एक्स्प्लोर

डाग धुतला, 84 वर्षांनी भारताने इतिहास रचला!

चेन्नई: पाचव्या कसोटीत इंग्लंडला 1 डाव 75 धावांनी हरवून, भारताने ऐतिहासिक विजयाची नोंद केली. कसोटी क्रिकेटच्या 84 वर्षांच्या इतिहासात भारतानं पहिल्यांदाच इंग्लंडवर 4-0 इतक्या मोठ्या फरकानं विजय साजरा केला आहे. तसंच कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारतानं एखाद्या संघावर 4-0 अशी मात करण्याची ही दुसरीच वेळ आहे. 2013 साली भारतानं ऑस्ट्रेलियाला 4-0 असं हरवलं होतं. आता विराटच्या टीमनं इंग्लंडला 4-0 असं लोळवलं आहे.  1932 सालापासून भारतीय संघ आजवर 152 कसोटी मालिकांमध्ये खेळला आहे. त्यात केवळ दुसऱ्यांदाच भारतानं 4-0 असा विजय मिळवला आहे. Virat Kohli, Ravindra Jadeja टीम इंडियाचे हिरो करुण नायरच्या खणखणीत त्रिशतकानंतर रवींद्र जाडेजाच्या भेदक गोलंदाजीमुळे, भारताने चेन्नई कसोटीतही तिरंगा फडकवला. टीम इंडियाने इंग्लंडला पाचव्या कसोटीतही पाणी पाजून, मालिका 4-0 ने खिशात टाकली आणि ऐतिहासिक विजयाची नोंद केली. चेन्नई कसोटी भारताने 1 डाव आणि 75 धावांनी जिंकली. करुण नायर या विजयाचा नायक आहेच, पण 199 धावा ठोकणारा सलामीवीर लोकेश राहुल आणि इंग्लंडचा अर्ध्यापेक्षा जास्त संघ तंबूत धाडणार रवींद्र जाडेजा हे सहनायक आहेत. जाडेजाने दुसऱ्या डावात तब्बल 7 विकेट घेतल्या. त्यामुळे इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या 207 धावांवर आटोपला. या सामन्यात डावानं पराभव टाळण्यासाठी इंग्लंडला 282 धावांची आवश्यकता होती. पण अखेरच्या दिवशी किटन जेनिंग्स आणि अॅलेस्टर कूकनं सावध सुरुवात करुन 103 धावांची भागीदारी रचली. पण उपाहारानंतर रवींद्र जाडेजानं प्रभावी मारा करुन इंग्लंडचं कंबरडं मोडलं. रवींद्र जाडेजानं 48 धावांच्या मोबदल्यात इंग्लंडच्या सात फलंदाजांना माघारी धाडलं. तर उमेश, ईशांत आणि अमित मिश्रानं प्रत्येकी एकेक विकेट काढून त्याला छान साथ दिली. भारताचा पहिला डाव दरम्यान, करुण नायरचं त्रिशतक, राहुलच्या 199, अश्विनच्या 67 तर जाडेजाने 51 धावांच्या जोरावरच भारताने पहिला डाव सात बाद 759 धावांवर घोषित केला. कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्ध भारताने नोंदवलेली ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली. त्यामुळे चौथ्या दिवस अखेरीस भारताला इंग्लंडवर 282 धावांची आघाडी मिळाली. दुसरीकडे करुण नायरने चेन्नई कसोटीत त्रिशतक तर झळकावलंच, शिवाय मोठ्या भागीदारीही रचल्या. करुणने लोकेश राहुलसह चौथ्या विकेटसाठी 161 धावांची, रवीचंद्रन अश्विनसह सहाव्या विकेटसाठी 181 धावांची आणि रवींद्र जाडेजाच्या साथीने सातव्या विकेटसाठी 138 धावांची भागीदारी रचली. राहुलने 199, अश्विनने 67 तर जाडेजाने 51 धावा केल्या. संबंधित बातम्या
इंग्लंडविरुद्ध करुण नायरचं त्रिशतक, भारताकडे 270 धावांची आघाडी
पाकिस्‍तानच्या शफीकची झुंज अपयशी, ऑस्‍ट्रेलियाचा 39 धावांनी विजय
करुणचं त्रिशतक, सेहवागचं हटके ट्विट
चेन्नईत 'करुण'सह भारतानंही रचला विक्रम...
मृत्यू जवळून पाहिला, मग त्रिशतकाचं ओझं कसलं: करुण नायर
वयाच्या 10 व्या वर्षापासूनच त्याच्या नसानसात क्रिकेट : करुणचे वडिल
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2026 Final Prediction : बंगळुरू की गुजरात, अहमदाबादची खेळपट्टी कुणाला साथ देणार? आयपीएल फायनलचा सर्वात मोठा अंदाज समोर
बंगळुरू की गुजरात, अहमदाबादची खेळपट्टी कुणाला साथ देणार? आयपीएल फायनलचा सर्वात मोठा अंदाज समोर
Vinesh Phogat: व्यवस्थेशी झुंजत असलेल्या विनेग फोगाटचं आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न भंगलं; अटीतटीच्या लढतीत सेमीफायनलमध्ये निसटता पराभव
व्यवस्थेशी झुंजत असलेल्या विनेग फोगाटचं आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न भंगलं; अटीतटीच्या लढतीत सेमीफायनलमध्ये निसटता पराभव
Rishabh Pant : रिषभ पंतनं लखनौचं कर्णधारपद सोडलं, LSG चा कॅप्टन कोण होणार? टीम इंडियाच्या माजी खेळाडूनं तीन नावं सुचवली
रिषभ पंतनं आयपीएल संपण्यापूर्वी लखनौचं कर्णधार पद सोडलं, नवा कर्णधार कोण? भारताच्या माजी खेळाडूनं तीन नावं सुचवली
T20 Mumbai League : ‘आमच्या टीममध्येही वैभव सूर्यवंशी!’; जेतेपद राखण्यासाठी ‘मराठा रॉयल्स’ सज्ज, कॅप्टन सिद्धेश लाड काय म्हणाला?
‘आमच्या टीममध्येही वैभव सूर्यवंशी!’; जेतेपद राखण्यासाठी ‘मराठा रॉयल्स’ सज्ज, कॅप्टन सिद्धेश लाड काय म्हणाला?

व्हिडीओ

Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
Prajkta Tanpure Join BJP : भाजपमध्ये प्रवेश करताच तनपुरेंच्या कार्यालयातून शरद पवारांचे फोटो गायब
Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही
Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha
Pune Liquor Tragedy : विषारी दारूमुळे १४ मृत्यू; पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thane Metro : ठाण्यातील 12 हजार कोटींच्या अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोला नागरिकांचा तीव्र विरोध; 'पांढरा हत्ती' ठरण्याची तज्ज्ञांची भीती
ठाण्यातील 12 हजार कोटींच्या अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोला नागरिकांचा तीव्र विरोध; 'पांढरा हत्ती' ठरण्याची तज्ज्ञांची भीती
दक्षिण दिल्लीत साकेत मेट्रो स्टेशनजवळ पाच मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती
दक्षिण दिल्लीत साकेत मेट्रो स्टेशनजवळ पाच मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती
IPL 2026 Final Prediction : बंगळुरू की गुजरात, अहमदाबादची खेळपट्टी कुणाला साथ देणार? आयपीएल फायनलचा सर्वात मोठा अंदाज समोर
बंगळुरू की गुजरात, अहमदाबादची खेळपट्टी कुणाला साथ देणार? आयपीएल फायनलचा सर्वात मोठा अंदाज समोर
Mamata Banerjee: 'शासक हत्यारे झालेत, भाजपला लाज वाटली पाहिजे..', खासदार पुतण्या अभिषेकवर प्राणघातक हल्ला होताच दीदी भडकल्या; काँग्रेस आणि सपाचाही सडकून प्रहार
'शासक हत्यारे झालेत, भाजपला लाज वाटली पाहिजे..', खासदार पुतण्या अभिषेकवर प्राणघातक हल्ला होताच दीदी भडकल्या; काँग्रेस आणि सपाचाही सडकून प्रहार
...तर मी मनोज जरांगे पाटलांची भेट घेईल, पंकजा मुंडेंचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र, उपोषणस्थळी जाण्याच्या सूचना
...तर मी मनोज जरांगे पाटलांची भेट घेईल, पंकजा मुंडेंचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र, उपोषणस्थळी जाण्याच्या सूचना
कर्नाटकी राजकारणात काँग्रेस संकटमोचकाची अखेर स्वप्नपूर्ती! सीएम पदासाठी डीकेंचं नाव जाहीर; मंत्रीमंडळातील भलत्याच फाॅर्म्युल्याची चर्चा अन् सिद्धरामय्यांनी सुद्धा डाव साधलाच!
कर्नाटकी राजकारणात काँग्रेस संकटमोचकाची अखेर स्वप्नपूर्ती! सीएम पदासाठी डीकेंचं नाव जाहीर; मंत्रीमंडळातील भलत्याच फाॅर्म्युल्याची चर्चा अन् सिद्धरामय्यांनी सुद्धा डाव साधलाच!
लग्नाचे आमिष दाखवून शोषण केलं, गर्भपातासाठीही भाग पाडलं, तरुणीच्या आरोपानंतर मीरा भाईंदरमध्ये गुन्हा दाखल

Embed widget