#IndiaVsNewZealand : टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील विश्वचषक 2023 चा उपांत्य फेरीचा सामना सुरू झाला आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. येथे टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आज दोन्ही संघांच्या प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल झालेला नाही.


सेमीफायनलचा टाॅस जिंकला, आता गुलाल पण लागणार!


रोहित शर्माने टाॅस आपल्याला फारसा फरक पडणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे आज टाॅस जिंकल्यास हिटमॅन कोणता निर्णय घेणार? याची उत्सुकता होती. मात्र, टाॅस जिंकताच रोहितने बॅटिंगचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे वर्ल्डकपच्या इतिहासात टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये टाॅस जिंकल्यानंतर त्या सामन्यात बाजी मारली आहे. 2011 मध्ये भारताने टाॅस जिंकल्यानंतर बाजी मारली होती. त्यानंतर 2015 आणि 2019 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध सेमीफायनलमध्ये भारताने टाॅस  हारला आणि निकालही विरोधात गेल्याने निराशा झाली होती. दरम्यान, नाणेफेक जिंकल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला, 'आम्ही प्रथम फलंदाजी करू. खेळपट्टी चांगली आहे. जरा सावकाश दिसतोय. न्यूझीलंड हा अत्यंत नियमित कामगिरी करणारा संघ आहे. आजचा दिवस आमच्यासाठी खूप मोठा आहे. आमच्या संघात कोणताही बदल झालेला नाही.






न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन म्हणाला की, 'आम्हालाही येथे प्रथम फलंदाजी करायला आवडले असते. आम्ही प्रथम गोलंदाजीमध्ये आमची सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करू. यानंतर दुसऱ्या डावातही दव पडण्याची अपेक्षा असेल. ही एक उत्तम संधी आहे. चार वर्षांपूर्वीची परिस्थिती तशीच आहे पण ठिकाण वेगळे आहे. आम्ही शेवटच्या सामन्यातील त्याच प्लेइंग-11 बरोबर जात आहोत.


टीम इंडिया प्लेइंग-11


रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.


न्यूझीलंडचे प्लेइंग-11 


डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, केन विल्यमसन (कर्णधार), डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, टिम साऊदी, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट.


खेळपट्टीचा मूड कसा आहे?


वानखेडेच्या खेळपट्टीचे स्वरूप येथे झालेल्या गेल्या चार विश्वचषक सामन्यांपेक्षा थोडे वेगळे आहे. आज खेळपट्टी स्लो आहे. खेळपट्टीवर गवत कमी आहे. म्हणजेच येथे फिरकीपटूंना संधी मिळेल. खेळपट्टीच्या मध्यभागी गवत चांगले आहे. अशा परिस्थितीत वेगवान गोलंदाज चेंडू थोडा मागे ठेवून यशस्वी होऊ शकतात. प्रथम फलंदाजी करणे सोपे होणार आहे. दुसऱ्या डावात 20 षटकांसाठी फलंदाजांना वेगवान गोलंदाजांविरुद्ध थोडा संघर्ष करावा लागू शकतो. यानंतर धावांचा पाठलाग सोपा होईल. दव पडल्यास दुसऱ्या डावात फलंदाजी करणे सोपे होईल.


इतर महत्वाच्या बातम्या