कारणांमूळे टीम इंडियासाठी हा दौरा म्हणजे खरी आग्निपरिक्षाच ठराणार आहे. या परीक्षेत आता विराटसेना कशी कामगिरी बजावतेय याकडेच साऱ्या क्रिकेटरसिकांचं लक्ष असणार आहे. संबंधित बातम्या  ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी 20 सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा …मग टीम इंडियावरच निशाणा का? : रवी शास्त्री

महत्त्वाच्या बातम्या

Dinesh Karthik Picks Team India Squad For ODI World Cup 2027: पंत, जडेजा, अर्शदीप OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी दिनेश कार्तिकने निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
पंत, जडेजा, अर्शदीप OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी दिनेश कार्तिकने निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
Abhishek Sharma : 25 षटकार, 15 चौकार, 91 चेंडूत 233 धावा; अभिषेक शर्माने इतिहास-भूगोल बदलला, पाहा हायव्होल्टेज खेळीचा VIDEO
25 षटकार, 15 चौकार, 91 चेंडूत 233 धावा; अभिषेक शर्माने इतिहास-भूगोल बदलला, पाहा हायव्होल्टेज खेळीचा VIDEO
IND vs SL 1st Test : 43 मॅच, 162 विकेट्स, 16 वेळा एका डावात 5 बळी...; श्रीलंकेत बुमराहच्या जागी येणारा 'हा' गोलंदाज नेमका आहे तरी कोण? आकडेवारी तर धडकी भरवणारी
43 मॅच, 162 विकेट्स, 16 वेळा एका डावात 5 बळी...; श्रीलंकेत बुमराहच्या जागी येणारा 'हा' गोलंदाज नेमका आहे तरी कोण? आकडेवारी तर धडकी भरवणारी
WI vs PAK 2nd Test : पहिल्याच दिवशी पाकिस्तानची पळता भुई थोडी, वेस्ट इंडिजने मैदानात रडवून सोडलं, आता बाबरची पोरं शिकार करणार की शरण जाणार?
पहिल्याच दिवशी पाकिस्तानची पळता भुई थोडी, वेस्ट इंडिजने मैदानात रडवून सोडलं, आता बाबरची पोरं शिकार करणार की शरण जाणार?

व्हिडीओ

Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pakistan Blast: पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात
पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात
Bankipur By-election Prashant Kishor: देशातील सर्वाधिक हाय व्होल्टेज पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू; प्रशांत किशोर बाजी मारणार की भाजप गड राखणार?
देशातील सर्वाधिक हाय व्होल्टेज पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू; प्रशांत किशोर बाजी मारणार की भाजप गड राखणार?
Pune Crime News : ट्रिपल सीट दुचाकीचा धक्का लागला, 'गाडी नीट चालवता येत नाही का' म्हटल्यावरून संताप; पुण्याचा बाणेरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला, तिघांना अटक
ट्रिपल सीट दुचाकीचा धक्का लागला, 'गाडी नीट चालवता येत नाही का' म्हटल्यावरून संताप; पुण्याचा बाणेरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला, तिघांना अटक
IND vs SL 1st Test : 43 मॅच, 162 विकेट्स, 16 वेळा एका डावात 5 बळी...; श्रीलंकेत बुमराहच्या जागी येणारा 'हा' गोलंदाज नेमका आहे तरी कोण? आकडेवारी तर धडकी भरवणारी
43 मॅच, 162 विकेट्स, 16 वेळा एका डावात 5 बळी...; श्रीलंकेत बुमराहच्या जागी येणारा 'हा' गोलंदाज नेमका आहे तरी कोण? आकडेवारी तर धडकी भरवणारी
Abhishek Sharma : 25 षटकार, 15 चौकार, 91 चेंडूत 233 धावा; अभिषेक शर्माने इतिहास-भूगोल बदलला, पाहा हायव्होल्टेज खेळीचा VIDEO
25 षटकार, 15 चौकार, 91 चेंडूत 233 धावा; अभिषेक शर्माने इतिहास-भूगोल बदलला, पाहा हायव्होल्टेज खेळीचा VIDEO
Pankaja Munde and Dhananjay Munde: 'कंटाळा आलाय, रिटायर्ड व्हावंसं वाटतं...'; पंकजा अन् धनंजय मुंडेंचं राजकीय निवृत्तीबाबत महत्त्वाचं विधान, बीडच्या राजकारणात चाललंय तरी काय?
'कंटाळा आलाय, रिटायर्ड व्हावंसं वाटतं...'; पंकजा अन् धनंजय मुंडेंचं राजकीय निवृत्तीबाबत महत्त्वाचं विधान, बीडच्या राजकारणात चाललंय तरी काय?
WI vs PAK 2nd Test : पहिल्याच दिवशी पाकिस्तानची पळता भुई थोडी, वेस्ट इंडिजने मैदानात रडवून सोडलं, आता बाबरची पोरं शिकार करणार की शरण जाणार?
पहिल्याच दिवशी पाकिस्तानची पळता भुई थोडी, वेस्ट इंडिजने मैदानात रडवून सोडलं, आता बाबरची पोरं शिकार करणार की शरण जाणार?
Maharashtra Rain: महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरूच! साताऱ्याच्या कोयना-कृष्णा अन् वेण्णा नद्यांचा रौद्रावतार; छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला पाण्याचा वेढा, तर मुंबईतही जोर'धार'
महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरूच! साताऱ्याच्या कोयना-कृष्णा अन् वेण्णा नद्यांचा रौद्रावतार; छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला पाण्याचा वेढा, तर मुंबईतही जोर'धार'
Embed widget