एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आज वानखेडेवर भारत-श्रीलंकेदरम्यान तिसरा टी-20 सामना
भारत श्रीलंका संघांमध्ये तिसरा टी-20 सामना आज मुंबईच्या वानखेडे स्टेडीअमवर खेळवण्यात येईल. हा सामना जिंकून श्रीलंकेला व्हाईटवॉश देण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे.
मुंबई : भारत श्रीलंका संघांमध्ये तिसरा टी-20 सामना आज मुंबईच्या वानखेडे स्टेडीअमवर खेळवण्यात येईल. हा सामना जिंकून श्रीलंकेला व्हाईटवॉश देण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. कसोटी मालिकेत श्रीलंकेला नमवल्यानंतर भारताने एकदिवसीय मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. त्यानंतर टी-20 मालिकेतही टीम इंडीयानं विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारतीय संघ या सामन्यात नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता आहे.
भारतानं श्रीलंकेवर या मालिकेत विशाखापट्टणममध्ये 93 धावांनी तर इंदूरमध्ये 88 धावांनी विजय साजरा केला होता. त्यामुळे वानखेडेवरची शेवटची लढत जिंकून व्हाईटवॉश करण्याचा रोहित शर्माच्या टीम इंडियाचा प्रयत्न असेल.
टीम इंडियाची दोनही सामन्यांमधील कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. यात लोकेश राहुलची दोन अर्धशतकांचा समावेश आहे, तर दुसऱ्या टी-20 सामन्यात रोहित शर्मानं द्विशतकी खेळी करुन मालिका खिशात घालण्यास मोलाचं योगदान दिलं होतं. आजच्या तिसऱ्या सामन्यात श्रीलंकेसमोर करो या मरोची स्थिती असणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement