Whatsapp Storage : व्हॉट्सअप अॅपच्या (Whatsapp Storage) फिचर्समध्ये नेहमी बदल होत असतात. व्हॉट्सअॅपकडून सातत्याने युजर्ससाठी भन्नाट फिचर्सदेखील उपलब्ध करुन दिले जातात. मात्र आता व्हॉट्सअप चॅटसंदर्भात कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे.  व्हॉट्सअप युजर्सला चॅट बॅकअपसाठी अनलिमिटेड स्टोरेजचा कोटा बंद करण्यात येणार आहे. आता बॅकअप फक्त 15 GB पर्यंत मर्यादित ठेवण्यात येणार आहे.  गुगल अकाऊंटमध्ये जेवढं स्टोरेज असेल तेवढंच स्टोरेज आता व्हॉट्सअपमध्ये बॅकअप म्हणून घेता येणार आहे. Wabetainfo ही वेबसाईट व्हॉट्सअपच्या डेव्हलपमेंटवर नजर ठेवत असते. याच वेबसाईटने ही माहिती शेअर केली आहे. व्हॉट्सअॅप हेल्प सेंटरमध्ये यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. 
 
व्हॉट्सअपच्या या मोठ्या निर्णयामुळे काही युजर्सला मोठा फटका बसणार आहे. जे युजर्स 15 GB पेक्षा जास्त डेटा सेव्ह करतात. व्हिडीओ, चॅट आणि रेग्युलर बॅकअप ठेवत असतात, त्यांना याचा मोठा फटका बसणार आहे. संपूर्ण डेटा सेव्ह करायचा असेल तर तुम्ही गुगल वन सब्सक्रिप्शन घेऊ शकता. 1.99 डॉलर म्हणजेच 165 रुपयांमध्ये 100 GB डेटा विकत घेऊ शकता आणि जर हा डेटा तुम्हाला विकत घ्यायचा नसेल तर वेळोवेळी आपल्या फोनमधील स्टोरेज मॅनेज करणं गरजेचं आहे. 


व्हॉट्सअप डेटा कसा कमी कराल?



  • व्हॉट्सअपमध्ये Disappearing Messages ऑन करु शकतो.

  • हे केल्याने तुमचा बॅकअप मॅनेज होऊ शकतं आणि स्टोरेज वाढणार नाही.

  • वेळोवेळी व्हॉट्सअप मेसेजचं रिव्हू आणि मीडिया क्लिन करत राहा.

  • मीडिया मॅनेज करण्यासाठी डाऊनलोड सेटिंग्जमध्ये काही बदल करणं आवश्यक असेल.

  • ऑटो डाऊनलोड बंद करुन ठेवा.

  • आवश्यक तेवढाच डेटा तुमच्या फोनमध्ये सेव्ह राहील आणि मोबाईलमधील स्टोरेजही वाढणार नाही 


नवीन प्रायव्हसी फिचर


कंपनीने नुकतंच अकाऊंट सिक्युरिटी लक्षात घेत एक नवीन प्रायव्हसी फिचर आणलं आहे, त्याचं नाव आहे - पासकी फिचर (Passkey Feature). हे विशेषतः Android वापरकर्त्यांसाठी आणलं गेलं आहे. या फिचरच्या मदतीने युजर्स फिंगरप्रिंट, फेस आणि पिनद्वारे व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंटमध्ये लॉग इन करू शकतात. हे खास सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणलं गेलं आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या या नवीन फिचरद्वारे युजर्स फिंगरप्रिंट, फेस आणि पिनद्वारे व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंटमध्ये लॉग इन करू शकतात. आता तुम्हाला व्हेरिफिकेशन कोड टाकण्याची गरज भासणार नाही. यामुळे तुमचं अकाऊंट सुरक्षित राहील.


इतर महत्वाची बातमी-


WhatsApp New Feature: व्हॉट्सअ‍ॅप युजर्सची चिंता मिटली! अकाऊंट अनलॉकसाठी आता नवीन फिचर; नक्की कसं काम करणार?