IND Vs ENG: इंग्लंडविरोधात सुरु असलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियानं आघाडी घेतली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसर्या कसोटी सामन्यात भारताने दुसर्या दिवशी इंग्लंडचा 10 गडी राखून पराभव केला आहे. या सामन्यानंतर नरेंद्र मोदी स्टेडियमच्या पीचवर अनेकांनी टीका केली. यावरुन टीम इंडियाचा गोलंदाज आर अश्विन चांगलाच संतापला आहे. अश्विननं म्हटलंय की, पीचवर टीका करणं बंद करायला हवं. पीचवरुन जास्त ड्रामा करु नये, अशा शब्दात त्यानं टीकाकारांना उत्तर दिलं आहे.
अश्विननं म्हटलं आहे की, चांगलं क्रिकेट पीच कशी असते? गोलंदाजांचा दिवस होता. रन बनवण्यासाठी फलंदाजांनी चांगली कामगिरी करणं आवश्यक होतं. त्यामुळं पीचबाबत प्रश्नच येत नाही. चांगली पीच कशी बनवतात? त्याची नेमकी व्याख्या काय? पहिल्या दिवशी चेंडू सीम करेल आणि शेवटच्या दोन दिवसांमध्ये स्पीन होईल. असे नियम कोण बनवतं? असा सवाल त्यानं केला आहे. या चर्चा इथंच थांबवायला हव्यात आणि यावरुन अधिकचा ड्रामा बंद केला पाहिजे, असं अश्विननं म्हटलं आहे.
IND Vs ENG: चौथ्या कसोटीआधी टीम इंडियाला मोठा धक्का, 'हा' स्टार खेळाडू संघाबाहेर
तिसऱ्या कसोटी दरम्यान अश्विननं आपल्या कसोटी क्रिकेटमधील 400 विकेट्स पूर्ण केल्या. अश्विननं या मालिकेत आतापर्यंत सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत.
इंग्लंडविरोधात सुरु असलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियानं आघाडी घेतली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसर्या कसोटी सामन्यात भारताने दुसर्या दिवशी इंग्लंडचा 10 गडी राखून पराभव केला आहे. या विजयासह भारताने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. आता आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं तिकिट मिळवण्यासाठी चौथा सामना जिंकण किंवा अनिर्णित ठेवणं भारतीय संघाला आवश्यक आहे.
तिसऱ्या कसोटीत शानदार विजयासह टीम इंडियाची आघाडी
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसर्या कसोटी सामन्यात भारताने दुसर्या दिवशी इंग्लंडचा 10 गडी राखून पराभव केला. या विजयासह भारताने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. हा कसोटी सामना दुसर्याच दिवशी संपला. कसोटी क्रिकेटच्या इतिहास दोन दिवसांत सामन्याचा निकाल येण्याची कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील ही 22वी वेळ आहे. विशेष म्हणजे, यामध्ये इंग्लंडचा 13 वेळा सहभाग होता. या 13 सामन्यात इंग्लंडचा चार वेळा पराभव झाला आहे.
या कसोटीत इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 112 धावा केल्या. यानंतर भारतीय संघ पहिल्या डावात 145 धावा करू शकला. अशाप्रकारे पहिल्या डावात भारताने 33 धावांची आघाडी मिळवली होती. यानंतर इंग्लंडचा संघ दुसर्या डावात 81 धावांवर ऑलआऊट झाला आणि भारताला 49 धावांचे लक्ष्य मिळाले, जे भारतीय संघाने कोणत्याही विकेट न गमावता 7.4 षटकांत पूर्ण केले.
अक्षर पटेल भारतीय संघाच्या विजयाचा हीरो
भारताच्या या शानदार विजयाचा अक्षर पटेल नायक ठरला. आपला दुसरी कसोटी सामना खेळताना अक्षर पटेलने या कसोटीच्या दोन्ही डावात पाच विकेट्स घेतल्या. पहिल्या डावात त्याने 38 धावा देऊन सहा विकेट घेतल्या आणि दुसऱ्या डावात त्याने 32 धावा देऊन पाच बळी घेतले. यासह, तो दिवस-रात्र कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू ठरला आहे.