एक्स्प्लोर
Advertisement
विराट कोहली फिट, आयपीएलमध्ये मुंबईविरुद्ध पुनरागमन करणार
मुंबई : टीम इंडिया आणि आयपीएलमधील आरसीबी संघाचा कर्णधार विराट कोहलीला मॅच खेळण्यासाठी फिट घोषित करण्यात आलं आहे. आयपीएलमधल्या शुक्रवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध होणाऱ्या सामन्यात कोहली खेळणार आहे.
कोहली उजव्या खांद्याच्या दुखापतीतून सावरला असून क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने कोहली खेळण्यास तंदुरुस्त असल्याचं स्पष्ट केलं.
आयपीएलच्या रणांगणात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि मुंबई इंडियन्स या दोन संघांमधला सामना शुक्रवार 14 एप्रिल रोजी बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.
आणखी वाट पाहू शकत नाही : विराट कोहली
या सामन्यात आपण खेळण्याची शक्यता असल्याचे संकेत विराटनं सोशल मीडियावर दिले होते. त्यानंतर आता कोहलीच्या कमबॅकवर शिक्कामोर्तब झालं आहे. कोहलीने जिममध्ये वेटलिफ्टिंग करतानाचा आपला व्हिडियोही पोस्ट केला होता. व्हिडीओत विराट सहजतेनं वजन उचलत होता, यातून तो खांद्याच्या दुखापतीतून सावरल्याचे संकेत मिळत होते.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
राजकारण
जळगाव
राजकारण
Advertisement