Vaibhav Naik :  मंत्रिपदासाठी भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) हे पक्षाची लाचारी  करत असल्याचा आरोप ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी केला. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan rane) यांनी रिफायनरी प्रस्तावित जागेवर होणार असल्याचे म्हटलं आहे. यावरुन वैभव नाईक यांनी राणेंवर जोरदार टीका केली आहे. चांगले उद्योग गुजरातला आणि पर्यावरणाला हानिकारक प्रकल्प कोकणात, त्यामुळे त्यांची खरी भूमिका उघडी पडल्याचे नाईक म्हणाले. 


देवेंद्र फडणवीस हे नितेश राणेंच्या मागचे सूत्रधार 


नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचा आरोप करुन या अधिवेशनात मांडीला मांडी लावून बसलेले सत्ताधारी बडगुजर यांच्यावर देशद्रोहाचे आरोप करत आहेत. नवाब मलिक यांच्याकडे गेल्यानंतर शुद्ध आणि पवित्र झाले. मात्र, बडगुजर हे उद्धव ठाकरे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. मात्र जे बडगुजर आमच्याकडे आहेत ते देशद्रोही आणि त्यांच्याकडे गेले तर देशभक्त  ही भाजपची रणनीती असल्याचे नाईक म्हणाले. या प्रकरणात नितेश राणेंच्या मागचे सूत्रधार हे देवेंद्र फडणवीस आहेत. नितेश राणे पैसे दिल्याप्रमाणे बोलतात असेही नाईक म्हणाले.


चांगले उद्योग गुजरातला आणि पर्यावरणाला हानिकारक प्रकल्प कोकणात


केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रिफायनरी प्रस्तावित जागेवर होणार असल्याचे म्हटलं आहे. यावरुन वैभव नाईक यांनी नारायण राणेंवर जोरदार टीका केली आहे. चांगले उद्योग गुजरातला आणि पर्यावरणाला हानिकारक प्रकल्प कोकणात त्यामुळं यांची खरी भूमिका उघडी पडली आहे. येणाऱ्या निवडणुकीत जनतेचा रोष दिसून येईल. चांगले उद्योग येत असल्यास आमचं समर्थन असेल अशी प्रतिक्रिया वैभव नाईक यांनी दिली आहे.


दीपक केसरकरांना राणेंच्या कुबड्यांची गरज


दोडामार्गमध्ये दीपक केसरकर यांनी नारायण राणेचं गुणगान करताना राणेंनी विकास केला असल्याचं म्हटल होतं. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना राणेंच्या कुबड्यांची निवडून येण्यासाठी गरज असल्याने राणेचं गुणगान केसरकर करत आहेत. गेली 10 वर्ष मंत्री असून त्यांना काही करता आल नाही. जिल्ह्याच्या विकासाबाबत ते काही करू शकत नाहीत. त्यांच्याजवळ असलेल्या खात्याला ते न्याय देऊ शकत नाहीत असा खरपूस समाचार वैभव नाईक यांनी घेतला.


एकनाथ शिंदे यांच्या भूमिका दिल्लीवरुन ठरतात


एकनाथ शिंदे हे स्वतः नगरविकास मंत्री आहेत. चांगले निर्णय घेतले तर ते आपले आणि वाईट निर्णय झाले तर ते उद्धव ठाकरेंनी घेतले, ही त्यांची जुनीच भूमिका आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिका दिल्लीवरुन ठरतात. त्यामुळं त्यांची भूमिका ही त्यांची नसून दिल्लीची भूमिका आहे अशी प्रतिक्रिया वैभव नाईक यांनी दिली.


कोकणातील मराठा बांधवाना कुणबी प्रमाणपत्र पाहिजे


नितेश राणेंनी मराठा आरक्षणावर विधानसभेत अशी भूमिका घेतली की कोकणातील मराठा समाज कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही. ही भूमिका घेताना कोकणातील जनतेला त्यांनी विचारलं का? कोकणातील मराठा बांधवाना कुणबी प्रमाणपत्र पाहिजे. राणे कुटुंबीयांना आरक्षणाची गरज नाही. राणेंच्या मुलाचं शिक्षण देशाबाहेर झालं. मराठा समाजाला आरक्षणाची गरज असून सरकारने लवकरात लवकर आरक्षण द्यावं अशी भूमिका वैभव नाईक यांनी मांडली आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


आदित्य ठाकरे आणि मला समोरासमोर बोलवा; दिशा सालियन मृत्यूप्रकरणात नितेश राणे आक्रमक