मुंबई : क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा अशा काही घटना पाहायला मिळतात. ज्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसतो. असाच काहीसा प्रकार काल भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये पार पडलेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात पाहायला मिळाला. तिसऱ्या टी20 सामन्यात भारताने ही मालिका आपल्या नावे केली. पण सामन्यादरम्यान एक वेळ अशी होती, ज्यावेळी चर्चा फक्त वेस्ट इंडिजच्या एविन लुईसचीच होती.


एविन लुईस सामन्यादरम्यान बाउंड्रीवर फिल्डिंग करत होता. त्यादरम्यान तो 'सुपरमॅन' अंदाजात दिसून आला. भारतीय संघाच्या फलंदाजी दरम्यान तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर रोहित शर्माने आंतराष्ट्रीय सामन्यांमधील 400 वा षट्कार लगावला. त्याच्याच पुढच्या चेंडूवर मात्र रोहित बाद होता-होता वाचला. त्याचं झालं असं की, हिटमॅन रोहित शर्माने 4.2 ओव्हरमध्ये खॅरी पियरेच्या चेंडूवर डीप मिडविकेटवर शानदार षट्कार ठोकण्याचा प्रयत्न केला. परंतु, बाउंड्रीवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या एविन लुईसने झेल पकडून सोडून दिला.


झेल पकडणं अवघड होतं आणि जर लुईसने आपल्या हातातून चेंडू सोडला नसता तर लुईस चेंडूसोबत बाउंड्रीच्या पार गेला असा आणि भारतीय संघाच्या खात्यात 6 धावांचा समावेश झाला असता. लुईसच्या फिल्डींगचं क्रिकेट विश्वास कौतुक होत आहे. यावेळी रोहितने 27 धावा पूर्ण केल्या होत्या. त्यानंतर रोहितने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. हे त्यांचं टी20 मधील 19वं अर्धशतक होतं.


दरम्यान, क्षेत्ररक्षण करताना सलामीवीर इव्हिन लुईसला दुखापत झाली. त्याला थेट हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. दुखापत एवढी गंभीर होती की, त्याला मैदानातून घेऊन जाण्यासाठी स्ट्रेचर आणावं लागलं. त्यामुळे वेस्ट इंडिजच्या डावाची सुरुवात करण्यासाठी लुईसऐवजी ब्रेंडन किंगला पाठवण्यात आलं.

संबंधित बातम्या : 

India vs West Indies : विराटसेनेकडून विंडीजचा 67 धावांनी धुव्वा; विजयासह मालिकाही खिशात

IND vs WI : 'हिटमॅन' रोहित शर्माची तुफान फटकेबाजी, रचले नवे विक्रम

विराट कोहलीकडून युवराज सिंहचा 12 वर्षापूर्वींचा विक्रम मोडीत