Sai Sudarshan Debut : तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA 1st ODI) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा एकतर्फी पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत विजयी सलामी दिली. या सामन्यात सलामीवीर साई सुदर्शनला (Sai Sudarshan Debut) भारताकडून पदार्पणाची संधी मिळाली. वयाच्या 22 व्या वर्षी साईला आंतरराष्ट्रीय कॅप मिळाली. भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा तो 400 वा खेळाडू ठरला.






विशेष म्हणजे साईने पहिल्याच सामन्यात ज्या आत्मविश्वासाने फलंदाजी केली ती पाहता तो पहिलाच सामना खेळत आहे असे कधीच जाणवले नाही. त्याने पहिल्याच सामन्यात अर्धशतक झळकावत नाबाद 55 धावा केल्या. अशी कामगिरी करणारा तो चौथा भारतीय सलामीवीर फलंदाज ठरला. 






भारताने पहिला एकदिवसीय सामना 8 विकेटने जिंकला


भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 8 गडी राखून पराभव केला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ 116 धावांवर गारद झाला. अर्शदीप सिंगने अप्रतिम गोलंदाजी करत 5 तर आवेश खानने 4 बळी घेतले, तर कुलदीपने 1 बळी घेतला. 117 धावांचा पाठलाग करताना साई सुदर्शन आणि श्रेयस अय्यर यांच्या अर्धशतकांच्या जोरावर त्यांनी हे लक्ष्य 16.4 षटकांत पूर्ण केले. अशा प्रकारे भारताने पहिला एकदिवसीय सामना 8 विकेटने जिंकला. यासह भारताने वनडे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.


सर्वाधिक चेंडूने दक्षिण आफ्रिकेचा वनडेतील सर्वात मोठा पराभव



  • 215 वि. इंग्लंड, नॉटिंगहॅम, 2008

  • 200 वि. भारत, जोहान्सबर्ग, 2023*

  • 188 वि. ऑस्ट्रेलिया, सिडनी, 2002

  • 185 वि भारत, दिल्ली, 2022


सर्वाधिक चेंडूने भारताचा सर्वात मोठा वनडे विजय



  • 263 वि. श्रीलंका, कोलंबो आरपीएस, 2023 *

  • 231 वि. केनिया , ब्लोमफॉन्टेन, 2001

  • 211 वि. वेस्ट इंडिज, तिरुवनंतपुरम, 2018

  • 200 वि. दक्षिण आफ्रिका, जोहान्सबर्ग, 2023*


एकदिवसीय पदार्पणात 50+ धावा करणारा साई सुदर्शन 17 वा भारतीय


एकदिवसीय पदार्पणात भारतीय सलामीवीर ५०+ धावा करणारे फलंदाज



  • 86 - रॉबिन उथप्पा वि. इंग्लंड 2006

  • 100* - केएल राहुल वि. झिम्बाब्वे 2016

  • 55* - फैज फजल वि. झिम्बाब्वे , 2016

  • 55* - साई सुदर्शन वि. साऊथ आफ्रिका, 2023*


इतर महत्वाच्या बातम्या