एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
श्रीलंकेला ऑलआऊट करण्यासाठी कठीण मेहनत घेतली : भुवनेश्वर
श्रीलंकेने गोलंदाजीप्रमाणे फलंदाजीही चांगली करत भारतावर 122 धावांची आघाडी घेतली. अखेर श्रीलंकेला 294 धावांवर रोखण्यात भारतीय गोलंदाजांना यश आलं.
कोलकाता : श्रीलंकेला पहिल्या डावात ऑलआऊट करण्यासाठी गोलंदाजांना कठीण मेहनत घ्यावी लागली, असं टीम इंडियाचा गोलंदाज भुवनेश्वर कुमारने सांगितलं. कोलकाता कसोटीचा चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर तो बोलत होता.
श्रीलंकेच्या गोलंदाजांनी भारताचा पहिला डाव 172 धावांवरच गुंडाळला. मात्र श्रीलंकेने गोलंदाजीप्रमाणे फलंदाजीही चांगली करत भारतावर 122 धावांची आघाडी घेतली. अखेर श्रीलंकेला 294 धावांवर रोखण्यात भारतीय गोलंदाजांना यश आलं.
श्रीलंकेला गोलंदाजी करताना पाहून आम्हीही गोलंदाजीसाठी उत्सुक होतो. श्रीलंकेने कमी धावा कराव्या यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न केले. मात्र धैर्य राखूनच खेळात जिंकता येतं, असं भुवी म्हणाला.
दुसऱ्या डावात भारताचं दमदार कमबॅक
लोकेश राहुल आणि शिखर धवन यांनी दिलेल्या 166 धावांच्या सलामीने कोलकाता कसोटीत टीम इंडियाच्या दुसऱ्या डावाचा भक्कम पाया रचला. त्यामुळेच भारताने चौथ्या दिवसअखेर एक बाद 171 अशी दमदार मजल मारली.
चौथ्या दिवसाचा खेळ थांबला, त्या वेळी लोकेश राहुल 73, चेतेश्वर पुजारा दोन धावांवर खेळत होता. शिखर धवनचं शतक अवघ्या सहा धावांनी हुकलं. त्याने 116 चेंडूंत 11 चौकार आणि दोन षटकारांसह 94 धावांची खेळी उभारली. राहुलने 8 चौकारांनी नाबाद 73 धावांची खेळी सजवली.
त्याआधी, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमारच्या प्रभावी आक्रमणाला श्रीलंकेने रंगाना हेराथच्या प्रतिहल्ल्यातून दिलेलं उत्तर सरस ठरलं. त्यामुळेच श्रीलंकेला पहिल्या डावात भारतावर 122 धावांची आघाडी घेता आली.
शमीने 88 धावांत चार आणि भुवनेश्वरने शंभर धावांत चार फलंदाजांना माघारी धाडून श्रीलंकेला रोखण्यासाठी शिकस्त केली. पण हेराथने तळाच्या फलंदाजांना हाताशी धरून श्रीलंकेला सर्व बाद 292 धावांची मजल मारून दिली. हेराथने 105 चेंडूंत नऊ चौकारांसह 67 धावांची खेळी उभारली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement