IND vs NZ 1st Test, LIVE : टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड पहिला कसोटी सामना, आज शेवटचा दिवस, पाहा प्रत्येक अपडेट

IND vs NZ 1st Test, LIVE : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याचा आज पाचवा दिवस आहे. आज शेवटच्या दिवशी सामन्या रोमांचक स्थिती असणार आहे.

abp majha web team Last Updated: 29 Nov 2021 07:38 AM
अखेर सामना अनिर्णीत

भारताला न्यूझीलंड संघाला सर्वबाद न करता आल्याने अखेर सामना अनिर्णीत सुटला आहे. रचीन रवींद्रने 91 चेंडूत 18 धावा करत अखेरपर्यंत क्रिजवर टिकून राहिला त्यामुळे सामना ड्रॉ झाला.

आश्विनची जादू सुरुच, आणखी एकाला धाडलं माघारी

आर आश्विनने न्यूझीलंडच्या टॉम ब्लंडलला त्रिफळाचीत करत तंबूत धाडलं आहे. न्यूझीलंडला आता 146 धावांची गरज असून हातात 3 विकेट्स आहेत.

भारताच्या विजयातलं मोठा अडथळा दूर, जाडेजाने विल्यमसला केलं बाद

भारतीय क्रिकेट संघाने विजयाच्या दिशेने एक यशस्वी पाऊल टाकलं आहे. बराच वेळ टिकून असणाऱ्या केन विल्यमसनला 24 धावांवर जाडेजाने पायचीत केलं आहे. आता न्यूझीलंडचे 6 गडी तंबूत परतले असून त्यांना विजयासाठी 153 धावांची गरज आहे.

न्यूझीलंडला आणखी एक झटका, निम्मा संघ तंबूत परत

न्यूझीलंडच्या पाचव्या गड्याला अक्षर पटेलने तंबूत धाडलं आहे. हेन्री निकोल्स पायचीत झाला आहे.

अनुभवी रॉस टेलर बाद

रवींद्र जाडेजाने अनुभवी रॉस टेलरची विकेट पटकावत भारताला एक महत्त्वाची विकेट मिळवून दिली आहे. टेलर 2 धावांवर पायचीत झाला आहे.

आश्विनचा नवा विक्रम

भारताचा अनुभवी क्रिकेटपटू आर आश्विनने नुकत्याच एका नव्या विक्रमाला गवासणी घातली आहे. त्याने 418 विकेट्स पूर्ण करत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीयांमध्ये तिसरा क्रमांक पटकावला आहे. हरभजनला (417)  त्याने मागे टाकलं आहे. 

भारताला मोठं यश, टॉम लॅथम बाद

भारताला अतिशय गरज असलेली विकेट अनुभवी आर आश्विनने मिळवून दिली आहे. त्याने टॉम लॅथमला त्रिफळाचीत केलं आहे.

लॅथम पुन्हा चमकला, अर्धशतक पूर्ण

न्यूझीलंडच्या पहिल्या डावात सुरुवातीपासून संघाचा खेळ सावरणाऱ्या टॉम लॅथम याने दुसऱ्या डावातही उत्तम खेळ दाखवला आहे. त्याने नुकतचं त्याचं अर्धशतक पूर्ण केलं आहे. 51 ओव्हरनंतर न्यूझीलंडचा स्कोर 111 वर 2 बाद असा आहे.


 

मोठ्या प्रतिक्षेनंतर भारताला दुसरं यश

लंचब्रेकनंतर भारताला दुसरं यश मिळालं आहे. उमेश यादवच्या चेंडूवर विल्यम सोमरविलं 36 धावांवर बाद झाला आहे. शुभमनने त्याचा झेल पकडला आहे. 37 ओव्हरनंतर न्यूझीलंडचा स्कोर 80 वर 2 बाद अशी आहे. 

न्यूझीलंडची गाडी रुळावर, लंचब्रेकपूर्वी अवस्था 79/1

भारत-न्यूझीलंड यांच्यातील अखेरच्या दिवशी भारत सामन्यात वरचढ होईल असे वाटत असताना, न्यूझीलंडच्या लॅथम आणि सोमरविल यांनी डाव सावरत अर्धशतकी भागिदारी रचली आहे. आता न्यूझीलंडला विजयासाठी 205 धावांची गरज असून त्यांच्या हातात 9 विकेट्सही आहेत.

शेवटच्या दिवशी सामन्यात रोमांचक स्थिती

कानपूर : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याचा आज पाचवा दिवस आहे. आज शेवटच्या दिवशी सामन्यात रोमांचक स्थिती असणार आहे. काल काही भारतीय खेळाडूने दर्जेदार खेळाचं दर्शन घडवलं. ज्यामुळे भारताने आधी 234 धावांवर डाव घोषित करत न्यूझीलंडला 284 धावांचं आव्हान दिलं. ज्यानंतर अखेरच्या काही षटकात एक विकेटही घेतली असल्याने आता न्यूझीलंडला 9 गड्यांच्या मदतीने 280 धावा करण्याची गरज आहे. तर भारताला जिंकण्यासाठी 9 विकेट्सची गरज आहे. 

पार्श्वभूमी

कानपूर : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याचा आज पाचवा दिवस आहे. आज शेवटच्या दिवशी सामन्या रोमांचक स्थिती असणार आहे. काल काही भारतीय खेळाडूने दर्जेदार खेळाचं दर्शन घडवलं. ज्यामुळे भारताने आधी 234 धावांवर डाव घोषित करत न्यूझीलंडला 284 धावांचं आव्हान दिलं. ज्यानंतर अखेरच्या काही षटकात एक विकेटही घेतली असल्याने आता न्यूझीलंडला 9 गड्यांच्या मदतीने 280 धावा करण्याची गरज आहे. तर भारताला जिंकण्यासाठी 9 विकेट्सची गरज आहे. 


चौथ्या दिवशी एकीकडे सुरुवातीपासून भारताचे एकापाठी एक खेळाडू तंबूत परतत असताना या कसोटीचा स्टार खेळाडू श्रेयस अय्यरने अनुभवी आर आश्विनसोबत डाव सांभाळला. आश्विनने महत्त्वपूर्ण 32 धावा केल्यानंतर तो बाद झाला. नंतर अय्यरने मात्र आपलं अर्धशतक पूर्ण केलं. पण तोही 65 धावा करुन तंबूत परतला. ज्यानंतर शेवटच्या फळीतील रिद्धिमान साहा (नाबाद 61) आणि अक्षर पटेल (नाबाद 28) यांनी महत्त्वपूर्ण खेळी केली. ज्यानंतर अखेर भारताने 234 धावा झाल्यानंतर डाव घोषित करत किवींना विजयासाठी 284 धावांचे आव्हान ठेवले. ज्यानंतर गोलंदाजी करताना आश्विनने तिसऱ्याच षटकात सलामीवीर विल यंगला पायचीत करत दिवस अखेर न्यूझीलंडची अवस्था 4 वर एक बाद अशी केली आहे. आता पाचव्या दिवशी किवींना विजयासाठी 9 गड्यांच्या मदतीने 280 धावा करण्याची गरज आहे. 


अय्यर पुन्हा चमकला, साहानेही सावरलं


दिवसाच्या सुरुवातीपासून भारताचे फलंदाज एक एक करुन तंबूत परतत होते. पण त्याचवेळी पहिल्या डावात सलामीच्या सामन्यात शतक झळकावणाऱ्या श्रेयसने संघाची जबाबदारी घेत एक उत्तम खेळी खेळला. त्याला आश्विननेही 32 धावांची चांगली साथ दिली. अय्यरने आज 125 चेंडूत 65 धावा केल्या. एकाच सामन्यात दोन शतकं ठोकण्यापासून तो 35 धावांनी हुकला. तर दुसरीकडे मानेच्या दुखापतीमुळे क्षेत्ररक्षणापासून लांब राहिलेल्या रिद्धिमान साहानेही 126 चेंडूत 61 धावा करत संघासाठी महत्त्वाचं योगदान दिलं.  

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.