एक्स्प्लोर

टी-20 तिरंगी मालिका आजपासून, टीम इंडिया श्रीलंकेशी भिडणार

रोहित शर्माच्या टीम इंडियासह श्रीलंका आणि बांगलादेशचा समावेश असलेल्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या तिरंगी मालिकेला आजपासून कोलंबोत सुरुवात होत आहे. या मालिकेतल्या सलामीच्या सामन्यात भारताचा मुकाबला श्रीलंकेशी होत आहे.

  कोलंबो : रोहित शर्माच्या टीम इंडियासह श्रीलंका आणि बांगलादेशचा समावेश असलेल्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या तिरंगी मालिकेला आजपासून कोलंबोत सुरुवात होत आहे. या मालिकेतल्या सलामीच्या सामन्यात भारताचा मुकाबला श्रीलंकेशी होत आहे. आयपीएलच्या अकराव्या मोसमाला सुरुवात होण्यापूर्वी भारतीय क्रिकेटरसिकांना संधी मिळणार आहे ती ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या तिरंगी मालिकेचा आनंद लुटण्याची. रोहित शर्माच्या टीम इंडियासह यजमान श्रीलंका आणि बांगलादेश संघांचा या तिरंगी मालिकेत समावेश आहे. या तिरंगी मालिकेतल्या साऱ्या सामन्यांचं आयोजन कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवरच करण्यात येणार आहे. त्यातल्या सलामीच्या सामन्यात भारताची गाठ ही श्रीलंकेशी पडणार आहे. टीम इंडियानं दक्षिण आफ्रिका दौऱ्यातल्या वन डे आणि ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या मालिकेत घवघवीत यश संपादन केलं. त्या दौऱ्याचा ताण हलका करण्यासाठी बीसीसीआयनं कर्णधार विराट कोहली आणि यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीसह कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमरा आणि हार्दिक पंड्या या प्रमुख शिलेदारांना विश्रांती दिली आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत श्रीलंकेतल्या तिरंगी मालिकेसाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदाची सूत्रं रोहित शर्माच्या हाती सोपवण्यात आली आहेत. रोहित शर्मानं आजवर कर्णधार या नात्यानं चार ट्वेन्टी ट्वेन्टी आंतरराष्ट्रीय सामन्यांत जबाबदारी सांभाळली आहे. त्या चारही सामन्यांमध्ये भारतीय संघानं विजय साजरा केला होता. मुंबई इंडियन्सचा कर्णधार या नात्यानंही रोहितच्या गाठीशी आयपीएलच्या रणांगणातला सर्वोच्च अनुभव आणि यश आहे. त्यामुळं कर्णधार या नात्यानं टीम इंडियाला श्रीलंकेत विराट कोहलीची अनुपस्थिती भासणार नाही, अशी आशा आहे. विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांची एक कर्णधार या नात्यानं अनुपस्थिती जाणवू न देण्याची मोठी जबाबदारी रोहितसह शिखर धवन, सुरेश रैना आणि मनीष पांडेवर राहिल. यष्टिरक्षक म्हणून निवड झालेल्या दिनेश कार्तिक आणि रिषभ पंतचाही भारतीय फलंदाजीला मोठा आधार लाभेल. रिषभ पंतनं यंदा मुश्ताक अली ट्वेन्टी ट्वेन्टी स्पर्धेत अवघ्या ३२ चेंडूंमध्ये शतक ठोकण्याचा पराक्रम गाजवला होता. श्रीलंकेतल्या मालिकेतही भारतीय संघाला त्याच्याकडून अशाच तडफदार खेळींची अपेक्षा राहील. दक्षिण आफ्रिका दौरा गाजवणाऱ्या प्रमुख गोलंदाजांऐवजी भारतीय संघात शार्दूल ठाकूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज या वेगवान गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे. शार्दूलनं दक्षिण आफ्रिकेतल्या अखेरच्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांमध्ये मिळालेल्या संधीचं सोनं केलं होतं. पण डावखुऱ्या जयदेव उनाडकटवर आयपीएलच्या लिलावात आलेली साडेअकरा कोटींची बोली सार्थ ठरवण्याची अजूनही जबाबदारी आहे. चायनामन कुलदीप यादवच्या अनुपस्थितीत यजुवेंद्र चहल, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यावर भारताच्या फिरकी आक्रमणाची भिस्त राहिल. आयसीसीच्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या क्रमवारीत टीम इंडिया सध्या तिसऱ्या स्थानावर आहे. या क्रमवारीत श्रीलंका आठव्या तर बांगलादेश दहाव्या क्रमांकावर आहे. त्यामुळं श्रीलंकेतल्या तिरंगी मालिकेच्या रणांगणात भारतीय संघाचं पारडं जड मानलं जात आहे. त्यात टीम इंडियानं गेल्या वर्षभरात ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या पाच मालिकांवर आपलं वर्चस्व गाजवलं आहे. युवा खेळाडूंचा भरणा असलेली रोहित शर्माची टीम इंडियाही श्रीलंकेतही तीच विजयी परंपरा कायम राखेल, असा जाणकारांना विश्वास आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Pakistan Women Cricket Team Weird Practice: एकीने पाय पकडले, दुसरी उलटी झाली; पाकिस्तानी महिला संघाची विचित्र ट्रेनिंग, VIDEO
एकीने पाय पकडले, दुसरी उलटी झाली; पाकिस्तानी महिला संघाची विचित्र ट्रेनिंग, VIDEO
Deepak Chahar bat got stolen: भारतीय क्रिकेटपटूच्या तीन महागड्या बॅट मैदानातून चोरीला गेल्या, म्हणाला, मी आता थेट मोदी किंवा योगींना....
भारतीय क्रिकेटपटूच्या तीन महागड्या बॅट मैदानातून चोरीला गेल्या, म्हणाला, मी आता थेट मोदी किंवा योगींना....
Asian Games 2026 : पीटी उषाचा 42 वर्षांचा ऐतिहासिक रेकॉर्ड मोडला; विथ्या रामराजचा आशियाई स्पर्धेत धडाकेबाज पराक्रम, गुलवीर सिंगलाही रौप्यपदक
पीटी उषाचा 42 वर्षांचा ऐतिहासिक रेकॉर्ड मोडला; विथ्या रामराजचा आशियाई स्पर्धेत धडाकेबाज पराक्रम, गुलवीर सिंगलाही रौप्यपदक
Rohit Sharma : रोहित शर्मा बसमधून उतरताना पायऱ्यांवरुन पाय घसरुन पडला, विराट कोहली काळजीनं पाहात राहिला, नेमकं काय घडलं? पाहा व्हिडिओ
रोहित शर्मा बसमधून उतरताना पायऱ्यांवरुन पाय घसरुन पडला,नेमकं काय घडलं? पाहा व्हिडिओ

व्हिडीओ

Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ
Sanjay Raut alleges FDA Extortion : एफडीएत खंडणीचं सत्र? राऊतांचं मुंढेंना पत्र | Special Report
Vidhan Parishad Election & Mahayuti : विधान परिषदेचा पेच महायुतीत रस्सीखेच | Special Report ABP Majha
Sharad Pawar On NCP Merger : हवं तर इकडे, फुलस्टॉप की साकडं? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर
सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर
Tukaram Mundhe : 'आईचे दूध सर्वोत्तम' शिशु आहार उत्पादनांवर लिहिणं बंधनकारक, तुकाराम मुंढेंनी आकडेवारी सादर करत गंभीर वास्तव मांडलं... 
शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात स्तनपानाचं प्रमाण जास्त, शहरी महाराष्ट्रातील स्थिती अत्यंत भयावह : तुकाराम मुंढे
'ईव्हीएम असो वा मतदार यादी, दोन्हींमध्ये फेरफार, ज्ञानेश कुमारांनी निवडणूक फिक्स केली, अलीकडील सर्व निवडणुका बेकायदेशीर..' राहुल गांधींचा हल्लाबोल
'ईव्हीएम असो वा मतदार यादी, दोन्हींमध्ये फेरफार, ज्ञानेश कुमारांनी निवडणूक फिक्स केली, अलीकडील सर्व निवडणुका बेकायदेशीर..' राहुल गांधींचा हल्लाबोल
नाशिकच्या गोदाघाटावर अघोरी स्नान, महिलेच्या डोळ्यात लिंबाचा रस पिळला; लाखो रुपयांची फसवणूक, गुन्हा दाखल
नाशिकच्या गोदाघाटावर अघोरी स्नान, महिलेच्या डोळ्यात लिंबाचा रस पिळला; लाखो रुपयांची फसवणूक, गुन्हा दाखल
Gold : दुबईत सोनं भारतापेक्षा महाग की स्वस्त, दुबईतून किती ग्रॅम सोनं कोणताही कर न देता आणता येतं? 
दुबईत सोनं भारतापेक्षा महाग की स्वस्त, दुबईतून किती ग्रॅम सोनं कोणताही कर न देता आणता येतं? 
Ketan Agrawal and Siya Goyal : वाढदिवसाला सरप्राइज द्यायला पाठीवर SIYA नावाचा टॅटू काढला; साखरपुड्याला 28 ड्रेस अन् दागिन्यांचे सेट, केतनने सियासाठी काय-काय केलं?
वाढदिवसाला सरप्राइज द्यायला पाठीवर SIYA नावाचा टॅटू काढला; साखरपुड्याला 28 ड्रेस अन् दागिन्यांचे सेट, केतनने सियासाठी काय-काय केलं?
India Alliance on SIR Meeting: इंडिया आघाडीची SIR वर उद्या बैठक, ज्ञानेश कुमार हटाव मोहिमेला आणखी जोर येणार! पण अखिलेश यादव का येणार नाहीत, उद्धव ठाकरेंचं काय ठरलं?
इंडिया आघाडीची SIR वर उद्या बैठक, ज्ञानेश कुमार हटाव मोहिमेला आणखी जोर येणार! पण अखिलेश यादव का येणार नाहीत, उद्धव ठाकरेंचं काय ठरलं?
Embed widget