(Source: ECI/ABP News/ABP Majha)
India Legends vs England Legends : सामना हरलो पण मनं जिंकली, इरफान, गोनीची धडाकेबाजी खेळी
India Legends vs England Legends इंग्लंड लिजेंड्स संघाने केविन पीटरसनच्या वादळी खेळीच्या जोरावर निर्धारित 20 षटकात 7 बाद 188 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना इंडिया लिजेंड्सचा निम्मा संघ धावफलकावर 56 धावा असताना तंबूत परतला होता. मात्र इरफान पठाण आणि मनप्रित गोनीनं टी-20 चा थराराची अनुभूती करुन दिली.
India Legends vs England Legends 9th Match : रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये स्पर्धेत एकाहून एक थरारक सामन्यांना अनुभव प्रेक्षकांना मिळत आहे. काल इंग्लंड लिजेंड विरुद्ध इंडिया लिजेंड सामन्यात देखील असाच थरार पाहायला मिळाला. इंग्लंड लिजेंड्स संघाने केविन पीटरसनच्या वादळी खेळीच्या जोरावर निर्धारित 20 षटकात 7 बाद 188 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना इंडिया लिजेंड्सचा निम्मा संघ धावफलकावर 56 धावा असताना तंबूत परतला होता. मात्र इरफान पठाण आणि मनप्रित गोनीनं टी-20 चा थराराची अनुभूती करुन दिली.
इरफान पठाण आणि मनप्रित गोनीनं अखेरच्या 26 चेंडूत 63 धावा कुटल्या. विरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर आणि युवराज सिंग परतल्यानंतर युसूफ आणि इरफान बंधुंनी मैदानात तग धरुन डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी 43 धावांची भागीदारी करुन मॅचमध्ये असल्याचे संकेत दिले. पण युसूफ बाद झाल्यानंतर पुन्हा सामना इंग्लंडच्या बाजूने वळला. नमन ओझा 12 धावा करुन परतल्यानंतर तळाचा फलंदाज मनप्रितनं प्रेक्षकांची मनं जिंकली.
गोनीनं 16 चेंडूत 4 गगनचुंबी षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने त्याने नाबाद 35 धावांची खेळी केली. इरफान पठाणने चौकार-षटकारांची बरसात करत 34 चेंडूत 64 धावा कुटल्या. सरासरी 15 पेक्षा अधिक धावांची गरज असताना या जोडीने सामना शेवटच्या षटकापर्यंत नेला. अखेरच्या दोन चेंडूवर 8 धावा असताना रियान सायबॉटमने गोनीला मोठा फटका खेळण्याची संधी न देता इंग्लंडला विजय मिळवून दिला. हा सामना इंडिया लिजेंड भलेही हरले असतील मात्र प्रेक्षकांची मनं मात्र इरफान आणि गोनीनं जिंकली.