एक्स्प्लोर

England Series Selection | इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेसाठी दोन मोठे खेळाडू संघात परतण्यास सज्ज

भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा संपताच इंग्लंडचा क्रिकेट संघ भारतात येणार आहे. इथं त्यांना भारतीय भूमीत एकदिवसीय, टी20 आणि 4 कसोटी सामनेही खेळायचे आहेत.

England Series Selection इथं बॉर्डर- गावस्कर ट्रॉफीचा खेळ संपताच सुरुवात होणार आहे, ती म्हणजे भारत- विरुद्ध इंग्लंड या मालिकेची. (India) भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा संपताच इंग्लंडचा क्रिकेट संघ भारतात येणार आहे. इथं त्यांना भारतीय भूमीत एकदिवसीय, टी20 आणि 4 कसोटी सामनेही खेळायचे आहेत. भारताकडून चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील बीसीसीआयची राष्ट्रीय निवड समिती (19 जानेवारीला) आज संघाची निवड करणार आहे. ही निवड पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी करण्यात येणार आहे.

सध्याच्या घडीला भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया (Ind Vs Aus) दौऱ्यावर आहे. याचदरम्यान मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास व्हर्च्युअल मिटींगमध्ये इंग्लंडसोबतच्या मालिकेसाठी संघाची निवड करण्यात येईल. यावेळी विराट कोहलीसुद्धा या बैठकीला उपस्थिती लावणार असल्याचं म्हटलं जात आहे.

विराट आणि चेतन शर्मा यांच्याव्यतिरिक्त संघ निवडीसाठीच्या या बैठकीत सुनील जोशी, देबाशिष मोहांती, हरविंदर सिंह यांच्यासह आणखीही काही सदस्यांची उपस्थिती असणार आहे.

IND Vs AUS 4th Test Live Score Updates 

मोठे खेळाडू संघात परतण्यास सज्ज

भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा जवळपास आटोपत आला आहे. असं असतानाच दुखापतीमुळं संघापासून दूर असणारे अनुभवी आणि काही मोठे खेळाडू संघात परतण्यासाठी सज्ज असल्याचं चित्र आहे. सूत्रांच्या माहितीनुसार कर्णधार विराट कोहली, वेगवान गोलंदाज इशांत शर्मा, फिरकी गोलंदाज आर. अश्विन संघात परतण्याची स्पष्ट चिन्हं आहेत.

इथं महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दमदार प्रदर्शन करणारे टी. नटराजन आणि शार्दुल ठाकूर यांना इंग्लंडसोबतच्या दौऱ्यात स्थान मिळण्याची चिन्हं मात्र धुसर आहेत.

गोलंदाजीच्या फळीसाठी भारतीय संघात कुलदीप यादव, शाहबाज नदीम, आर. अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदर यांची पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी संघात वर्णी लागेल.

चेन्नईमध्ये 5 ते 9 फेब्रुवारी या दिवसांत इंग्लंडविरोधात पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. तर, 13 ते 17 फेब्रुवारी या काळात दुसरा कसोटी सामनाही चेन्नईमध्येच खेळला जाणार आहे. इंग्लंडचा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून, हा दौरा संपवून संघ 27 जानेवारीला चेन्नईच्या दिशेनं रवाना होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Indians IPL 2026 : मुंबई इंडियन्सने रातोरात बदलला कोचिंग स्टाफ! आता बॅटिंग कोच म्हणून रॉबिन उथप्पाची नियुक्ती, नव्या कोचिंग स्टाफमध्ये कोणाकोणाला संधी?
मुंबई इंडियन्सने रातोरात बदलला कोचिंग स्टाफ! आता बॅटिंग कोच म्हणून रॉबिन उथप्पाची नियुक्ती, नव्या कोचिंग स्टाफमध्ये कोणाकोणाला संधी?
IND vs NZ 4th T20 Live Score : मालिका खिशात, आता टीम इंडियाचा नवा डाव! चौथ्या टी-20त मोठे बदल होणार? कोण IN अन् कोण OUT, जाणून घ्या LIVE अपडेट
IND vs NZ 4th T20 Live : मालिका खिशात, आता टीम इंडियाचा नवा डाव! चौथ्या टी-20त मोठे बदल होणार? कोण IN अन् कोण OUT, जाणून घ्या LIVE अपडेट
दिवाळीच्या फटाक्यांवरून थेट कोर्टात फटकेबाजी, सुप्रीम कोर्ट म्हणालं, विराट कोहलीची मदत घ्या, नेमकं काय घडलं?
दिवाळीच्या फटाक्यांवरून थेट कोर्टात फटकेबाजी, सुप्रीम कोर्ट म्हणालं, विराट कोहलीची मदत घ्या, नेमकं काय घडलं?
IND vs NZ 4th T20 Live Streaming : 40 हजार प्रेक्षकांसमोर चौथ्या टी-20 सामन्याचा हायव्होल्टेज ड्रामा! भारत-न्यूझीलंड मॅच Freeमध्ये पाहण्यासाठी वापरा 'ही' ट्रिक, जाणून घ्या A टू Z
40 हजार प्रेक्षकांसमोर चौथ्या टी-20 सामन्याचा हायव्होल्टेज ड्रामा! भारत-न्यूझीलंड मॅच Freeमध्ये पाहण्यासाठी वापरा 'ही' ट्रिक, जाणून घ्या A टू Z

व्हिडीओ

Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Devendra Fadnavis Speech : निवडणूक, पोटाचा किस्सा ते राज ठाकरेंना विनंती, फडणवीसांचं तुफान भाषण
Raj Thackeray Speech : फडणवीसांबाबत वक्तव्य, सभागृहात सगळेजण खळखळून हसले, राज ठाकरेंचे भन्नाट भाषण
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
Sanjay Raut On BJP : महाराष्ट्रात बॅलेटवर निवडणुका झाल्या, तुम्ही हारला आहात! राऊतांनी सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mahayuti Crisis: पुणे पदवीधरमध्ये शिवसेनेवर खापर; पण खरी गेम केली राष्ट्रवादीने? पुणे पदवीधरमध्ये भाजपला 'राष्ट्रवादी'ची नाराजी कशी भारी पडली?
पुणे पदवीधरमध्ये शिवसेनेवर खापर; पण खरी गेम केली राष्ट्रवादीने? पुणे पदवीधरमध्ये भाजपला 'राष्ट्रवादी'ची नाराजी कशी भारी पडली?
FDA News : एफडीएच्या आणखी 6 अधिकाऱ्यांचं निलंबन होणार? मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील, कार्यक्षेत्राबाहेर रेड मारणं भोवणार, नेमकं काय आहे प्रकरण?
एफडीएच्या आणखी 6 अधिकाऱ्यांचं निलंबन होणार? मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील, कार्यक्षेत्राबाहेर रेड मारणं भोवणार, नेमकं काय आहे प्रकरण?
Sanjay Gaikwad: मोठी बातमी: शेतकऱ्यांबाबतचं 'ते' वक्तव्य भोवलं, एकनाथ शिंदे संजय गायकवाडांवर संतापले, शिवसेनेतून निलंबित करणार?
मोठी बातमी: शेतकऱ्यांबाबतचं 'ते' वक्तव्य भोवलं, एकनाथ शिंदे संजय गायकवाडांवर संतापले, शिवसेनेतून निलंबित करणार?
Pune Crime News: पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याने दारु पिऊन गाडी चालवली, गाडी थेट फुटपाथवर चढवली, व्हिडीओ व्हायरल होताच निलंबनाची कारवाई
पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याने दारु पिऊन गाडी चालवली, गाडी थेट फुटपाथवर चढवली, व्हिडीओ व्हायरल होताच निलंबनाची कारवाई
Latur News: जीवे मारण्याची धमकी; अपहरण केलं, पैशाचे आमिष अन्...; उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी भाजपच्या उमेदवारावर दबाव, लातूर जिल्हा बँक निवडणुकीत राजकीय वातावरण तापलं
जीवे मारण्याची धमकी; अपहरण केलं, पैशाचे आमिष अन्...; उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी भाजपच्या उमेदवारावर दबाव, लातूर जिल्हा बँक निवडणुकीत राजकीय वातावरण तापलं
Radhika Apte On God Worship: 'माझा देवावर विश्वास नाही, लोकांनी मूर्तीपेक्षा...'; राधिका आपटेचं देव, श्रद्धा आणि भक्तीवर थेट वक्तव्य, नेमकं काय म्हणाली?
'माझा देवावर विश्वास नाही, लोकांनी मूर्तीपेक्षा...'; राधिका आपटेचं देव, श्रद्धा आणि भक्तीवर थेट वक्तव्य, नेमकं काय म्हणाली?
Mumbai Drone Accident Churchgate station: वानखेडे स्टेडियममधून दोन ड्रोन अचानक भिरभिरत आले अन् चर्चगेट रेल्वे स्टेशनवरील प्रवाशाच्या डोक्यावर आदळले, रक्ताची धार लागली अन्...
वानखेडे स्टेडियममधून दोन ड्रोन अचानक भिरभिरत आले अन् चर्चगेट रेल्वे स्टेशनवरील प्रवाशाच्या डोक्यावर आदळले, रक्ताची धार लागली अन्...
PM Kisan : पीएम किसान सन्मानचा 24 वा हप्ता 9.34 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, दिवाळीपूर्वी 2000 रुपये मिळणार
पीएम किसान सन्मानचा 24 वा हप्ता 9.34 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, दिवाळीपूर्वी 2000 रुपये मिळणार
Embed widget