एक्स्प्लोर

#INDvNZ उपान्त्य सामना | पावसाच्या व्यत्ययामुळे उर्वरित खेळ दुसऱ्या दिवशी

बुमराहने सलामीवीर मार्टिन गप्टिलला अवघ्या एका धावेवर माघारी धाडल्यावर विल्यमसन मैदानात उतरला. रॉस टेलर आणि विल्यमसन यांच्या अर्धशतकांच्या बळावर न्यूझीलंडने दोनशे धावांचा टप्पा ओलांडला.

World Cup 2019 : भारत आणि न्यूझीलंड संघांदरम्यानचा विश्वचषकातील पहिल्या उपान्त्य सामन्याचा खेळ पावसामुळे दुसऱ्या दिवसावर ढकलण्यात आला आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार उद्या (बुधवार, 10 जुलै) दुपारी तीन वाजता उर्वरित खेळ पुढे सुरु होणार आहे. मँचेस्टरमध्ये ओल्ड ट्रॅफॉर्ड मैदानात न्यूझीलंड फलंदाजी करत असताना 47 व्या षटकात (46.1) पावसामुळे खेळ थांबवावा लागला, त्यावेळी किवी पाच बाद 211 धावांवर खेळत होते. रॉस टेलर 67, तर टॉम लाथम तीन धावांवर खेळत होता. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु होईल तेव्हा न्यूझीलंड 46.2 व्या षटकापासून पुढे सुरुवात करेल. या तीन षटकात भारताला कमीत कमी धावा देण्याचं आव्हान असेल. ब्रिटीश स्थानिक वेळेनुसार उद्या दुपारी दोन वाजता (भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसहा वाजता) पाऊस पडण्याचा अंदाज आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंडची सुरुवात काहीशी अडखळत झाली. बुमराहने सलामीवीर मार्टिन गप्टिलला अवघ्या एका धावेवर माघारी धाडल्यावर विल्यमसन मैदानात उतरला. रॉस टेलर आणि विल्यमसन यांच्या अर्धशतकांच्या बळावर न्यूझीलंडने दोनशे धावांचा टप्पा ओलांडला. विल्यमसनने 67 धावा करत एकाच विश्वचषकात न्यूझीलंडचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होण्याचा मान पटकावला. पावसामुळे खेळ थांबण्यापूर्वी भारताने सामन्यावर पकड घेतली होती. मात्र पावसामुळे गणितं बिघडून टीम इंडियाच्या दृष्टीने सामना जिंकणं अधिक आव्हानात्मक ठरु शकतं. डकवर्थ ल्युईस नियम लागू झाल्यास काय? 40 षटकं- लक्ष्य 223 धावा 35 षटकं- लक्ष्य 209 धावा 30 षटकं- लक्ष्य 192 धावा 25 षटकं- लक्ष्य 172 धावा 20 षटकं- लक्ष्य 148 धावा उपान्त्य आणि अंतिम फेरीनंतर राखीव दिवस हा सामन्याची नव्याने सुरुवात करण्यासाठी नसतो, तर सामना पुढे सुरु ठेवण्यासाठी असतो. जर राखीव दिवशी पण पावसाचं वर्चस्व राहिलं, तर साखळी फेरीत अधिक गुण मिळवणारा संघ (यावेळी भारत) थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल. जर अंतिम फेरीतही पावसाने डाव साधला, आणि राखीव दिवशीही खेळ होऊ शकला नाही, तर दोन्ही संघांना विभागून विजेतेपद दिलं जातं.

महत्त्वाच्या बातम्या

Team India Squad World Cup 2027 : 10 खेळाडूंसाठी धोक्याची घंटा, 2027 च्या वनडे वर्ल्डकपसाठी अजूनही नाव फिक्स नाही...; रोहित-जडेजासह अनेक मोठ्या नावांचा समावेश
10 खेळाडूंसाठी धोक्याची घंटा, 2027 च्या वनडे वर्ल्डकपसाठी अजूनही नाव फिक्स नाही...; रोहित-जडेजासह अनेक मोठ्या नावांचा समावेश
Virat Kohli Test Retirement : विराटला निवृत्तीसाठी भाग पाडलं... अजित आगरकरांवर गंभीर आरोप, माजी भारतीय खेळाडूच्या विधानाने क्रिकेटविश्वात खळबळ, नेमकं काय म्हणाला?
विराटला निवृत्तीसाठी भाग पाडलं... अजित आगरकरांवर गंभीर आरोप, माजी भारतीय खेळाडूच्या विधानाने क्रिकेटविश्वात खळबळ, नेमकं काय म्हणाला?
WCL 2026 : 6 चेंडू, 12 धावा अन् काळजाचा ठोका चुकवणारा ड्रामा! भारत-बांगलादेश मॅचचा थरारक शेवट, ज्याने सगळेच चक्रावले
6 चेंडू, 12 धावा अन् काळजाचा ठोका चुकवणारा ड्रामा! भारत-बांगलादेश मॅचचा थरारक शेवट, ज्याने सगळेच चक्रावले
IND vs WI 3rd T20 : भारत-वेस्ट इंडिज सामन्यात अखेरच्या षटकात हायव्होल्टेज ड्रामा! एका धावेवरून पंचांशी भिडले खेळाडू, नेमकं काय घडलं?
भारत-वेस्ट इंडिज सामन्यात अखेरच्या षटकात हायव्होल्टेज ड्रामा! एका धावेवरून पंचांशी भिडले खेळाडू, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनाच इंडिया आघाडीच्या सुप्रीम कोर्टावरच्या मोर्चावर ऑन कॅमेरा मीडियाचा सवाल अन् एकाच वाक्यात उत्तर, दिल्लीच्या लॉ अँड ऑर्डरवर विचारताच काय म्हणाले?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनाच इंडिया आघाडीच्या सुप्रीम कोर्टावरच्या मोर्चावर ऑन कॅमेरा मीडियाचा सवाल अन् एकाच वाक्यात उत्तर, दिल्लीच्या लॉ अँड ऑर्डरवर विचारताच काय म्हणाले?
Someshwar Sugar Factory Election Result : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल आला, सुनेत्रा पवारांच्या पॅनलने खातं उघडलं, कोणता उमेदवार विजयी?
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल आला, सुनेत्रा पवारांच्या पॅनलने खातं उघडलं, कोणता उमेदवार विजयी?
Pune News: राजगड किल्ल्यावर पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्यू; मालकाच्या मृत्यूनंतरही निष्ठावान जुली राहिली सोबत, स्ट्रेचरच्या सहाय्याने किल्ल्यावरून खाली आणताना मागे-मागे आली अन्...
राजगड किल्ल्यावर पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्यू; मालकाच्या मृत्यूनंतरही निष्ठावान जुली राहिली सोबत, स्ट्रेचरच्या सहाय्याने किल्ल्यावरून खाली आणताना मागे-मागे आली अन्...
इंडिया आघाडीचा आज सुप्रीम कोर्टावर अभूतपूर्व मोर्चा, पण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह इंडिया आघाडीची भेट का नाकारली? चार कारणे दिली!
इंडिया आघाडीचा आज सुप्रीम कोर्टावर अभूतपूर्व मोर्चा, पण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह इंडिया आघाडीची भेट का नाकारली? चार कारणे दिली!
Pune MPSC protest: पुण्यातील एमपीएससी आंदोलनात रात्री अचानक चक्र फिरली, पडद्यामागे काय घडलं? वाचा इनसाईड स्टोरी
पुण्यातील एमपीएससी आंदोलनात रात्री अचानक चक्र फिरली, पडद्यामागे काय घडलं? वाचा इनसाईड स्टोरी
Sunetra Pawar on Someshwar Sugar Factory Election Result : निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
Someshwar Factory Election: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
WCL 2026 : 6 चेंडू, 12 धावा अन् काळजाचा ठोका चुकवणारा ड्रामा! भारत-बांगलादेश मॅचचा थरारक शेवट, ज्याने सगळेच चक्रावले
6 चेंडू, 12 धावा अन् काळजाचा ठोका चुकवणारा ड्रामा! भारत-बांगलादेश मॅचचा थरारक शेवट, ज्याने सगळेच चक्रावले
Embed widget