एक्स्प्लोर

भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वात मोठा मालिका विजय

भारताने नागपूर वन डेत ऑस्ट्रेलियाचा सात विकेट्सनी धुव्वा उडवून, पाच वन डे सामन्यांची मालिका 4-1 अशी खिशात घातली.

नागपूर : विराट कोहलीच्या टीम इंडियाने नागपूरच्या वन डेत ऑस्ट्रेलियाचा सात विकेट्सनी धुव्वा उडवून, पाच वन डे सामन्यांची मालिका 4-1 अशी खिशात घातली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4-1 ने मालिका जिंकण्याची भारताची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सात वेळा पाच किंवा त्यापेक्षा अधिक सामन्यांची मालिका झाली. यामध्ये भारताने दोन वेळा ऑस्ट्रेलियावर 3-2 ने मात केली. भारताने पहिल्यांदा 1986 आणि दुसऱ्यांदा 2013 साली ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात 55 सामने खेळले आहेत. यापैकी 24 सामन्यात भारताने विजय मिळवला, तर 26 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. तर पाच सामने अनिर्णित राहिले. नागपूर वन डेत भारताने विजय मिळवल्याने हा आकडा 26-25 असा झाला आहे. भारतीय संघानं या विजयासह आयसीसीच्या वन डे सामन्यांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर झेप घेतली. त्यामुळं कसोटी आणि वन डे या दोन्ही फॉरमॅट्समध्ये एकाचवेळी नंबर वन होण्याचा मान टीम इंडियाला मिळाला आहे. भारताने नागपूरच्या वन डेवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला नऊ बाद 242 धावांत रोखून टीम इंडियाच्या विजयाचा पाया रचला. मग रोहित शर्मानं वन डे कारकीर्दीतलं चौदावं शतक ठोकून भारताच्या विजयात मोलाचं योगदान दिलं. रोहितने 109 चेंडूंत 11 चौकार आणि पाच षटकारांसह 125 धावांची खेळी उभारली. त्याने अजिंक्य रहाणेच्या साथीनं 124 आणि विराट कोहलीच्या साथीनं 99 धावांची भागीदारी रचली. अजिंक्य रहाणेनं 74 चेंडूंत सात चौकारांसह 61 धावांची खेळी केली. त्याआधी, भारताकडून अक्षर पटेलनं 38 धावांत तीन, तर जसप्रीत बुमरानं 51 धावांत दोन फलंदाजांना माघारी धाडलं. केदार जाधव, हार्दिक पंड्या आणि भुवनेश्वर कुमारनं प्रत्येकी एक विकेट काढली.

महत्त्वाच्या बातम्या

India Women's Semifinal Scenario : टीम इंडिया वर्ल्डकपमधून OUT...? चक्रावून टाकणारं समीकरण, पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या नंबरला पण संपूर्ण गेमच फिरला
टीम इंडिया वर्ल्डकपमधून OUT...? चक्रावून टाकणारं समीकरण, पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या नंबरला पण संपूर्ण गेमच फिरला
ENG vs NZ 3rd Test : थर्ड अंपायर स्क्रीनकडे पाहत होते, बेन स्टोक्सने कीवी खेळाडूशी केलं असं काही की, सगळेच चक्रावले; ICC करणार कारवाई?
थर्ड अंपायर स्क्रीनकडे पाहत होते, बेन स्टोक्सने कीवी खेळाडूशी केलं असं काही की, सगळेच चक्रावले; ICC करणार कारवाई?
ENG vs NZ 3rd Test : चक्कर आली, मैदानावर धावले डॉक्टर्स अन् LIVE मॅचमध्ये काळजाचा ठोका चुकला! न्यूझीलंडला अचानक बदलावी लागली प्लेइंग-11, नेमकं काय घडलं?
चक्कर आली, मैदानावर धावले डॉक्टर्स अन् LIVE मॅचमध्ये काळजाचा ठोका चुकला! न्यूझीलंडला अचानक बदलावी लागली प्लेइंग-11, नेमकं काय घडलं?
FIFA World Cup 2026 : ज्या देशाचं नावही माहित नव्हतं, तो आता मेस्सीला नडणार! पुण्यापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या छोट्या देशाची थेट राउंड ऑफ 32 मध्ये धडक, नेमकं काय घडलं?
ज्या देशाचं नावही माहित नव्हतं, तो आता मेस्सीला नडणार! पुण्यापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या छोट्या देशाची थेट राउंड ऑफ 32 मध्ये धडक, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Ketan Agarwal Case Lohagad : पहिली पायरी ते मृत्यूची दरी; कसा केला घात? Special Report
Zero Hour : प्रेयसी ठरली भावी पतीची मारेकरी, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Ram Temple Donation Row Theft : रामलल्लाचे गुन्हेगार, ८ जण गजाआड Special Report
Medha Kulkarni vs Abhimanyu Pawar Pune : जागेवरून वादंग जातीय रंग! Special Report
Ketan Agarwal Case Pune : केतन अग्रवालचे कुटुंब देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; वडिलांचा गंभीर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohini Khadse on TET Exam Paper Leak: जे स्वतःच फोडाफोडीत व्यस्त आहेत, ते पेपरफुटी कशी रोखणार?; टीईटी पेपर फुटीनंतर रोहिणी खडसेंचा सरकारवर घणाघात
जे स्वतःच फोडाफोडीत व्यस्त आहेत, ते पेपरफुटी कशी रोखणार?; टीईटी पेपर फुटीनंतर रोहिणी खडसेंचा सरकारवर घणाघात
MAHA TET Peper Leak TET Exam Cancle: टीईटीचा पेपर फुटला, परीक्षा रद्द; पहिले NEET, आता TET, महाराष्ट्र पुन्हा हादरला, भिवंडीत धाड टाकताच पोलिसही चक्रावले!
टीईटीचा पेपर फुटला, परीक्षा रद्द; पहिले NEET, आता TET, महाराष्ट्र पुन्हा हादरला, भिवंडीत धाड टाकताच पोलिसही चक्रावले!
प्रभू श्रीराम भोंदूंच्या गराड्यात सापडले, त्यांच्या सुटकेसाठी शिवसेना 'भाजप मुक्त राम' मोहीम हाती हाती घेईल, त्याची पहिली ठिणगी आंदोलनाच्या रुपात महाराष्ट्रात पडेल; उद्धव ठाकरेंचा एल्गार
प्रभू श्रीराम भोंदूंच्या गराड्यात सापडले, त्यांच्या सुटकेसाठी शिवसेना 'भाजप मुक्त राम' मोहीम हाती हाती घेईल, त्याची पहिली ठिणगी आंदोलनाच्या रुपात महाराष्ट्रात पडेल; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Eknath Shinde: उद्धव ठाकरेंनी जाहीर सभांमधून शड्डू ठोकला; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, कपटी मित्र किती..
उद्धव ठाकरेंनी जाहीर सभांमधून शड्डू ठोकला; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, कपटी मित्र किती..
तर सेवेचा राजीनामा द्या आणि संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा, मर्जीतल्या अधिकाऱ्यांसाठी पुनर्वसन हमी योजना सुरु आहेच, तुमच सुद्धा होईल; राज ठाकरेंची विश्वास नांगरे पाटलांना थेट फटकार
तर सेवेचा राजीनामा द्या आणि संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा, मर्जीतल्या अधिकाऱ्यांसाठी पुनर्वसन हमी योजना सुरु आहेच, तुमच सुद्धा होईल; राज ठाकरेंची विश्वास नांगरे पाटलांना थेट फटकार
Rohit Pawar:
"उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे सुपुत्र, ते कधीच मांडवली करणार नाहीत, ती चर्चा..."; फडणवीस-ठाकरे विमान प्रवासाच्या चर्चेवर रोहित पवारांची प्रतिक्रिया
'आमदारांना तेव्हा 50 कोटी दिले गेले असं म्हणत असतील, तर खासदारांना किती दिले गेले असतील? माझ्याच शब्दावर हे निवडून आले आणि शिंदेंच्या लोकांना घरी बसवलं, त्यामुळे या उपटसुंभानी...' उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
'आमदारांना तेव्हा 50 कोटी दिले गेले असं म्हणत असतील, तर खासदारांना किती दिले गेले असतील? माझ्याच शब्दावर हे निवडून आले आणि शिंदेंच्या लोकांना घरी बसवलं, त्यामुळे या उपटसुंभानी..' उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
अयोध्येचे राममंदिर हिंदू दरोडेखोरांनी लुटूनही सकल हिंदूचे महाराष्ट्रातील ढोंगी पुढारी हात चोळत तोंडातल्या तोंडात जीभ फिरवत बसले आहेत, सामनातून सडकून प्रहार
अयोध्येचे राममंदिर हिंदू दरोडेखोरांनी लुटूनही सकल हिंदूचे महाराष्ट्रातील ढोंगी पुढारी हात चोळत तोंडातल्या तोंडात जीभ फिरवत बसले आहेत, सामनातून सडकून प्रहार
Embed widget