मुंबई : सारा तेंडुलकर शनिवारी (14 नोव्हेंबर) रात्री चित्रपट निर्माता विधू विनोद चोप्रा यांच्या घरी स्पाॅट झाली. सारा टीम भारताचा स्टार क्रिकेटर शुभमन गिलला भेटायला आली होती, असे बोलले जात आहे. मात्र, शुभमन तेथे होता की नाही याची पुष्टी होऊ शकली नाही. 'दैनिक भास्कर'ने याबाबत वृत्त दिलं आहे. 


शुभमन गिलने सोशल मीडियावर विधू विनोद चोप्रा यांच्या '12th फेल' या चित्रपटाचे कौतुक केले होते. विधू विनोद चोप्राने दोघांनाही आपल्या घरी बोलावले होते, असे सांगितले जात आहे. अशीही बातमी आहे की, सारा लवकरच चित्रपटांमध्ये प्रवेश करणार आहे, कदाचित त्यामुळेच ती चित्रपट निर्मात्याच्या घरी पोहोचली होती. 


सारा अली खानने गुपित फोडलं 


सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल यांचं नावं नेहमीच जोडलं जात आहे. अलीकडेच कॉफी विथ करणच्या एका एपिसोडमध्ये करण जोहरने सारा अली खानला शुभमनबद्दल विचारले होते. तेव्हा सारा अप्रत्यक्षपणे म्हणाली की तू चुकीच्या साराला प्रश्न करत आहेस. सारा अली खानच्या या उत्तरातून बरेच काही स्पष्ट झाले.


स्टेडियमवर पोहोचून चिअर 


सारा तेंडुलकरने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या भारत आणि श्रीलंका यांच्यातील विश्वचषक सामन्यालाही हजेरी लावली होती. त्या सामन्यात शुभमनने शानदार खेळी केली. प्रेक्षकांमध्ये बसलेल्या साराने त्याला टाळ्या वाजवून प्रोत्साहन दिले होते.


Jio World Plaza च्या उद्घाटन समारंभातही एकत्र दिसले


काही दिवसांपूर्वीच अंबानींच्या नवीन मॉल जिओ वर्ल्ड प्लाझाच्या उद्घाटनप्रसंगी सारा आणि शुभमन एकत्र दिसले होते. मीडियानेही दोघांना एकत्र स्पॉट केले. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली.


साराचं वैद्यकशास्त्राचं शिक्षण


सारा तेंडुलकरने लंडन विद्यापीठातून वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेतलं आहे. शालेय शिक्षण धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये झाले. सारा तेंडुलकरचे तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर 54 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. काही वर्षांपूर्वी सारा शाहिद कपूरसोबत डेब्यू करणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, त्यानंतर सचिन तेंडुलकरने हे वृत्त फेटाळून लावत आपली मुलगी सध्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करत असल्याचे सांगितले. आता सारा भविष्यात काय निर्णय घेते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.


इतर महत्वाच्या बातम्या